6 Sep 2020 Chalu Ghadamodi in Marathi

6 Sep 2020 Chalu Ghadamodi in Marathi

6 Sep 2020 Chalu Ghadamodi in Marathi

📚📚वनलायनर दिनविशेष, दि.6सप्टेंबर 2020 📚📚

🌹🌳🌲 पर्यावरण 🌲🌳🌹

👉5 सप्टेंबर रोजी जापानी ओकिनावा बेटांना धडक दिलेले चक्रीवादळ – हेशन.

🌹🌳🌲आंतरराष्ट्रीय🌲🌳🌹

👉भारतात आज जगातले _ सर्वात मोठे रस्त्यांचे जाळे आहे – दुसरे.

👉फ्रान्स नंतरचे दुसरा युरोपीय देश, ज्याने ‘हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी धोरण’ स्वीकारले आहे – जर्मनी.

👉’हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी धोरण’ तयार करणारे राष्ट्रे – अमेरिका, जापान, ऑस्ट्रेलिया आणि भारत.

🌹🌳🌲राष्ट्रीय🌲🌳🌹

👉‘बिझनेस रिफॉर्म अॅक्शन प्लान (BRAP) 2019’ क्रमवारीनुसार, सर्व भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा – आंध्रप्रदेश.

👉‘BRAP 2019’ क्रमावारीनुसार, सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी अव्वल दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश – (अनुक्रमे) आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश, झारखंड, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि गुजरात.

👉’BRAP 2019’ क्रमावारीनुसार, उत्तर भागातले सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य – उत्तरप्रदेश.

👉’BRAP 2019’ क्रमावारीनुसार, पूर्व भागातले सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य – झारखंड.

👉’BRAP 2019’ क्रमावारीनुसार, पश्चिम भागातले सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य – मध्यप्रदेश.

👉‘BRAP 2019’ क्रमावारीनुसार, दक्षिण भागातले सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य – आंध्रप्रदेश.

👉‘BRAP 2019’ क्रमावारीनुसार, ईशान्य भागातले सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य – आसाम.

👉’BRAP 2019’ क्रमावारीनुसार, सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा केंद्रशासित प्रदेश – दिल्ली.

🌹🌳🌲राज्य विशेष🌲🌳🌹

👉‘एक भारत श्रेष्ठ भारत’ अंतर्गत, गोवाने या राज्यासोबत जोडी तयार केली आहे – झारखंड.

👉’एक भारत श्रेष्ठ भारत’ अंतर्गत, सिक्किमने या राज्यासोबत जोडी तयार केली आहे – दिल्ली.

👉’एक भारत श्रेष्ठ भारत’ अंतर्गत, मध्यप्रदेशने या राज्यासोबत जोडी तयार केली आहे – मणीपूर आणि नागालँड.

🌹🌳🌲सामान्य ज्ञान🌲🌳🌹

👉निशस्त्रीकरण परिषद (Conference on Disarmament) – स्थापना: वर्ष 1984; मुख्यालय: जिनिव्हा, स्वित्झर्लंड; सदस्य: 65.

👉रासायनिक शस्त्रास्त्रे प्रतिबंधक संघटना (Organisation for the Prohibition of Chemical Weapons -OPCW) – स्थापना: 29 एप्रिल 1997; मुख्यालय: हेग, नेदरलँड; सदस्य: 193.

👉पारंपारिक शस्त्रे व दुहेरी-वापरायोग्य वस्तू व तंत्रज्ञानाच्या निर्यातीवर  नियंत्रणासाठी वासेनर व्यवस्था – स्थापना: 12 जुलै 1996; सचिवालय: व्हिएन्ना, ऑस्ट्रिया.

👉भारतीय अणुचाचणीनंतर, आण्विक पुरवठादार गट (NSG) याची स्थापना – मे 1974.

👉अण्वस्त्र प्रसारबंदी करार (Non-Proliferation Treaty -NPT) – स्वाक्षरी: 1 जुलै 1968; प्रभावी: 5 मार्च 1970; पक्ष: 190.

👉ऑस्ट्रेलिया गट (रासायनिक आणि जैविक शस्त्रास्त्राच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी) – स्थापना: वर्ष 1985; पक्ष: 43.

👉क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण प्रशासन (MTCR) – स्थापना: वर्ष 1987; पक्ष: 35.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Marathi Vyakaran sarav Prashnsanch

📗 तिथी, वार, नक्षत्र, योग, करणा-या पाच घटकांनी युक्त अशा दिनी – वैशिष्टयांची माहिती असणारी पुस्तिका कोणती ?

1) पंचीकरण 2) पंचांग

3) पंचशील 4) पंचीकृती

उत्तर :- 2

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📕 पुढील शब्दांपैकी व्याकरणदृष्टया योग्य शब्द कोणता ?

1) मनस्थीती 2) मनस्थिति:

3) मन्हस्थिती 4) मन:स्थिती

उत्तर :-

4

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📗 ट, ठ, ड, ढ, ण हे वर्ण ……………… आहेत.

1) तालव्य 2) अनुनासिक

3) दन्त्य 4) मूर्धन्य

उत्तर :- 4

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📕 ‘मनस्ताप’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

1) पूर्वरूप संधी 2) पररुप संधी

3) व्यंजन संधी 4) विसर्ग संधी

उत्तर :- 4

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📗 कुत्र्याने चावा घेतला ? अधोरेखित शब्दाचे नाम कोणते ?

1) कुत्र्या 2) कुत्रा

3) कुत्र्याने 4) कुत्र्याचा

उत्तर :- 2

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📕 वचनभेदाप्रमाणे बदलणारी सर्वनामे किती आहेत ? पर्यायी उत्तरांतील योग्य पर्यायी उत्तर कोणते ?

1) चार 2) पाच

3) सहा 4) सात

उत्तर :- 2

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📗 पुढीलपैकी अव्ययसाधीत विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते ?

1) बोलकी बाहुली 2) पुढची गल्ली

3) कापड – दुकान 4) माझे – पुस्तक

उत्तर :- 2

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📕 वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द ………………. 1) क्रियापद 2) धातू 3) कर्म 4) कर्ता

उत्तर :- 1

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📗 खालील विधानातील क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखा. तो इतका मोठयाने बोलला, की त्याचा आवाज बसला. 1) उद्देशदर्शक 2) कारणदर्शक 3) रीतिदर्शक 4) कालदर्शक उत्तर :- 2

Chalu Ghadamodi Sep 2020 PDF Download

Chalu Ghadamodi Sep 2020 PDF Download

Chalu Ghadamodi Sep 2020 PDF Download

नागरी सेवा क्षमता वृद्धीसाठी भारत सरकारचे “मिशन कर्मयोगी

🔸2 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत “राष्ट्रीय नागरी सेवा क्षमता विकास कार्यक्रम” (NPCSCB) राबविण्यासाठी मंजुरी दिली गेली. जगभरातल्या उत्तम संस्था आणि पद्धतींबाबत शैक्षणिक स्त्रोतांचा स्वीकार करून कार्यक्रमाची काळजीपूर्वक रचना केली गेली आहे.

🔸हा निर्णय भारत सरकारच्या नव्या “मिशन कर्मयोगी” या अभियानाच्या अंतर्गत घेण्यात आला आहे. भविष्यासाठी भारतीय नागरी सेवकाला अधिक सर्जनशील, रचनात्मक अधिक क्रियाशील, व्यावसायिक, प्रगतीशील, ऊर्जावान, सक्षम,पारदर्शक आणि तंत्रज्ञान सक्षम बनवणे हे ‘मिशन कर्मयोगी’चे उद्दिष्ट आहे. विशिष्ट भूमिका-क्षमतानी सुसज्ज नागरी सेवक उच्च गुणवत्ता मानकांच्या प्रभावी सेवा सुनिश्चित करू शकणार.

NPCSCB कार्यक्रमात पुढील चार संस्थात्मक चौकटीचा समावेश आहे –

🔸पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक मनुष्यबळ परिषद

🔸क्षमता विकास आयोग

🔸डिजिटल मालमत्ता मालकी आणि परिचालन तसेच ऑनलाइन प्रशिक्षणासाठी तंत्रज्ञान मंचासाठी विशेष प्रयोजन कंपनी (SPV)

🔸कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली समन्वय मंडळ  

कार्यक्रमाची मुख्य मार्गदर्शक तत्वे

🔸‘नियम आधारित’ कडून ‘भूमिका आधारित’ मनुष्यबळ व्यवस्थापन परिवर्तनाला सहकार्य करणे. नागरी सेवकांना कामाचे वाटप त्यांच्या पदाच्या गरजेनुसार त्यांच्या क्षमतेशी जोडणे.

🔸‘ऑफ साइट’ शिक्षण पद्धतीला पूरक ‘ऑन साइट’ शिक्षण पद्धतीवर भर देणे.

🔸शिक्षण सामग्री, संस्था आणि कार्मिक सहित सामायिक प्रशिक्षण पायाभूत संरचना असलेली परिसंस्था निर्माण करणे.

🔸नागरी सेवेशी संबंधित सर्व पदांना भूमिका, कार्ये, आणि क्षमता (FRAC) यासंबंधी दृष्टिकोनानुसार अद्ययावत करणे आणि प्रत्येक सरकारी संस्थेत निवडक FRACसाठी प्रासंगिक शिक्षण सामुग्रीची निर्मिती करणे आणि पुरवणे.

🔸सर्व नागरी सेवकांना आत्मप्रेरित आणि आदेशित शिक्षण पद्धतीमध्ये त्यांचे वर्तन, कार्य आणि कार्यक्षेत्र संबंधित क्षमता निरंतर विकसित आणि मजबूत करण्याची संधी उपलब्ध करून देणे.

🔸प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी वार्षिक वित्तीय योगदानाच्या माध्यमातून शिकण्याच्या सामायिक आणि समान परिसंस्था निर्माण करण्यासाठी आपापल्या स्त्रोतांमध्ये थेट गुंतवणूक करण्यासाठी सर्व केंद्रीय मंत्रालये आणि विभाग आणि त्यांच्या संघटनांना सक्षम बनवणे.

🔸सार्वजनिक प्रशिक्षण संस्था, विद्यापीठे,  स्टार्टअप आणि व्यक्तिगत तज्ञांसह शिक्षण संबंधी सर्वोत्तम सामुग्रीच्या विकासाला प्रोत्साहन देणे आणि भागीदारी करणे.

🔸क्षमता विकास, आशय निर्मिती, वापरकर्त्यांचा प्रतिसाद आणि क्षमतेनुसार तसेच धोरणात्मक सुधारणांसाठी क्षेत्रांची निवड करण्याबाबत iGOT-कर्मयोगी द्वारे पुरवण्यात आलेल्या माहितीचे विश्लेषण करणे. कार्यक्रमाची वैशिष्ट्ये

🔸आय गॉट कर्मयोगी (iGOT Karmayogi) नावाचा एकात्मिक सरकारी ऑनलाईन प्रशिक्षण मंच स्थापित केला जाणार आहे.

🔸एक ‘क्षमता विकास आयोग’ स्थापन करण्याचा देखील प्रस्ताव आहे,  जेणेकरून सहकार्यात्मक आणि सामायिक आधारावर क्षमता विकास परिसंस्था व्यवस्थापन आणि नियमन याबाबतीत एकसमान दृष्टिकोन सुनिश्चित करता येणार. ही आयोग वार्षिक क्षमता विकास योजनांना मंजुरी देण्यात ‘पीएम सार्वजनिक मनुष्यबळ परिषद’ला सहाय्य करणार. नागरी सेवा क्षमता विकास यासंबंधी सर्व केंद्रीय प्रशिक्षण संस्थावर देखरेख ठेवणार. सामायिक शिक्षण संसाधनांची निर्मिती करणार तसेच योजनाच्या अंमलबजावणीवर समन्वय आणि देखरेख ठेवणार.

🔸iGOT- कर्मयोगी मंच भारतात दोन कोटींहून अधिक अधिकाऱ्यांची क्षमता वाढवण्यासाठी व्यापक आणि अत्याधुनिक संरचना उपलब्ध करणार. हा प्लॅटफॉर्म शैक्षणिक सामुग्रीसाठी एक आकर्षक आणि जागतिक दर्जाची बाजारपेठ म्हणून उदयाला येण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये काळजीपूर्वक संकलित केलेली माहिती आणि डिजिटल ई-शिक्षण सामग्री उपलब्ध केली जाणार.

🔸सुमारे 46 लक्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यासाठी 2020-2021 या वर्षापासून 2024-25 या वर्षापर्यंत 5 वर्षांच्या कालावधीत 510.86 कोटी रुपये खर्च केले जाणार. 

“इंद्रा नेव्ही-20”: भारत आणि रशिया यांचा संयुक्त युद्धसराव

🔸भारतीय नौदल आणि रशियाचे नौदल यांचा 11 वा द्वैवार्षिक संयुक्त सागरी सराव 4 आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी बंगालच्या उपसागरात आयोजित करण्यात आला आहे. ठळक बाबी

🔸“इंद्रा नेव्ही-20”चा मुख्य उद्देश दोन्ही नौदलामधले आंतर-संचालन अधिक दृढ करणे आणि बहु आयामी सागरी अभियानासाठी आकलन आणि पद्धती विस्तृत करणे हा आहे.

🔸सरावादरम्यान भारतीय नौदलाच्या ताफ्यात क्षेपणास्त्र विनाशिका ‘रणविजय’, स्वदेशी लढाऊ जहाज ‘सह्याद्री’ आणि ‘शक्ती’ या तेलवाहू जहाजाचा आणि हेलिकॉप्टरचाही समावेश आहे. तर रशियाच्या ताफ्यात विनाशिका ‘एडमिरल विनोग्राडोव्ह’, विनाशिका ‘एडमिरल ट्रिब्युट’ आणि फ्लीट टॅंकर ‘बोरिस ब्यूटोमा’ या जहाजांचा समावेश आहे.

🔸2003 साली सुरु झालेला “इंद्रा नेव्ही” म्हणजे दोन्ही देशांच्या नौदलामधल्या दीर्घकालीन धोरणात्मक संबंधांचे प्रतिक आहे. सरावामुळे दोन्ही नौदलात परस्पर विश्वास आणि सहकार्य अधिक दृढ होणार असून, उभय देशातले दीर्घ काळापासूनचे मैत्रीचे बंध अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.

रशिया देश

रशिया हा आशिया खंडाच्या उत्तर भागातला एक देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया जगातला सर्वात मोठा देश आहे. जगाच्या एकूण भूभागाच्या क्षेत्रफळापैकी सुमारे एक-सप्तमांश क्षेत्र रशियाने व्यापलेले आहे. रशियाचा विस्तार यूरोप व आशिया अशा दोन्ही खंडांत असून यूरोप खंडाचा पूर्वेकडील जवळजवळ निम्मा भाग तर आशिया खंडाचा उत्तरेकडील सुमारे दोन-पंचमांश भाग या देशाने व्यापलेला आहे. मॉस्को हे देशाच्या राजधानीचे शहर आहे. रूबल हे रशियाचे राष्ट्रीय चलन आहे

Vidnyan Sarav Prashnsanch

1) LASER म्हणजे काय ?

1) Light Amplification by stimulated Emission of Radiation.

2) Less Amplification by stimulated Emission of Radiation.

3) Light Amplification by Sub-Emission of Radion.

4) None of the above.

उत्तर :- 1

2) डोबेरायनर या शास्त्रज्ञांनी त्रिकांच्या स्वरूपात मूलद्रव्याचे वर्गीकरण केले कारण, की

1) सुरवात त्रिकांपासून होते. 2) पहिले व तिसरे मूलद्रव्यासारखे होते.

3) पहिले व तिसरे मूलद्रव्याचे सरासरी वस्तुमान दुस-या मूलद्रव्याएवढे होते.

4) त्यांना या पध्दतीत रस होता. उत्तर :- 3

3) अयोग्य जोडी ओळखा.

अ) एरिमोफाइटस – वाळवंटात उगवणा-या वनस्पती ब) तिथोफाइटस – पर्वतावर उगवणा-या वनस्पती

क) ऑक्जीलोफाइट्स – आम्लीय मृदात उगवणा-या वनस्पती ड) हिलोफाइट्स – दलदलमध्ये उगवणा-या वनस्पती

1) अ, ब 2) ब, क

3) यापैकी नाही 4) क, ड

उत्तर :- 3

4) Radar म्हणजे काय ?

1) Radio Defence and Ranging

2) Radio Detection and Ranging

3) Radio and Defence Amplification Range

4) None of the above

उत्तर :- 1

5) ब्रिटीश रसायनशास्त्रज्ञ न्यूलँडस यांनी मूलद्रव्याच्या वर्गीकरणाचा सिध्दांत …………….. यावर्षी मांडला.

1) 1829 2) 1869

3) 1865 4) 1870

उत्तर :- 3

6) खालीलपैकी योग्य विधान / विधाने कोणती ?

अ) प्रकाश तरंग स्वरूपात अस्तित्व दर्शवितो.

ब) प्रकाश कण स्वरूपात अस्तित्व दर्शवितो.

क) प्रकाश ऊर्जा फोटोन्सच्या स्वरूपात असते.

1) फक्त ब, क 2) फक्त अ, ब

3) फक्त अ, क 4) अ, ब, क तिन्ही उत्तर :- 4

7) न्यूलँडसने अष्टकाच्या आधारावर वर्गीकरण केले कारण, की

1) पहिले व आठवे मूलद्रव्यासारखे होते. 2) पहिले व आठव्या मूलद्रव्यात न्यूट्रॉन सारखे होते.

3) पहिल्या व आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म सारखे होते. 4) पहिल्या व आठव्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमानांक सारखे होते.

उत्तर :- 3

8) खालीलपैकी कोणती खनिजे स्नायूच्या आकुंचनासाठी आवश्यक असतात.

अ) सोडियम ब) कॅल्शिअम क) लेड ड) सर्व

1) अ, ब 2) ड

3) ब, क 4) अ, क

उत्तर :- 1 9) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचविण्यासाठी किती कालावधी लागतो ?

1) 8 मिनिटे 19 सेकंद 2) 8 मिनिटे 11 सेकंद

3) 6 मिनिटे 13 सेकंद 4) 6 मिनिटे 19 सेंकद

उत्तर :- 1

10) मूलद्रव्याचे वर्गीकरण करण्याचे श्रेय डोबेरायनर, मेंडेलिव्ह व न्यूलँडस यांना जाते, या तिन्ही शास्त्रज्ञांचा वर्गीकरणाचा आधार ………………….. हा होता ?

1) अणुक्रमांक 2) अणुवस्तुमानांक

3) समस्थानिके 4) समभार उत्तर :- 2

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन झालं आहे. ८४ वर्षीय प्रणव मुखर्जी यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून आर्मी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली होती. सोमवारी सकाळी रुग्णालयाने मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध करत फुफ्फुसांच्या संसर्गामुळे ते सेप्टिक शॉकमध्ये गेले असल्याची माहिती दिली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. पण अखेर उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. अभिजीत मुखर्जी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “जड अंतकरणाने मी आपणास सांगू इच्छितो की डॉक्टरांकडून अथक प्रयत्न, देशभरातून प्रार्थना होत असूनही माझे वडील प्रणव मुखर्जी यांचं निधन झालं आहे”. १० ऑगस्टपासून प्रणव मुखर्जी यांची प्रकृती बिघडली होती. १० ऑगस्ट रोजी त्यांच्या मेंदूत असलेल्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दरम्यान एक दिवस आधी त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. रुग्णालयात दाखल झाल्यापासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती. त्यानंतर ते कोमात गेले आहेत असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं होतं. प्रणव मुखर्जी हे भारताचे १३ वे राष्ट्रपती होते. राष्ट्रीय राजकारणात ते १९६९ पासून सक्रिय होते. भारतीय राजकारणातील अमूल्य सेवेसाठी त्यांना २००८ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तर ८ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात प्रणव मुखर्जी हे राजकारणात सक्रिय झाले होते. १९७३ मध्ये ते केंद्रीय मंत्रिमंडळात होते. १९८२ ते ८४ या काळात त्यांनी देशाचं अर्थमंत्रीपद भुषवलं. १९८० ते १९८५ या कालावाधीत राज्यसभेत ते लीडर ऑफ हाऊसही होते. इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले. त्यावेळी काही राजकीय कारणांमुळे त्यांना थोडंसं बाजूला करण्यात आलं. त्यामुळे त्यावेळी राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस हा पक्षही त्यांनी स्थापन केला होता. मात्र १९८९ नंतर त्यांनी हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. १९९१ मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर प्लानिंग कमिशनच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर पी.व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात प्रणव मुखर्जी हे परराष्ट्र मंत्री होते. २००४ मध्ये जेव्हा यूपीएचं सरकार आलं तेव्हाही ते मंत्रिमंडळात होते. २०१२ ते २०१७ या काळात ते भारताचे राष्ट्रपती होते.

Chalu Ghadamodi 30 August 2020 in Marathi Pdf

Chalu Ghadamodi 30 August 2020 in Marathi Pdf http://www.officersonlineacademy.com/chalu-ghadamodi-30-august-2020-in-marathi-pdf/

रोहित शर्माला ‘खेलरत्न’ जाहीर, दोन क्रिकेटपटूंना अर्जुन पुरस्कार –

Block Title

rohit sharma khelratn award winner

Title

Rohit Sharma Khelratna Winner

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्मा याला यंदाचा मानाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. – त्याच्यासोबतच महिला कुस्तीपटू विनेश फोगाट, महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, पॅरालिम्पिकपटू एम. थंगवेलू आणि महिला हॉकीपटू रानी रामपाल यांनाही खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. – याशिवाय, वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि महिला क्रिकेटपटू दिप्ती शर्मा या दोन क्रिकेटपटूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला. – यंदाच्या पुरस्कार यादीत पाच क्रीडापटूंना खेलरत्न पुरस्कार, १३ प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार, २७ क्रीडापटूंना अर्जुन पुरस्कार, १५ खेळाडूंना ध्यानचंद पुरस्कार तर आठ खेळाडूंना तेनसिंग पुरस्कार घोषित झाले. – यंदाच्या खेलरत्न पुरस्कारासाठी या पाच खेळाडूंची शिफारस केली. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीची बैठक झाली. या बैठकीत क्रीडापटूंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. रोहित शर्माला खेलरत्न पुरस्कार जाहीर झाल्यामुळे हा मानाचा पुरस्कार मिळवणारा तो चौथा क्रिकेटपटू ठरला. या आधी सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांना खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. सचिनला १९९८ साली, धोनीला २००७ तर विराटला २०१८ साली हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. – २०१९ विश्वचषकात रोहित शर्माने ५ शतकं झळकावत केलेली बहारदार खेळी पाहता BCCIने त्याचं नाव खेलरत्न पुरस्कारासाठी दिलं होतं. – भारतीय हॉकीचे जादूगार म्हणून ओळख असलेल्या मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमीत्त म्हणजेच २९ ऑगस्ट रोजी भारतात क्रीडा दिन साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्रपती भवनात वर्षभरातील क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान केला जातो.

जगातील सगळ्यात मोठं ‘अटल टनल’ तयार □

१० हजार फुट लांब असलेला जगातिल सगळ्यात लांब रोड टनल अखेर भारतात तयार झाला आहे. □ हा टनेल तयार करण्यासाठी १० वर्षांचा कालावधी लागला आहे. रोहतांग येथे तयार करण्यात आलेल्या बोगद्याचं नाव ‘अटल टनल’ आहे. □ माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावरून या बोगद्याचे नाव ठेवलं आहे. □ ज्याची लांबी ८.८ किलोमीटर इतकी आहे. १०, १७१ फुटांवर अटल रोहतांग टनेल तयार करण्यात आलं आहे उंच टनेल आहे. या टनेलमुळे मनाली ते लेह हे अंतर ४६ किलोमीटरनं कमी झाले आहे.

Chalu Ghadamodi 30 August 2020 in Marathi Pdf

Chalu Ghadamodi 29 Aug 2020 in Marathi

Chalu Ghadamodi 29 Aug 2020 in Marathi

Chalu Ghadamodi 29 Aug 2020 in Marathi

सलग चार वर्षे इंदूर शहर अव्वल

~ स्वच्छता सर्वेक्षणाच्या पहिल्याच वर्षी भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा किताब मैसूर या शहराने पटकावला होता . त्यानतर सतत चार वर्षे, म्हणजेच सन २०१७, २०१८, २०१९, सन २०२० मध्ये मध्य प्रदेशातील इंदूर हे शहर देशात सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे. ~ सर्वात स्वच्छ शहर : इंदूर ~ सर्वात स्वच्छ राज्य: १०० शहरांहून अधिक शहरे) : छत्तीसगड ~ सर्वात स्वच्छ राज्य (१०० हून कमी शहरे) झारखंड ~ सर्वात स्वच्छ कंटोनमेंट: जालंधर कँट ~ सर्वात स्वच्छ गंगा टाउन : वाराणसी.

केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत सर्वेक्षण २०२०‘ चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. ~ इंदौर देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे. ~ सलग चौथ्यांदा इंदौरने बाजी मारली आहे ~ गुजरातमधील सूरत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ~ तिसऱ्या क्रमांकावर नवी मुंबई आहे. ~ ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ मध्ये नवी मुंबईने स्वच्छ शहरात राज्यात प्रथम व देशात सातव्या क्रमांक मिळवला होता. 

एन आर ए ला मान्यता देणारे देशातील पहिले राज्य मध्यप्रदेश आहे

~ केंद्र सरकारने ” एक देश एक परीक्षा” धोरणाचा अवलंब केला असून राष्ट्रीय भरती संस्थेच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे ~ NRA च्या आधारावर सरकारी नोकरी देण्याची घोषणा करणारे मध्यप्रदेश पहिले राज्य ठरले आहे NRA = National recruitment agency

🔷निर्यात सज्जता निर्देशांक 2020’मध्ये गुजरात राज्य प्रथम क्रमांकावर.🔷

🔥नीती आयोगाने (राष्ट्रीय परिवर्तन भारत संस्था) ‘निर्यात सज्जता निर्देशांक 2020’ (EPI 2020) जाहीर केला आहे. भारतातल्या राज्यांची निर्यात-बाबतची तयारी आणि कामगिरी यांचे परीक्षण करून आव्हाने आणि संधी ओळखणे, सरकारी धोरणाचा प्रभाव अधिक वाढवणे आणि सोयीचे नियमन संरचना तयार करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा या पहिल्या अहवालाचा उद्देश आहे. 🔥राज्यांच्या एकूणच यादीत पहिले तीन क्रमांक (अनुक्रमे) – गुजरात, महाराष्ट्र आणि तमिळनाडू 🔥भूपरिवेष्टित राज्यांच्या यादीत पहिले तीन क्रमांक (अनुक्रमे) – राजस्थान, तेलंगणा आणि हरयाणा 🔥हिमालयी राज्यांच्या यादीत पहिले तीन क्रमांक (अनुक्रमे) – उत्तराखंड, त्रिपुरा आणि हिमाचल प्रदेश 🔥केंद्रशासित प्रदेशांच्या यादीत पहिले तीन क्रमांक (अनुक्रमे) – दिल्ली, गोवा आणि चंदीगड ❗️❗️इतर ठळक बाबी…❗️❗️ हा निर्देशांक चार स्तंभावर आधारित आहे, ते आहेत – धोरण, व्यवसाय परीसंस्था, निर्यात परिसंस्था, निर्यात कामगिरी. यात 11 उप-स्तंभ आहेत.

सातवी पंचवार्षिक योजना

सातवी पंचवार्षिक योजना

सातवी पंचवार्षिक योजना

सातव्या पंचवार्षिक योजनेची महत्वाची वैशिष्टये –

कालावधी – १ एप्रिल १९८५ ते ३१ मार्च १९९० (ही योजना १५ वर्षांच्या -१९८५ ते २०००- दीर्घकालीन योजनेचा भाग होती.)

अध्यक्ष – राजीव गांधी (डिसेंबर १९८९ पर्यंत), व्ही. पी. सिंग (डिसेंबर १९८९ नंतर)

उपाध्यक्ष – मनमोहन सिंग (ऑगस्ट १९८७ पर्यंत), पी. शिवशंकर (जुलै १९८७ ते जून 1988), माधवसिंग सोळंकी (जून १९८८ ते ऑगस्ट 1989), रामकृष्ण हेगडे (डिसेंबर १९८९ नंतर)

प्रतिमान – ब्रम्हानंद आणि वकील यांचे मजुरी वस्तू प्रतिमान

मुख्य भर – उत्पादक रोजगार निर्मिती

घोषणा – ‘बेकारी हटाओ’

घोषवाक्य – अन्न, रोजगार व उत्पादकता

दुसरे नाव – रोजगार निर्मिती जनक योजना

या योजनेत विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर सूचक नियोजन प्रणालीचा अवलंब करण्यात आला.

विशेष घटनाक्रम –

 • जून १९८५-८६ – इंदिरा आवास योजना. ही योजना एप्रिल १९८९ मध्ये जवाहर रोजगार योजनेत वर्ग करण्यात आली होती, परंतु; १ जानेवारी १९९६ पासून पुन्हा स्वतंत्र दर्जा देण्यात आला.
 • १ सप्टेंबर १९८६ – Council for Advancement of People’s Action and Rural Technology (CAPART)
 • १९८६ – केंद्रीय ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम
 • १ एप्रिल १९८७ – तिसरा २० कलमी कार्यक्रम
 • १९८७ – खडू फळा मोहीम (Operation Black Board)
 • १९८८ – दशलक्षी विहीर योजना (MWS)
 • ५ मे १९८८ – राष्ट्रीय साक्षरता मिशन
 • ८ जुलै १९८८ – राष्ट्रीय आवास बँक (National Housing Bank – NHB) ची स्थापना
 • १ एप्रिल १९८९ – जवाहर रोजगार योजना (JRY) – ग्रामीण भागात
 • ऑक्टोबर १९८९ – नेहरू रोजगार योजना (NRY) – शहरी भागात

आर्थिक वाढीचा दर –

 • संकल्पित दर – ५%
 • साध्य दर – ५.६ %
 • योजना बहुतांशी यशस्वी ठरली.
 • अन्नधान्याचे उत्पादन वाढून १७०.६ दशलक्ष टन झाले.
 • किमतीचा निर्देशांक वाढून १९१.८ पर्यंत पोहोचला.
 • दारिद्र्य रेषेखालील लोकांचे प्रमाण ३७ % वरून (१९८३-84) ३०% पर्यंत (1987) कमी झाले.

योजना काळातील राजकीय घडामोडी –

 • बोफोर्स प्रकरण
 • २० फेब्रुवारी १९८७ – मिझोरम व अरुणाचल प्रदेश यांना राज्याचा दर्जा देण्यात आला.
 • ३० मे १९८७ – गोवा या केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा देण्यात आला.

अर्थशास्त्र महत्वाच्या नोट्स डाउनलोड करा

सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

सहावी पंचवार्षिक योजना

सहावी पंचवार्षिक योजना

सहावी पंचवार्षिक योजना

सहाव्या पंचवार्षिक योजनेची महत्वाची वैशिष्टये –

कालावधी – १ एप्रिल १९८० ते ३१ मार्च १९८५

अध्यक्ष – इंदिरा गांधी (ऑक्टोबर १९८४ पर्यंत), राजीव गांधी (ऑक्टोबर १९८४ नंतर)

उपाध्यक्ष – एन. डी. तिवारी (ऑगस्ट 1981 पर्यंत), शंकरराव चव्हाण (ऑगस्ट १९८१ ते जुलै १९८४), पी. व्ही. नरसिंह राव (नोव्हेंबर १९८४ ते जानेवारी १९८५)

प्रतिमान – अलन मान व अशोक रुद्र यांचे खुले सातत्य प्रतिमान

मुख्य भर – दारिद्र्य निर्मुलन व रोजगार निर्मिती

प्रकल्प –

 • १९८२ – सलेम लोह – पोलाद उद्योग (सलेम, तामिळनाडू)
 • १९८२ – विशाखापटटणम लोह – पोलाद उद्योग (आंध्र प्रदेश)

विशेष घटनाक्रम –

 • १५ एप्रिल १९८० – ६ बँकांचे राष्ट्रीयीकरण
 • २ ऑक्टोबर १९८० – एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम (IRDP)
 • २ ऑक्टोबर १९८० – राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम (NREP)
 • १९८१-८२ – बायोगॅस कार्यक्रम (National Biogas and Manure Management Program)
 • १४ जानेवारी १९८२ – नवीन २० कलमी कार्यक्रम सुरु.
 • १ जानेवारी १९८२ – EXIM (Export-Import) Bank of India ची स्थापना
 • १२ जुलै १९८२ – NABARD (National Bank for Agriculture and Rural Development) ची स्थापना
 • सप्टेंबर १९८२ – ग्रामीण भागातील महिला व मुलांचा विकास (DWCRA , डेन्मार्कच्या मदतीने)
 • १५ ऑगस्ट १९८३ – ग्रामीण भागातील रोजगार हमी योजना (RLEGP)
 • १९८३ – डेअरी विकास कार्यक्रम (DDP)
 • १९८३ – राष्ट्रीय बियाणे कार्यक्रम (NSP)

आर्थिक वाढीचा दर –

 • संकल्पित दर – ५.2%
 • साध्य दर – ५.५%
 • योजना यशस्वी
 • या योजनेदरम्यान देशास अन्नाधानाच्या बाबतीत स्वयंपूर्ण घोषित करण्यात आले.
 • किमतीचा निर्देशांक वाढून ३४५ झाला, दरवर्षी सातत्याने भाववाढ होत राहिली.
 • औद्योगिक वृद्धीदर ७ % गाठणे अपेक्षित होते, तो फक्त ५.५ % एवढाच होता.

योजना काळातील राजकीय घडामोडी –

 • ३ ते ६ जून १९८४ – ऑपरेशन ब्लू स्टार
 • २ व ३ डिसेंबर १९८४ – भोपाळ gas दुर्घटना

अर्थशास्त्र महत्वाच्या नोट्स डाउनलोड करा

सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now