भारतीय क्रांतिकारक शहीद भगतसिंग

भारतीय क्रांतिकारक शहीद भगतसिंग

भारतीय क्रांतिकारक शहीद भगतसिंग

भगतसिंगांचा वाचनव्यासंग दांडगा होता. क्रांतिसाहित्याने त्यांना जणू झपाटून टाकले होते. सचिंद्रनाथ संन्याल यांचे ‘बंदी जीवन’ हे त्यांना प्रभावित करणारे बहुधा पहिले पुस्तक असावे. ऑस्कर वाईल्डचे ‘व्हेरा-दि निहिलिस्ट’, क्रोपोटकिनचे ‘मेमॉयर्स’, मॅझिनी व गॅरिबाल्डी यांची चरित्रे, वॉल्टेर, रूसो व बकुनिनचे अनेक ग्रंथ त्यांनी वाचले होते.

त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची यादी फार मोठी होती. त्या यादीत विक्टर ह्युगोची ‘ला मिझरेबल’, हॉलकेनचे ‘इटर्नल सिटी’, अप्टन सिंक्लेअरची ‘क्राय फॉर जस्टिस’, रॉस्पिनची ‘व्हॉट नेव्हर हॅपन्ड’, गॉर्कीची ‘मदर’ ह्या कादंबऱ्याही होत्या. देशातील व परदेशातील अनेक देशभक्तांची चरित्रे व समाजक्रांतीचे अनेक ग्रंथ त्यांनी अभ्यासले होते.

जर क्रांती व्ह्यायला हवी असेल तर समाजाची मानसिकता त्या दृष्टीने घडविली पाहिजे व तसे होण्यासाठी क्रांतिवाङ्मयाचा प्रसार अपरिहार्य़ आहे असे त्यांचे मत होते.

त्यांनी सावरकरलिखित मॅझिनीचे चरित्र वाचले होते. त्यांनी फ्रेंच क्रांतिकारक व्हिलांत वाचला होता. साम्यवादी समाजरचना व शोषणमुक्त सक्षम समाज घडविण्यासाठी त्यांनी लेनिन, मार्क्स, टॉलस्टाॅय, गॉर्की, बकुनिन यांचे साहित्य अभ्यासले होते.

महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग

भगतसिंग हे उत्तम वक्ते होते. १९२४-२५ च्या सुमारास बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनास ते ‘अकाली’ या पत्राचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. अधिवेशन संपल्यानंतर ते त्यांचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीवर म्हणजे रायगडावर गेले. तेथे त्यांनी तेथील पवित्र माती आपल्या कपाळाला लावून स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार केला.

पत्रकार म्हणून त्यांनी ‘वीर अर्जुन’, ‘प्रताप’, इत्यादी दैनिकांत काम केले होते. पत्रकारिता करतानाच त्यांच्यातला लेखक जागा झाला.

स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकार्य

सोहनसिंग जोशी यांचे ‘कीर्ती’, कानपूरचे ‘प्रभा’, दिल्लीचे ‘महारथी’ नि अलाहाबादचे ‘चाँद’ या नियतकालिकात ते लेखन करत असत. त्यांनी आयरिश क्रांतिकारक डॉन ब्रिन याच्या पुस्तकाचा अनुवाद ‘मेरा आयरिश स्वतंत्रता संग्राम’ हा बलवंतसिंग या नावाने केला. लाला लजपतराय यांच्या मृत्यूनंतर त्यांनी ‘चाँद’ च्या फाशी विशेषांकात ‘निर्भय’, ‘बलवंत’, व ‘ब्रिजेश’ या नावाने अनेक लेख लिहिले.

महाविद्यालयीन जीवनात पंजाबातील हिंदी साहित्य संमेलनानिमित्त पारितोषिकासाठी विद्यार्थ्यांकडून मागवलेल्या निबंधांत ‘नॅशनल कॉलेज’ तर्फे पाठविण्यात आलेला भगतसिंगांचा निबंध अव्वल ठरला होता. भगतसिंगांनी ‘राणा प्रताप’, ‘दुर्दशा’,’ सम्राट चंद्रगुप्त’ या नाटकांतून भूमिकाही केल्या होत्या; पुढे सरकारने या नाटकांवर बंदी घातली.

९ सप्टेंबर १९२५ रोजी भगतसिंगांच्या पुढाकाराने व आग्रहाने क्रांतिकारकांच्या गुप्त संघटनेचे नाव ‘हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ असे ठेवण्यात आले.

असोसिएशन हा भाग समाजप्रबोधन, माहितीपत्रके, साहित्य सामग्रीची जमवाजमव, भूमिगतांना आश्रय देणे यासाठी तर ‘आर्मी’ हा भाग प्रत्यक्ष क्रांतिकार्यासाठी असे विभाजन केले गेले.

हुतात्मा चंद्रशेखर आझाद हे मुख्य समन्वयक व सेनेचे ‘मुख्य सेनापती’ तर भगतसिंग यांच्यावर संघटनेचे समन्वयक व दोहोंचे सदस्य व नियंत्रक अशी कामगिरी सोपविली गेली.

या संघटनेचे स्वप्न व एकमेव ध्येय म्हणजे सशस्त्र क्रांतीद्वारे इंग्रज सरकार उलथून टाकून भारतीय संघराज्याची स्थापना केली

भारतीय समाज सुधारक शहीद भगतसिंगांचे विचार

बालपण आजोबांच्या आर्यसमाजी संस्कारात घालवलेले व शालेय जीवनात रोज नित्य नेमाने सकाळ व सायंकाळ प्रार्थना करणारे व गायत्री मंत्रांचा जप करणारे भगतसिंग पुढे क्रांतिपर्वात पूर्णपणे निरीश्वरवादी झाले. यामुळे त्यांना ‘आत्मप्रौढी व घमेंड यांची बाधा झाली आहे असेही उठवले गेले. मात्र ऑक्टोबर १९३० मध्ये त्यांनी लिहिलेले “मी निरीश्वरवादी का?” हे प्रकटन वाचल्यावर त्यांच्या महान व्यक्तिमत्त्वाची ओळख पटते.

समाज हा प्रगत असावा; प्रत्येक घटना, समज वा परंपरा या विचाराच्या ऐरणीवर घासून त्या पटल्या तरच स्वीकाराव्या, उगाच अंधश्रद्धेपोटी वा कुणाच्या व्यक्तिपूजेखातर कसोटीवर न उतरवता कोणतीही गोष्ट स्वीकारू नये, समाज हा समभावी व शोषणमुक्त असावा, समाजरचनेत व देशाच्या रचनेत धर्म, जात हे आड येऊ नयेत, उगाच कुणाचे स्तोम माजवून जनतेने आपल्या बुद्धीचा कस न लावता दबावामुळे पटत नसले तरी कुणीतरी मोठे सांगत आहे म्हणून जे वास्तविक नाही वा ज्याला तात्त्विक पाया नाही असे काही स्वीकारू नये.

भारतीय क्रांतिकारक शहीद भगतसिंग आणि गांधीजी

समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, जन्म-पुनर्जन्म, ८४ लक्ष फेरे व त्यातून मुक्ती, मृत्यूनंतरचे जीवन, वगरे तर्कशुद्ध नसलेल्या गोष्टींवर अंधविश्वास न ठेवणारा कणखर समाज निर्माण व्हावा यासाठीच त्यांचा हा प्रयत्‍न होता. कामगार हा राज्याचा मुख्य घटक असावा, त्याचे भांडवलदारांकडून शोषण होऊ नये व राज्यकारभारात त्याला स्थान असावे असे भगतसिंगांचे आग्रही प्रतिपादन होते.

अत्यंत प्रतिकूल व कष्टसाध्य असे जीवन समोर असताना ज्याचा मृत्यूनंतर स्वर्गप्राप्तीवर वा या जन्मात सत्कार्य केले असता मोक्ष मिळतो वा या जन्मात केलेल्या कृत्याचे फळ म्हणून पुढील जन्म अत्यंत सुखाचा जातो या गोष्टींवर विश्वास आहे त्याला समोर असलेला मृत्यू पुढील प्राप्तीच्या ओढीने सुसह्य वाटू शकतो.

मात्र ज्याचा या गोष्टींवर जराही विश्वास नाही परंतु जो मातृभूमीला परदास्यातून मुक्त करणे व समाजाला शोषणातून मुक्त करून मानाचे जीवन प्राप्त करून देणे हेच आपल्या आयुष्याचे प्रथम व अखेरचे ध्येय समजतो. त्याचे जीवन हे अधिक खडतर परंतु अर्थपूर्ण असते असा त्यांचा सिंद्धान्त होता.

जगात जर सर्वांत भयानक पाप असेल तर ते गरिबी व सर्वांत मोठा शाप कोणता असेल तर तो दास्य हाच आहे.

आणि या दास्याला ईश्वरी कोप मानून त्या दास्यातून मुक्त होण्यासाठी बलिदानाला सज्ज होण्याऐवजी ईश्वराची करुणा भाकणे हे मूर्खपणा व पळपुटेपणाचे लक्षण आहे;

तसेच मुक्तीसाठी ठोस प्रयत्‍न न करता केवळ प्राक्तनाला दोष देणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे असे त्यांनी प्रतिपादिले.

सुमारे दहा पाने भरेल इतके मोठे हे प्रकटन अत्यंत प्रभावी व भारून टाकणारे आहे

भारतीय क्रांतिकारक शहीद भगतसिंग आणि गांधीजी

भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना जी फाशी झाली ती कायदेमंडळात बाँब फ़ेकला म्हणून नाही, तर सौंडर्सच्या हत्येच्या आरोपाखाली त्यांना फाशी देण्यात आली.

ही हत्या १७ डिसेंबर, १९२८ रोजी झाली होती. त्यावर खटला चालवण्यात आला आणि त्याच्या अखेरीस २३ मार्च, १९३१ रोजी फासावर लटकविण्यात आले. .

महात्मा गांधींनी या संदर्भात लक्ष घालावे अशी त्यांना विनंती करण्यात आली. भगतसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांची फाशीच्या शिक्षेतून सुटका व्हावी म्हणून १९ मार्च रोजी गांधींनी दिल्ली येथे व्हॉइसरॉय लॉर्ड आयर्विन यांची भेट घेतली. पण गांधींच्या रदबदलीचा काही उपयोग झाला नाही.

परंतु या रदबदलीची बातमी पंजाबच्या तत्कालीन गव्हर्नरला मिळाली. ही रदबदली कदाचित यशस्वी होईल असे त्यांना वाटले.

त्यामुळे २४ मार्च हा फाशीचा दिवस ठरला असूनही, आदल्या दिवशी रात्रीच लाहोरच्या तुरुंगात त्यांना फाशी देण्याचा कार्यक्रम उरकून घेण्यात आला.

मुख्य म्हणजे २३ मार्च रोजीच गांधी यांनी आयर्विन यांना पत्र लिहून भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची फाशीची शिक्षा रद्द करण्याविषयीचे कळकळीचे आवाहन केले.

पण त्याचा काही परिणाम झाला नाही.

कालांतराने बीबीसीवर दिलेल्या मुलाखतीत आयर्विन यांनी आपल्या ताठरपणाचे समर्थन केले – “कायद्याची अंमलबजावणी करणे हे माझे कर्तव्य होते.

मी भगतसिंगांसंबंधीचे कागदपत्र पाहिले व न्यायाची अंमलबजावणी करण्यात ढवळाढवळ न करण्याचे ठरवले.”

भगतसिंगांचा मार्ग जरी गांधीजींना पसंत नव्हता तरी त्यांच्याबद्दल गांधीजींना प्रचंड आदर होता.

त्यांच्या फाशीनंतर ’यंग इंडिया’मध्ये लेख लिहून गांधीजींनी त्यांच्या हौतात्म्याला आदरांजली वाहली

भारतीय क्रांतिकारक शहीद भगतसिंग आणि नास्तिकत्व

ब्रिटिशांच्या मनात धडकी भरवणारे शहीद भगतसिंग हे नास्तिक नसल्याचा दावा उच्च न्यायालयाच्या संग्रहालयात आयोजित एका प्रदर्शनात करण्यात आला आहे.

कम्युनिझमवर निष्ठा असणारे भगतसिंह आस्तिक असल्याचे म्हटल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

भगतसिंग हे नास्तिक असल्याचा दावा अनेकांनी केला आहे. लाहोरच्या तुरुंगात असताना भगतसिंग यांनी या गीतेचे अध्ययन केले होते.

नास्तिक माणसाला जगातील कुठल्याही धार्मिक पु्स्तकाचा अभ्यास करण्याचे स्वातंत्र्य आहे. शिवाय भगवद्गीता हे धार्मिक पुस्तक नाही.

संग्रहालयाचे क्युरेटर नरुल हुड्डा यांनी हा दावा केला असून, २७ सप्टेंबर २००८ ते ३१ मार्च २००९ पर्यंत भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित अनेक ग्रंथ ठेवण्यात आले आहेत.

यातच ८ एप्रिल १९२९ मध्ये त्यांनी सेंट्रल असेंब्लीत फेकलेल्या बॉम्बच्या अवशेषांसह एक गीताही ठेवण्यात आली आहे.

या गीतेवर भगतसिंग सेंट्रल तुरुंगात लाहोर असे लिहिण्यात आले आहे. परंतु भगतसिंग यांच्यावर अनेक पुस्तके लिहिलेल्या प्रोफेसर चमनलाल यांनी मात्र ते नास्तिक असल्याचा दावा केला आहे.

आणि या दाव्यांत तथ्य आहे, हे भगतसिंगांच्या “मी नास्तिक का झालो” या निबंधावरून स्पष्ट होते.

शहीद भगतसिंगांचा “मी नास्तिक का झालो” हा निबंध प्रसिद्ध आहे. त्यामुळे भगतसिंग नास्तिकच होते यांत शंका नाही.

या निबंधामुळे भगतसिंग नास्तिक आहेत की नाहीत हा वाद बंद झाला.

भारतीय क्रांतिकारक शहीद भगतसिंग आणि गांधीजी क्रांतिकार्यात सहभाग

सुखदेव हिंदुस्थान सोशियालिस्ट रिपब्लिक असोसियेशनमधील एक नेता म्हणून त्यांच्या चळवळीत सक्रिय सहभागी होता. त्यांनी भारतीय इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी तसेच रशियन राज्यक्रांती व जागतिक क्रांतिकारी साहित्याची छाननी करण्यासाठी लाहोरच्या राष्ट्रीय महाविद्यालयात प्रवेश घेतला असे म्हणतात.

भगत सिंग, कॉम्रेड राम चंद्र व भगवती सिंग व्होरा यांच्याबरोबर त्यांनी लाहोरमध्ये नौजवान भारत सभेची स्थापना केली. तरुणांना स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय करणे,

शास्त्रीय विचारपद्धतीचा अवलंब करणे, जातिव्यवस्थेविरुद्ध-अस्पृश्यतेविरुद्ध लढा देणे हे या संघटेनेचे मुख्य उद्दिष्ट होते.

सुखदेव यांच्यावर पंडित राम प्रसाद बिस्मील आणि चंद्रशेखर आझाद यांचा प्रभाव होता. सुखदेवने इ. स. १९२९ मध्ये तुरुंगात कैद्यांना देण्यात येणाऱ्या अमानवीय वागणुकीविरुद्ध तुरुंग उपोषणातही भाग घेतला होता.

त्यांचे फाशीपूर्वी महात्मा गांधीना सशस्त्र क्रांतिकारी मार्गाचे समर्थन करणारे पत्र, हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील दोन मुख्य विचारधारांच्या विचारप्रणालींवर प्रकाश टाकते.

त्यांच्या कार्यामुळे पंजाबमधील लुधियाना शहारातील त्यांच्या शाळेचे नाव अमर झाले.

इतर भारतीय समाज सुधारक शहीद भगतसिंग

इतर महत्वाच्या लिंक्स

सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

भारतीय समाज सुधारक शहीद भगतसिंग, Bhartiy Krantikarak Shahid bhagatsing

प्लासीची लढाई व बक्सार लढाई माहिती

प्लासीची लढाई माहिती

प्लासीची लढाई व बक्सार लढाई माहिती

 • इंग्रजांचा भारतातील  राजकीय सत्तेचा प्रारंभ.
 • 1756 अलिवर्दिखानचा उत्तराधिकारी म्हणून त्याचा नातू सिराज उद्दौला बंगालचा नवाब. त्याने ‘कासिम बाजार’येथील वखार व फोर्ट विल्यम किल्ला ताब्यात घेतला. व अंधारकोठडीची घटना
 • यात नेतृत्व:- वॉटसन व रॉबर्ट क्लाईव.
 • यांचे सैन्य बंगाल मध्ये व त्यातून नवाब व इंग्रजात वाद
 • हीच लढाई प्लासीची लढाई
 • पराभव:- नवाब
 • पराभवाची कारणे  :- मिरबक्षी , मिरजाफर, कलकत्ताचे प्रमुख अधिकारी, तसेच जगतशेठ हे इंग्रजांना फितूर.    

23 जून 1757 रोजी रॉबर्ट क्लाइव्हच्या नेतृत्वात बंगालच्या नवाब आणि त्याच्या फ्रेंच मित्रांच्या तुलनेत ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचा प्लासीची लढाई (बंगालीतील पलाशी) एक निर्णायक विजय ठरली जी रॉबर्ट क्लाइव्हच्या कारभारामुळे शक्य झाली. मीर जाफर अली खान, जो सिराज-उद-दौलाचा सेनापती होता. युद्धामुळे कंपनीला बंगालचे नियंत्रण मिळविण्यात मदत झाली. पुढच्या शंभर वर्षांत त्यांनी संपूर्ण भारतीय उपखंड आणि म्यानमार – आणि थोडक्यात अफगाणिस्तानचा ताबा मिळविला.

बक्सार ची लढाई :-

मीर कासीम नवाब झाल्यानंतर बरद्वान, मिदनापूर, चितगाव जिल्ह्याची जमीनदारी त्याच्याकडे.परत मीर जाफर ला नवाबपद.त्यातून   मीर कासीम व इंग्रज यात युद्ध.मीर कासीम, अयोद्धा नवाब शुजा उद्दौला, मुघल सम्राट शाह आलम दूसरा एकत्र.बक्सार येथे नवाब व बादशाह यांचा इंग्रजांकडून एकत्रित पराभव. 

२२ ऑक्टोबर 1764 रोजी, हेक्टर मुनरो यांच्या नेतृत्वात ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याखाली आणि बंगालचे नवाब मीर कासिम यांच्या संयुक्त सैन्यामध्ये 1763 पर्यंत बक्सरची लढाई लढली गेली. मीर जाफर यांना नवाब बनविण्यात आले. युद्धानंतर फक्त मध्ये कंपनीने बंगालमधील दुसर्‍या वेळेस. कटवा, गिरिया आणि उदयनला येथे युद्धात पराभूत झाल्यानंतर अवधचे नवाब शुजा-उद-दौला आणि मुघल बादशाह शाह आलम II यांनी काशीच्या राजा बलवंतसिंगबरोबर मीर कासिमशी युती केली. पटनाच्या पश्चिमेस 130 किलोमीटर पश्चिमेकडे गंगा नदीच्या काठी वसलेल्या बिहारमधील बक्सर या “लहान किल्ल्याचा शहर” येथे लढाई झाली; हा ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचा निर्णायक विजय होता. 1765 मध्ये अलाहाबाद कराराद्वारे युद्धाचा अंत झाला.

युद्ध परिणाम :– 1) शाह आलम दूसरा याने कंपनी ला बंगाल, बिहार , उडीसा प्रांताचे  दिवाणी अधिकार

                     2) बादशाहला 26 लाख रु पेन्शन

                     3) शुजा उद्दौलाकडून युद्ध खंडणी 50 लाख रु.

इतर महत्वाच्या नोट्स

  सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

  Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

  नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

  जालियनवाला बाग हत्याकांड 100 वर्षे पूर्ण

  जालियनवाला बाग हत्याकांड 100 वर्षे पूर्ण

  जालियनवाला बाग हत्याकांड 100 वर्षे पूर्ण दिनांक 13 एप्रिल 1919 रोजी ब्रिटिश-भारतात ब्रिगेडियर-जनरल रेजिनाल्ड डायर ह्याने अमृतसर (पंजाब) येथील जालियनवाला बाग ठिकाणी हे हत्याकांड घडवून आणले आणि या घटनेला यावर्षी 100 वर्षे पूर्ण होत आहेत.

  इतिहास

  सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू या दोन स्वातंत्र्यवीरांच्या सुटकेची मागणी करण्यासाठी एक घोळका दिनांक 10 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमध्ये जात होता.त्यावेळी त्यांच्यावर गोळीबार केला गेला आणि परिणामी तेव्हापासून हिंसक घटनांना सुरुवात झाली. दोन्ही बाजूंच्या प्रतिकारात्मक कारवायांच्या पार्श्वभूमीवर कारणामुळे अखेर 13 एप्रिल रोजी पंजाबमध्ये मार्शल लॉ लागू करण्यात आला. त्याचदिवशी ’बैसाखी’ हा पंजाबी सण देखील होता.हा सण साजरा करण्यासाठी प्रचंड जनसमुदाय जालीयानवाला बागेत जमला होता, जे की मार्शल लॉ लागू असल्याने नियमबाह्य होते.

  जनरल डायर याच्या हुकुमावरून लष्कराने निशस्त्र लोकांच्या सभेवर गोळीबार केला. या सभेत स्त्रिया आणि पुरूषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता. या घटनेत 379 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

   सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

   Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

   नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

   Keyword : Jaliyanawala Bagh Hatyakand in marathi, Jaliyanawala Bagh Hatyakand information in marathi. Jaliyanawala Bagh Hatyakand mahiti

   राष्ट्रीय काँग्रेसची महत्वाची अधिवेशने व त्याचे वैशिष्टे

   राष्ट्रीय काँग्रेसची महत्वाची अधिवेशने व त्याचे वैशिष्टे : पुढीलप्रमाणे आहेत

   राष्ट्रीय काँग्रेसची महत्वाची अधिवेशने व त्याचे वैशिष्टे

   1885 – मुंबई – ओमेशचंद्र बॅनर्जी – राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन

   1886 – कलकत्ता – दादाभाई नौरोजी

   1887 – मद्रास – बद्रुद्दीन तय्यबजी – पहिले मुस्लिम अध्यक्ष

   1888 – अलाहाबाद – सर जॉर्ज युल – पहिले स्काटिश अध्यक्ष

   1889 – मुंबई – सर विल्यम वेडरबर्ग – पहिले इंग्रज अध्यक्ष

   1896 – कलकत्ता – रहेमतुल्ला सयानी – या अधिवेशनात वंदेमातरम हे गीत प्रथम गायले गेले.

   1905 – बनारस – गोपाल कृष्ण गोखले – हे अधिवेशन बंगालच्या फाळणीवरुण गाजले.

   1906 – कलकत्ता – दादाभाई नौरोजी – या अधिवेशनात चतु:सूत्रीचा ठराव पास करण्यात आला.

   1907 – सूरत – राशबिहारी बोस – राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फुट पडली.

   1915 – मुंबई – लॉर्ड सचिन्द्रनाथ सिन्हा – या अधिवेशनात टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा ठराव पास करण्यात आला.

   1916 – लखनौ – अंबिकाचरण मुजूमदार – या अधिवेशनात टिळक व त्यांच्या सहकार्याना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला व मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्या लखनौ करार झाला.

   1917 – कलकत्ता – डॉ. अॅनी बेझंट – राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अश्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला.

   1920 – कलकत्ता(विशेष) – लाला लजपत रॉय – या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलनाचा ठराव मांडला.

   1920 – नागपूर – सी. राघवाचारी – या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

   1924 – बेळगांव – महात्मा गांधी – महात्मा गांधी प्रथमच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले.

   1925 – कानपूर – सरोजिनी नायडू – राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा.

   1927 – मद्रास – एम.ए. अंसारी – सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव पास करण्यात आला.

   1928 – कलकत्ता – मोतीलाल नेहरू – नेहरू रिपोर्टला मान्यता देण्यात आली.

   1929 – लाहोर– पं. जवाहरलाल नेहरू – संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव व महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली संविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली.

   1931 – कराची – सरदार पटेल – मूलभूत हक्काचा ठराव पास करण्यात आला.

   1936 – फैजपूर – जवाहरलाल नेहरू – ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन आणि शेतकरी व कामगारांच्या हिताचे ठराव पक्के करण्यात आले.

   1938 – हरिपुरा – सुभाषचंद्र बोस –

   1939 – त्रिपुरा – सुभाषचंद्र बोस –

   1940 – रामगढ – अब्दुल कलाम आझाद – वैयक्तिक सत्याग्रहाची घोषणा करण्यात आली.

   1940 – मुंबई – मौ. अबूल आझाद – चलेजाव आंदोलनाची घोषणा.

   1946 – मिरत – जे. बी. कृपलानी –

   1947 – दिल्ली – डॉ. राजेंद्रप्रसाद – भारत स्वतंत्र झाल्यानंतरचे पहिले अधिवेशन

   या विषयाशी निघडीत नोट्स व इतर महत्वाच्याच्या PDF डाउनलोड करा

    सर्व विषयाचे नोट्स डाउनलोड डाउनलोड करा Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

    महत्वाचे शब्द : राष्ट्रीय सभा अधिवेशने, Rashtry Congress Adhiveshane


    इतिहासातील वृत्तपत्रांच्या संपादकांची नावे

    इतिहासातील वृत्तपत्रांच्या संपादकांची नावे

    इतिहासातील वृत्तपत्रांच्या संपादकांची नावे व त्यांनी काढलेली वृत्तपत्रे,पक्षिके,मासिके इत्यादि. मुंबापूर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र २० जुलै इ.स. १८२८ रोजी सुरू झाले. त्यावेळची ‘बॉम्बे गॅझेट’,बॉम्बे कुरियर’ ही इंग्रजी व ‘मुंबईना समाचार’ हे गुजराती पत्र होते. तरीही मराठी वृत्तपत्राचा पाया घालून त्याची थोर परंपरा सुरू करण्याचा मान ‘दर्पण’या साप्ताहिक वृत्तपत्रासच जातो.

    भारतीय भाषांतील प्रारंभीची वृत्तपत्रे :

    भारतीय वा देशी भाषांतील वृत्तपत्र व्यवसायाचा प्रारंभही बंगालमध्ये झाला. १८१६ साली गंगाधर भट्टाचार्य या गृहस्थाने बेंगॉल गॅझेट हे वृत्तपत्र बंगाली भाषेत सुरु केले. कलकत्त्याजवळील श्रीरामपूरच्या मिशनऱ्यांनी समाचार-दर्पण सुरु केले (१८१८-४१). हिंदी भाषेचे टंकही श्रीरामपूर मिशननेच प्रथम पाडले. या मिशनने मिशन समाचार-दर्पण या साप्ताहिकाचे प्रकाशन सुरु केले. धर्मप्रचाराचा भाग म्हणूनही मिशनचीही नियतकालिके चालविली जात. सरकारी कारभारावरही त्यात टीका असे. त्यात प्रसिद्ध होणारे हिंदू धर्माविषयीचे लेखन मात्र आक्षेपार्ह आहे. १८२१ मध्ये समाचार चंद्रिका हे पत्र निघाले. सामाजिक प्रश्नांत ते पुराणमताभिमानी दृष्टिकोण प्रकट करी. भवानीचरण बॅनर्जी यांनी संवाद कौमुदी हे बंगाली वृत्तपत्र ४ डिसेंबर १८२१ रोजी सुरु केले. ‘धार्मिक, नैतिक व राजकीय विषय, देशातील अन्य घटना, देशी व परदेशी वार्ता इ. मजकूर कौमुदीत प्रसिद्ध होईल’, असे तिच्या उद्देशपत्रकांत म्हटले होते व जनतेला हार्दिक पाठिंब्याचे आवाहन केले होते. प्रसिद्ध बंगाली नेते व समाजसुधारक ⇨राजा राममोहन रॉय यांचा संवाद कौमुदीशी घनिष्ठ संबंध होता. त्यांचे पत्र म्हणूनच ते ओळखले जाई.

    संवाद कौमुदीच्या प्रकाशनाने देशी भाषांतील व विशेषतः बंगाली भाषेतील वृत्तपत्र व्यवसायाला प्रतिष्ठा प्राप्त झाली. कलकत्ता जर्नल या नामांकित इंग्रजी पत्राने कौमुदीविषयी प्रशंसापर लेख लिहिला. मात्र एशियाटिक जर्नलसारख्या प्रतिगामी वृत्तपत्राने देशी भाषेतील अशा वृत्तपत्रांच्या उदयाबद्दल नापसंती व्यक्त केली व या घटनेचे परिणाम राज्यकर्त्यांना भोगावे लागतील, असेही बजावले.

    नियतकालिके

    मुंबापूर् वर्तमान (१८२८),

    दर्पण (१८३२ बाळशास्त्री जांभेकर),

    मुंबई अखबार (१८४०),

    प्रभाकर (१८४१),

    ज्ञानसिंधू (१८४१),

    मित्रोदय (१८४४ पुणे),

    ज्ञानप्रकाश (१८४९),

    ज्ञानोदय (१८४२),

    विचारलहरी (१८५२),

    वर्तमानदिपिका (१८५३)


    मासिके

    दिग्दर्शन (१८४०),

    ज्ञानचंद्रोदय (१८४०),

    उपदेशचंद्रिका (१८४४),

    मराठी ज्ञानप्रसारक (१८५०),

    ज्ञानदर्शन (१८५४),

    पुणे पाठशाळापत्रक (१८६१),

    विविधज्ञानविस्तार (१८६७),

    दंभहारक (१८७१)

    वृत्तपत्र : संस्थापक

    प्रभाकर : भाऊ महाजन

    ज्ञानदर्शन : भाऊ महाजन

    हिंदू : बी राघवाचार्य

    दिनबंधु : कृष्णराव भालेकर

    तेज : दिनकरराव जवळकर

    निंबधमला : विष्णुशास्त्री चिपळूणकर

    ज्ञानसिंधु : विरेश्वर छत्रे

    दिनमित्र : मुकुंदराव पाटील

    इंडिया : दादाभाई नौरोजी

    प्रताप : गणेश शंकर विद्यार्थी

    इंदूप्रकाश : विष्णुशास्त्री पंडित

    बंगाली : एस एन बॅनर्जी

    सुधारक : गो ग आगरकर

    या विषयाशी निघडीत नोट्स व इतर महत्वाच्याच्या PDF डाउनलोड करा

    सर्व विषयाचे नोट्स डाउनलोड डाउनलोड करा Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

    महत्वाचे शब्द : Bharatatil Vruttapatre Tyanche Sampadak,Newspapers History, इतिहासकाळातील वृत्तपत्रे , Old newspapers in India

    महाराष्ट्र समाजसुधारक डॉ बाबासाहेब आंबेडकर माहिती जीवन

    महाराष्ट्र समाजसुधारक डॉ बाबासाहेब आंबेडकर

    महाराष्ट्र समाजसुधारक डॉ बाबासाहेब आंबेडकर

    जन्म :- 14 एप्रिल 1891 रोजी इंदूजवळील महू(मध्यप्रदेश) येथे झाला.

    पुर्ण नाव :- भीमराव रामजी सपकाळ

    वडिल :- रामजी गोलाजी सपकाळ

    आई :- भीमाबाई रामजी सपकाळ(आंबेडकर हे 14 वे अपत्य होते).

    मुळ गाव :- आंबावडे(जि. रत्नागिरी)

    प्राथमिक शिक्षण :- प्राथमिक शिक्षण सातारा व माध्यमिक

    2 जानेवारी 1908 रोजी शिक्षण एलफिस्टन हायस्कूल मुंबई मध्ये मॅट्रीक उत्तीर्ण झाले.

    अस्पृश्य समाजातील पहिला मॅट्रीक उत्तीर्ण म्हणून गुरूवर्य क.अ. केळूसकर व बोले यांनी सत्कार केला.

    एप्रिल 1908 मध्ये दापोलीला भिकू वलंगकरांच्या रामू ऊर्फ रमाबाई यांच्याशी विवाह झाला.

    13 जानेवारी 1913 पार्शियन व इंग्रजी विषयात पदवी घेतली (एलफिस्टन).सयाजीराव गायकवाड यांची शिष्यवृत्ती घेवून कोलंबिया विद्यापीठात (अमेरिका) प्रवेश घेतला.

    1915- अॅडमिनिस्ट्रेशन अॅण्ड फायनान्स ऑफ दी इस्ट इंडिया कंपनी हा प्रबंध सादर व एम.ए.ची पदवी.प्रोव्हेन्शियन डिसेंट्रलायझेशन ऑफ इंपीरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया 1921 मध्ये एम.एस.सी. पदवी व त्यांनी 1923 मध्ये बॅरीस्टर ही पदवी.

    आंबेडकर यांनी सनातन्याविरूध्दात पहिलालढा – महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह केला.

    13 ऑक्टोबर 1929 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एस. एम. जोशी याच्या नेतृत्वाखाली पुण्याचा पर्वती मंदिरात प्रवेश करण्यासाठी पहिला सत्याग्रह केला.

    2 मार्च 1930 आंबेडकराच्या नेतृत्वाखाली दादासाहेब गायकवाड यांनी काळाराम मंदिर सत्याग्रह केला.

    1924 ‘बहिष्कृत मेळा’ हे वृत्तपत्र सूरू केले.

    19 ऑक्टोबर 1935 मध्ये नाशिक जिल्ह्यात येवले येथे भरलेल्या अखिल भारतीय मुंबई अस्पृश्य परिषदेच्या अध्यक्षीय भाषणात घोषणा केली.

    निधन :- 6 डिसेंबर 1956(दिल्ली)

    बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन दिन महापरिनिर्वान दिन म्हणून साजरा करतात.

    या विषयाशी निघडीत नोट्स व इतर महत्वाच्याच्या PDF डाउनलोड करा

    सर्व विषयाचे नोट्स डाउनलोड डाउनलोड करा Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

    महत्वाचे शब्द : ​​​​महाराष्ट्र समाजसुधारक बाबासाहेब आंबेडकर परिचय,बाबासाहेब आंबेडकर शिक्षण, बाबासाहेब आंबेडकर पदव्या,बाबासाहेब आंबेडकर

    आधुनिक भारताचा इतिहास नोट्स PDF डाउनलोड करा

    आधुनिक भारताचा इतिहास नोट्स PDF डाउनलोड करा

    आधुनिक भारताचा इतिहास नोट्स PDF डाउनलोड करा

    सर्व विषयाच्या नोट्स PDF डाउनलोड करा

    सर्व विषयाचे नोट्स डाउनलोड डाउनलोड करा Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

    आधुनिक भारताचा इतिहास नोट्स PDF डाउनलोड करा, भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास, टिळक व गांधी युग भारतीय राष्ट्रीय सभा. Modern History Of India Notes PDF

    इंग्रज अधिकारी व कामगिरी पुढीलप्रमाणे आहे

    इंग्रज अधिकारी व कामगिरी

    इंग्रज अधिकारी व कामगिरी


    रॉबर्ट क्लाइव्ह – दुहेरी राज्यव्यवस्था

    वॉरन हेस्टींग – रेग्युलेटिंग अॅक्ट*

    लॉर्ड कॉर्नवॉलिस – कायमधारा पद्धत

    लॉर्ड वेलस्ली – तैनाती फौज

    लॉर्ड हेस्टींग – पेंढाऱ्यांचा यशस्वी बंदोबस्त

    लॉर्ड विल्यमबेंटीक – सती प्रतिबंधक कायदा

    चार्ल्स मूटकॉफ – वृत्तपत्राचा मुक्तिदाता

    लॉर्ड हार्डिग्ज पहिला – सरकारी कार्यालय रविवार सुट्टी

    लॉर्ड डलहौसी – संस्थाने खालसा धोरण

    लॉर्ड कॅनिंग – भारताचा पहिला व्हाईसरॉय

    सर जॉन लॉरेन्स – दुष्काळ आयोगाची स्थापना

    लॉर्ड मेयो – आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक

    लॉर्ड रिपन – स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक

    लॉर्ड लिटल – व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट

    All प्रश्न पत्रिका सर्व MPSC प्रश्नपत्रिका व मेगाभरती, जिल्हा परिषद प्रश्नपत्रिका, रेल्वे प्रश्नपत्रिका व स्टाफ Selection परीक्षेच्या PDF डाउनलोड करा

    All प्रश्न पत्रिका PDF डाउनलोड करा

    इतर महत्वाच्या विषयाचे प्रश्नसंच डाउनलोड करा

     सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

     Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

     नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

     भारतीय अर्थव्यवस्था सराव प्रश्नसंच सर्व टॉपिक नुसार PDF डाउनलोड करा. MPSC Economics Practice Question Papers, Indian Economy Questions