भारतातील शिक्षणासंबंधी आयोग/समित्या

भारतातील शिक्षणासंबंधी आयोग/समित्या

भारतातील शिक्षणासंबंधी आयोग/समित्या

 1. सनदी कायदा 1813
 2. एलफिन्स्टनची सरकारी पुस्तिका
 3. Committee of Public Instruction by गव्हर्नर जनरल अॅडम
 4. लाॅर्ड मेकाॅलेचा प्रस्ताव 1835
 5. चार्ल्स वुडचा खलिता (1854) भारतीय शिक्षणाचा मॅग्नाकार्टा
 1. हंटर शिक्षण आयोग (1882) प्राथमिक व माध्यमिक शिक्षणावर भर
 2. थाॅमस रॅले आयोग (1902) भारतातील विद्यापीठय शिक्षणाचा आढावा
 3. भारतीय विद्यापीठ कायदा (1904)
 4. सॅडलर आयोग (1917) विद्यापीठय शिक्षण समस्येच्या अभ्यासासाठी
 5. हार्टोग समिती (1929) प्राथमिक शिक्षणाला राष्ट्रीय महत्त्व द्यावे
 6. सार्जंट योजना (1944)
 7. राधाकृष्णन आयोग (1948)
 8. कोठारी आयोग (1964)

Bhartatil kshikshan Samitya. सनदी कायदा 1813 एलफिन्स्टनची सरकारी पुस्तिका, भारतातील शिक्षण आयोग. भारतातील शिक्षणासंबंधी समिती

इतिहास विषयाचे नोट्स डाउनलोड करा

  इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

   सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

   Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

   नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

   १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध संपूर्ण माहिती ( 1857 स्वातंत्र्य समर )

   १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध संपूर्ण माहिती ( 1857 स्वातंत्र्य समर )

   १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध संपूर्ण माहिती ( 1857 स्वातंत्र्य समर )

   हे १० मे १८५७ रोजी मीरत येथील लष्करछावणीतील बंडापासून सुरू झाले व लवकरच ते उत्तर व मध्य भारतातील अनेक ठिकाणी पसरले. हा लढा १८५७चे स्वातंत्र्यसमर, पहिला भारतीय स्वातंत्र्यलढा, शिपाई बंडाळी (इंग्लिश: Sepoy mutiny) अशा इतर नावांनीही ओळखला जातो.जवळपास वर्षभर चाललेल्या या युद्धात इंग्रजांचा विजय झाला पण या बंडामुळे भारतीय स्वातंत्र्यचळवळीला प्रारंभ झाला व ९० वर्षानंतर १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. १० मे १८५७ रोजी दिल्लीपासून ४० मैलांच्या अंतरावर मेरठ छावणीमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतीय सैनिकांनी बंड पुकारले व बघता बघता उत्तर पुर्व व मध्य भारतात पसरले. १० मेला सुरु झालेले बंड २० जुन १८५८ रोजी ग्वाल्हेर कंपनीच्या ताब्यात पडल्यानंतरच थांबले. बंडखोर शिपायांनी मेरठ काबीज केले व लागोलाग दिल्लीवर जबरदस्त हल्ला चढवून दिल्लीत बसलेले कंपनीच्या अधिकाऱ्यांना व ब्रिटिश सैन्याला चिरडले व ८१ वर्षांच्या बहादूरशहा दुसरा यास हिंदुस्थानचा बादशहा घोषित केले. 

   अवधचा मोठा भुभाग देखील शिपायांच्या ताब्याखाली आला व ब्रिटिश सैन्य घाबरले. तरी कंपनीने कुमक मागवून जुलै १८५७ मध्ये कानपूर व दिल्लीवर पुन्हा कंपनी शासन लागू केले. पण झाशी, अवध आणि लखनऊतील विद्रोह दडपण्यासाठी कंपनीला खुप वेळ लागला. १ नोव्हेंबर १८५८ ला विद्रोह दडपल्यानंतर ब्रिटिश संसदेने संपुर्ण हिंदुस्थानचा कारभार राणी व्हिक्टोरियाकडे दिला व देशातील कंपनी राज संपुष्टात आले  

   इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

    सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

    Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

    नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

    प्लासीची लढाई व बक्सार लढाई माहिती

    प्लासीची लढाई माहिती

    प्लासीची लढाई व बक्सार लढाई माहिती

    • इंग्रजांचा भारतातील  राजकीय सत्तेचा प्रारंभ.
    • 1756 अलिवर्दिखानचा उत्तराधिकारी म्हणून त्याचा नातू सिराज उद्दौला बंगालचा नवाब. त्याने ‘कासिम बाजार’येथील वखार व फोर्ट विल्यम किल्ला ताब्यात घेतला. व अंधारकोठडीची घटना
    • यात नेतृत्व:- वॉटसन व रॉबर्ट क्लाईव.
    • यांचे सैन्य बंगाल मध्ये व त्यातून नवाब व इंग्रजात वाद
    • हीच लढाई प्लासीची लढाई
    • पराभव:- नवाब
    • पराभवाची कारणे  :- मिरबक्षी , मिरजाफर, कलकत्ताचे प्रमुख अधिकारी, तसेच जगतशेठ हे इंग्रजांना फितूर.    

    23 जून 1757 रोजी रॉबर्ट क्लाइव्हच्या नेतृत्वात बंगालच्या नवाब आणि त्याच्या फ्रेंच मित्रांच्या तुलनेत ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचा प्लासीची लढाई (बंगालीतील पलाशी) एक निर्णायक विजय ठरली जी रॉबर्ट क्लाइव्हच्या कारभारामुळे शक्य झाली. मीर जाफर अली खान, जो सिराज-उद-दौलाचा सेनापती होता. युद्धामुळे कंपनीला बंगालचे नियंत्रण मिळविण्यात मदत झाली. पुढच्या शंभर वर्षांत त्यांनी संपूर्ण भारतीय उपखंड आणि म्यानमार – आणि थोडक्यात अफगाणिस्तानचा ताबा मिळविला.

    बक्सार ची लढाई :-

    मीर कासीम नवाब झाल्यानंतर बरद्वान, मिदनापूर, चितगाव जिल्ह्याची जमीनदारी त्याच्याकडे.परत मीर जाफर ला नवाबपद.त्यातून   मीर कासीम व इंग्रज यात युद्ध.मीर कासीम, अयोद्धा नवाब शुजा उद्दौला, मुघल सम्राट शाह आलम दूसरा एकत्र.बक्सार येथे नवाब व बादशाह यांचा इंग्रजांकडून एकत्रित पराभव. 

    २२ ऑक्टोबर 1764 रोजी, हेक्टर मुनरो यांच्या नेतृत्वात ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याखाली आणि बंगालचे नवाब मीर कासिम यांच्या संयुक्त सैन्यामध्ये 1763 पर्यंत बक्सरची लढाई लढली गेली. मीर जाफर यांना नवाब बनविण्यात आले. युद्धानंतर फक्त मध्ये कंपनीने बंगालमधील दुसर्‍या वेळेस. कटवा, गिरिया आणि उदयनला येथे युद्धात पराभूत झाल्यानंतर अवधचे नवाब शुजा-उद-दौला आणि मुघल बादशाह शाह आलम II यांनी काशीच्या राजा बलवंतसिंगबरोबर मीर कासिमशी युती केली. पटनाच्या पश्चिमेस 130 किलोमीटर पश्चिमेकडे गंगा नदीच्या काठी वसलेल्या बिहारमधील बक्सर या “लहान किल्ल्याचा शहर” येथे लढाई झाली; हा ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचा निर्णायक विजय होता. 1765 मध्ये अलाहाबाद कराराद्वारे युद्धाचा अंत झाला.

    युद्ध परिणाम :– 1) शाह आलम दूसरा याने कंपनी ला बंगाल, बिहार , उडीसा प्रांताचे  दिवाणी अधिकार

                         2) बादशाहला 26 लाख रु पेन्शन

                         3) शुजा उद्दौलाकडून युद्ध खंडणी 50 लाख रु.

    इतर महत्वाच्या नोट्स

     सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

     Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

     नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

     जालियनवाला बाग हत्याकांड 100 वर्षे पूर्ण

     जालियनवाला बाग हत्याकांड 100 वर्षे पूर्ण

     जालियनवाला बाग हत्याकांड 100 वर्षे पूर्ण दिनांक 13 एप्रिल 1919 रोजी ब्रिटिश-भारतात ब्रिगेडियर-जनरल रेजिनाल्ड डायर ह्याने अमृतसर (पंजाब) येथील जालियनवाला बाग ठिकाणी हे हत्याकांड घडवून आणले आणि या घटनेला यावर्षी 100 वर्षे पूर्ण होत आहेत.

     इतिहास

     सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू या दोन स्वातंत्र्यवीरांच्या सुटकेची मागणी करण्यासाठी एक घोळका दिनांक 10 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमध्ये जात होता.त्यावेळी त्यांच्यावर गोळीबार केला गेला आणि परिणामी तेव्हापासून हिंसक घटनांना सुरुवात झाली. दोन्ही बाजूंच्या प्रतिकारात्मक कारवायांच्या पार्श्वभूमीवर कारणामुळे अखेर 13 एप्रिल रोजी पंजाबमध्ये मार्शल लॉ लागू करण्यात आला. त्याचदिवशी ’बैसाखी’ हा पंजाबी सण देखील होता.हा सण साजरा करण्यासाठी प्रचंड जनसमुदाय जालीयानवाला बागेत जमला होता, जे की मार्शल लॉ लागू असल्याने नियमबाह्य होते.

     जनरल डायर याच्या हुकुमावरून लष्कराने निशस्त्र लोकांच्या सभेवर गोळीबार केला. या सभेत स्त्रिया आणि पुरूषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता. या घटनेत 379 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

      सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

      Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

      नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

      Keyword : Jaliyanawala Bagh Hatyakand in marathi, Jaliyanawala Bagh Hatyakand information in marathi. Jaliyanawala Bagh Hatyakand mahiti

      राष्ट्रीय काँग्रेसची महत्वाची अधिवेशने व त्याचे वैशिष्टे

      राष्ट्रीय काँग्रेसची महत्वाची अधिवेशने व त्याचे वैशिष्टे : पुढीलप्रमाणे आहेत

      राष्ट्रीय काँग्रेसची महत्वाची अधिवेशने व त्याचे वैशिष्टे

      1885 – मुंबई – ओमेशचंद्र बॅनर्जी – राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन

      1886 – कलकत्ता – दादाभाई नौरोजी

      1887 – मद्रास – बद्रुद्दीन तय्यबजी – पहिले मुस्लिम अध्यक्ष

      1888 – अलाहाबाद – सर जॉर्ज युल – पहिले स्काटिश अध्यक्ष

      1889 – मुंबई – सर विल्यम वेडरबर्ग – पहिले इंग्रज अध्यक्ष

      1896 – कलकत्ता – रहेमतुल्ला सयानी – या अधिवेशनात वंदेमातरम हे गीत प्रथम गायले गेले.

      1905 – बनारस – गोपाल कृष्ण गोखले – हे अधिवेशन बंगालच्या फाळणीवरुण गाजले.

      1906 – कलकत्ता – दादाभाई नौरोजी – या अधिवेशनात चतु:सूत्रीचा ठराव पास करण्यात आला.

      1907 – सूरत – राशबिहारी बोस – राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फुट पडली.

      1915 – मुंबई – लॉर्ड सचिन्द्रनाथ सिन्हा – या अधिवेशनात टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा ठराव पास करण्यात आला.

      1916 – लखनौ – अंबिकाचरण मुजूमदार – या अधिवेशनात टिळक व त्यांच्या सहकार्याना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला व मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्या लखनौ करार झाला.

      1917 – कलकत्ता – डॉ. अॅनी बेझंट – राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अश्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला.

      1920 – कलकत्ता(विशेष) – लाला लजपत रॉय – या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलनाचा ठराव मांडला.

      1920 – नागपूर – सी. राघवाचारी – या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

      1924 – बेळगांव – महात्मा गांधी – महात्मा गांधी प्रथमच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले.

      1925 – कानपूर – सरोजिनी नायडू – राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा.

      1927 – मद्रास – एम.ए. अंसारी – सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव पास करण्यात आला.

      1928 – कलकत्ता – मोतीलाल नेहरू – नेहरू रिपोर्टला मान्यता देण्यात आली.

      1929 – लाहोर– पं. जवाहरलाल नेहरू – संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव व महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली संविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली.

      1931 – कराची – सरदार पटेल – मूलभूत हक्काचा ठराव पास करण्यात आला.

      1936 – फैजपूर – जवाहरलाल नेहरू – ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन आणि शेतकरी व कामगारांच्या हिताचे ठराव पक्के करण्यात आले.

      1938 – हरिपुरा – सुभाषचंद्र बोस –

      1939 – त्रिपुरा – सुभाषचंद्र बोस –

      1940 – रामगढ – अब्दुल कलाम आझाद – वैयक्तिक सत्याग्रहाची घोषणा करण्यात आली.

      1940 – मुंबई – मौ. अबूल आझाद – चलेजाव आंदोलनाची घोषणा.

      1946 – मिरत – जे. बी. कृपलानी –

      1947 – दिल्ली – डॉ. राजेंद्रप्रसाद – भारत स्वतंत्र झाल्यानंतरचे पहिले अधिवेशन

      या विषयाशी निघडीत नोट्स व इतर महत्वाच्याच्या PDF डाउनलोड करा

       सर्व विषयाचे नोट्स डाउनलोड डाउनलोड करा Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

       महत्वाचे शब्द : राष्ट्रीय सभा अधिवेशने, Rashtry Congress Adhiveshane


       इतिहासातील वृत्तपत्रांच्या संपादकांची नावे

       इतिहासातील वृत्तपत्रांच्या संपादकांची नावे

       इतिहासातील वृत्तपत्रांच्या संपादकांची नावे व त्यांनी काढलेली वृत्तपत्रे,पक्षिके,मासिके इत्यादि. मुंबापूर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र २० जुलै इ.स. १८२८ रोजी सुरू झाले. त्यावेळची ‘बॉम्बे गॅझेट’,बॉम्बे कुरियर’ ही इंग्रजी व ‘मुंबईना समाचार’ हे गुजराती पत्र होते. तरीही मराठी वृत्तपत्राचा पाया घालून त्याची थोर परंपरा सुरू करण्याचा मान ‘दर्पण’या साप्ताहिक वृत्तपत्रासच जातो.

       भारतीय भाषांतील प्रारंभीची वृत्तपत्रे :

       भारतीय वा देशी भाषांतील वृत्तपत्र व्यवसायाचा प्रारंभही बंगालमध्ये झाला. १८१६ साली गंगाधर भट्टाचार्य या गृहस्थाने बेंगॉल गॅझेट हे वृत्तपत्र बंगाली भाषेत सुरु केले. कलकत्त्याजवळील श्रीरामपूरच्या मिशनऱ्यांनी समाचार-दर्पण सुरु केले (१८१८-४१). हिंदी भाषेचे टंकही श्रीरामपूर मिशननेच प्रथम पाडले. या मिशनने मिशन समाचार-दर्पण या साप्ताहिकाचे प्रकाशन सुरु केले. धर्मप्रचाराचा भाग म्हणूनही मिशनचीही नियतकालिके चालविली जात. सरकारी कारभारावरही त्यात टीका असे. त्यात प्रसिद्ध होणारे हिंदू धर्माविषयीचे लेखन मात्र आक्षेपार्ह आहे. १८२१ मध्ये समाचार चंद्रिका हे पत्र निघाले. सामाजिक प्रश्नांत ते पुराणमताभिमानी दृष्टिकोण प्रकट करी. भवानीचरण बॅनर्जी यांनी संवाद कौमुदी हे बंगाली वृत्तपत्र ४ डिसेंबर १८२१ रोजी सुरु केले. ‘धार्मिक, नैतिक व राजकीय विषय, देशातील अन्य घटना, देशी व परदेशी वार्ता इ. मजकूर कौमुदीत प्रसिद्ध होईल’, असे तिच्या उद्देशपत्रकांत म्हटले होते व जनतेला हार्दिक पाठिंब्याचे आवाहन केले होते. प्रसिद्ध बंगाली नेते व समाजसुधारक ⇨राजा राममोहन रॉय यांचा संवाद कौमुदीशी घनिष्ठ संबंध होता. त्यांचे पत्र म्हणूनच ते ओळखले जाई.

       संवाद कौमुदीच्या प्रकाशनाने देशी भाषांतील व विशेषतः बंगाली भाषेतील वृत्तपत्र व्यवसायाला प्रतिष्ठा प्राप्त झाली. कलकत्ता जर्नल या नामांकित इंग्रजी पत्राने कौमुदीविषयी प्रशंसापर लेख लिहिला. मात्र एशियाटिक जर्नलसारख्या प्रतिगामी वृत्तपत्राने देशी भाषेतील अशा वृत्तपत्रांच्या उदयाबद्दल नापसंती व्यक्त केली व या घटनेचे परिणाम राज्यकर्त्यांना भोगावे लागतील, असेही बजावले.

       नियतकालिके

       मुंबापूर् वर्तमान (१८२८),

       दर्पण (१८३२ बाळशास्त्री जांभेकर),

       मुंबई अखबार (१८४०),

       प्रभाकर (१८४१),

       ज्ञानसिंधू (१८४१),

       मित्रोदय (१८४४ पुणे),

       ज्ञानप्रकाश (१८४९),

       ज्ञानोदय (१८४२),

       विचारलहरी (१८५२),

       वर्तमानदिपिका (१८५३)


       मासिके

       दिग्दर्शन (१८४०),

       ज्ञानचंद्रोदय (१८४०),

       उपदेशचंद्रिका (१८४४),

       मराठी ज्ञानप्रसारक (१८५०),

       ज्ञानदर्शन (१८५४),

       पुणे पाठशाळापत्रक (१८६१),

       विविधज्ञानविस्तार (१८६७),

       दंभहारक (१८७१)

       वृत्तपत्र : संस्थापक

       प्रभाकर : भाऊ महाजन

       ज्ञानदर्शन : भाऊ महाजन

       हिंदू : बी राघवाचार्य

       दिनबंधु : कृष्णराव भालेकर

       तेज : दिनकरराव जवळकर

       निंबधमला : विष्णुशास्त्री चिपळूणकर

       ज्ञानसिंधु : विरेश्वर छत्रे

       दिनमित्र : मुकुंदराव पाटील

       इंडिया : दादाभाई नौरोजी

       प्रताप : गणेश शंकर विद्यार्थी

       इंदूप्रकाश : विष्णुशास्त्री पंडित

       बंगाली : एस एन बॅनर्जी

       सुधारक : गो ग आगरकर

       या विषयाशी निघडीत नोट्स व इतर महत्वाच्याच्या PDF डाउनलोड करा

       सर्व विषयाचे नोट्स डाउनलोड डाउनलोड करा Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

       महत्वाचे शब्द : Bharatatil Vruttapatre Tyanche Sampadak,Newspapers History, इतिहासकाळातील वृत्तपत्रे , Old newspapers in India

       भारतातील शिक्षणासंबंधी आयोग समित्या

       भारतातील शिक्षणासंबंधी आयोग समित्या

       भारतातील शिक्षणासंबंधी आयोग समित्या

       1. सनदी कायदा 1813
       2. एलफिन्स्टनची सरकारी पुस्तिका
       3. Committee of Public Instruction by गव्हर्नर जनरल अॅडम
       4. लाॅर्ड मेकाॅलेचा प्रस्ताव 1835
       5. चार्ल्स वुडचा खलिता (1854) भारतीय शिक्षणाचा मॅग्नाकार्टा
       1. हंटर शिक्षण आयोग (1882) प्राथमिक व माध्यमिक शिक्षणावर भर
       2. थाॅमस रॅले आयोग (1902) भारतातील विद्यापीठय शिक्षणाचा आढावा
       3. भारतीय विद्यापीठ कायदा (1904)
       4. सॅडलर आयोग (1917) विद्यापीठय शिक्षण समस्येच्या अभ्यासासाठी
       5. हार्टोग समिती (1929) प्राथमिक शिक्षणाला राष्ट्रीय महत्त्व द्यावे
       6. सार्जंट योजना (1944)
       7. राधाकृष्णन आयोग (1948)
       8. कोठारी आयोग (1964)

       सर्व विषयाच्या नोट्स व इतर महत्वाच्याच्या PDF डाउनलोड करा

        सर्व विषयाचे नोट्स डाउनलोड डाउनलोड करा Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

        मुख्य शब्द : Bharatatil Shikshanatil Ayog Samitya.

        महाराष्ट्राचा इतिहास नोट्स PDF डाउनलोड करा

        महाराष्ट्राचा इतिहास नोट्स PDF डाउनलोड करा

        महाराष्ट्राचा इतिहास नोट्स PDF डाउनलोड करा

        सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

        Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

        नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

        महाराष्ट्राचा इतिहास नोट्स PDF डाउनलोड करा, महाराष्ट्र ची राजेशाही, स्वराज्य कल, पेशवेकाळ व सयुक्त महाराष्ट्र इतिहास History Of Maharashtra Notes PDF

        मध्ययुगीन भारताचा इतिहास नोट्स डाउनलोड करा

        मध्ययुगीन भारताचा इतिहास नोट्स डाउनलोड करा

        मध्ययुगीन भारताचा इतिहास नोट्स डाउनलोड करा

         सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

         Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

         नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

         मध्ययुगीन भारताचा इतिहास नोट्स PDF डाउनलोड करा, भारताची राजेशाही, भारताचा मुघल, पेशवेकाळ व महाराष्ट्र इतिहास Medieval History Of India Notes PDF Download

         आधुनिक भारताचा इतिहास नोट्स PDF डाउनलोड करा

         आधुनिक भारताचा इतिहास नोट्स PDF डाउनलोड करा

         आधुनिक भारताचा इतिहास नोट्स PDF डाउनलोड करा

         सर्व विषयाच्या नोट्स PDF डाउनलोड करा

         सर्व विषयाचे नोट्स डाउनलोड डाउनलोड करा Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

         आधुनिक भारताचा इतिहास नोट्स PDF डाउनलोड करा, भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास, टिळक व गांधी युग भारतीय राष्ट्रीय सभा. Modern History Of India Notes PDF