महत्वाचे रोग लक्षणे उपचार माहिती

महत्वाचे रोग लक्षणे उपचार माहिती

महत्वाचे रोग लक्षणे उपचार माहिती

सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

  इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

  इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

   थायरॉईड रोग लक्षणे उपचार माहिती

   थायरॉईड रोग लक्षणे उपचार माहिती Information on the treatment of symptoms of thyroid disease

   थायरॉईड रोग लक्षणे उपचार माहिती

   प्रस्तावना

   थायरॉईड ही एक लहान ग्रंथी असून तिचा आकार एका फुलपाखरासारखा असतो आणि ती मानेच्या खालच्या भागात स्थित असते. तिचं मुख्य कार्य म्हणजे शरीराच्या चयापचय क्रियेचं नियंत्रण ठेवणे (जगण्यासाठी आवश्यक कार्यं पेशी ज्या गतीनं करतात तो दर).

   चयापचय नियंत्रणात ठेवण्यासाठी, थायरॉईड संप्रेरकांचं उत्सर्जन करते, जे शरीरातील पेशींना किती ऊर्जा वापरायची ते सांगतात. योग्यप्रकारे काम करणारी थायरॉईड शरीराची चयापचय क्रिया समाधानकारक गतीनं चालू ठेवण्यासाठी आवश्यक प्रमाणात संप्रेरकांचं उत्पादन करते.

   संप्रेरक हे जसजसे वापरले जातात तशी त्यांची भरपाई थायरॉईड ही करत असते. रक्तातील थायरॉईड संप्रेरकांचं प्रमाण हे पोषग्रंथिव्दारे (पिट्युटरी ग्रंथी) केले जाते.

   मेंदूच्या खालच्या भागात कवटीच्या मध्यभागी स्थित असलेल्या ह्या पोषग्रंथीला जेव्हा अतिप्रमाणातील किंवा कमी प्रमाणातील थायरॉईड संप्रेरकांची जाणीव होते, तेव्हा ती आपला संप्रेरक (टीएसएच) कमीजास्त करते आणि तो थायरॉईडला पाठवून तिला काय करायचे ते सांगते.

   थायरॉईड रोग म्हणजे काय आणि तो कोणाला होतो ?

   ज्यावेळी थायरॉईड ही अधिक प्रमाणात संप्रेरक तयार करते, तेव्हा शरीर हे आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात ऊर्जेचा वापर करते.

   या स्थितीला हायपरथायरॉईडीझम म्हणतात. सर्व प्रकारच्या वयोगटातील लोकांना थायरॉईड रोग होऊ शकतो.

   तथापि, महिलांना पुरुषांच्या तुलनेत पाच ते आठपट अधिक प्रमाणात थायरॉईड समस्या होऊ शकते.

   थायरॉईड रोग कशामुळे होतो ?

   थायरॉइड दोन प्रकारे असतो – हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझम

   खालील स्थितींमुळं हायपोथायरॉईडीझम होऊ शकतो

   थायरॉयडीटीस – म्हणजे थायरॉईड ग्रंथीचा दाह. यामुळं, तयार होणा-या संप्रेरकांचे प्रमाण कमी होते.हाशिमोटोज् थायरॉयडीटीस – हा एक प्रतिकार यंत्रणेचा वेदनाविरहित रोग असून तो अनुवांशिक आहे.प्रसवोत्तर थायरॉयडीटीस – हा रोग प्रसुतिनंतर ५ ते ९ टक्के स्त्रियांमधे होतो.  ही सामान्यतः एक तात्पुरती स्थिती असते.

   आयोडीनची कमतरता – ही समस्या जगातील अंदाजे १०० दशलक्ष लोकांना आहे. 

   थायरॉईड संप्रेरकांची निर्मिती करण्यासाठी आयोडीनचा वापर करते.कार्य न करणारी थायरॉईड ग्रंथी – ही समस्या प्रत्येक नवजात ४००० बालकांमधे एकाला होते.  ही समस्या ठीक न केल्यास, ते मूल शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या विकलांग होऊ शकते.

   खालील स्थितींमुळं हायपरथायरॉईडीझम होतो

   ग्रेव्हज् रोगामुळं, संपूर्ण थायरॉईड ग्रंथी ही अतिक्रियाशील होऊ शकते आणि अति प्रमाणात संप्रेरक उत्पादित करते.

   थायरॉईडच्या अंतर्गत नोड्यूल्स अतिकार्यशील होतात.थायरॉयडीटीस, ही समस्या वेदनामय किंवा वेदनारहित असू शकते, थायरॉईडमधे साठवून ठेवलेले संप्रेरक मुक्त केले जातात.

   त्यामुळं काही आठवडे किंवा महिने हायपरथायरॉईडीझम होऊ शकतो. वेदनारहित प्रकार हा अधिक प्रमाणात महिलांमधे प्रसुतिनंतर होतो.

   अतिरीक्त आयोडीन हे अनेक प्रकारच्या औषधांमधे आढळते आणि त्यामुळं थायरॉईड ही काही व्यक्तींमधे अति प्रमाणात किंवा कमी प्रमाणात संप्रेरक निर्माण करते.

   हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझमची लक्षणे

   हायपोथायरॉईडीझमची लक्षणे

   थकवा येणेवारंवार, मोठ्या प्रमाणात मासिक स्त्राव होणेविसरभोळेपणावजन वाढणेकोरडी, खरखरीत त्वचा आणि केसघोगरा आवाजथंडी सहन न होणे

   हायपरथायरॉईडीझमची लक्षणे

   चिडचिडेपणा / अस्वस्थतास्नायू कमकुवत होणे / थरथरणेअनियमित, कमी प्रमाणात मासिक स्त्राववजन कमी होणेझोप नीट न लागणेवाढलेली थायरॉईड ग्रंथीदृष्टीदोष किंवा डोळ्यांची जळजळ होणेउष्णता सहन न होणे

   ज्यावेळी थायरॉईड रोगाचे लवकर निदान होते, तेव्हा लक्षणे दिसायला लागायच्या आधी ही समस्या नियंत्रणात ठेवता येते. 

   थायरॉईड रोग ही आयुष्यभराची स्थिती असते.  काळजीपूर्वक नियोजन केल्यास, थायरॉईड रोग असलेले लोक आरोग्यदायी, सामान्य जीवन जगू शकतात.

   विविध रोग व उपचार नोट्स डाउनलोड करा

    इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

     इतर महत्वाच्या लिंक्स

     सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

     Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

     नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

     एड्स रोग लक्षणे उपचार माहिती

     एड्स रोग लक्षणे उपचार माहिती AIDS Symptoms of AIDS Treatment Information AIDS

     एड्स रोग लक्षणे उपचार माहिती

     लोंगफोर्म – 

     AIDS- Aquired (प्राप्त), Immuno (प्रतिकारशक्ती), Dfficiency (अभाव), Syndrome (लक्षणसमुह)

      व्याख्या – प्रतिकारशक्तीच्या अभावाने प्राप्त झालेल्या अनेक रोगलाक्षणांच्या एकत्रित समूह म्हणजेच ‘एड्स’ होय.

      एड्स हा H.I.V. विषाणूमुळे होणारा आजार आहे. (Human Immuno dfficiency Virus- मानवाची प्रतिकारशक्ती कमी करणारा विषाणू)

      एड्सच्या H.I.V. विषणूचा शोध 1983 साली डॉ. ल्यूक मोण्टिग्रेयर (फ्रेंच) व डॉ. रॉबर्ट गॅलो (अमेरिकन) या शास्त्रज्ञांनी लावला

      जगामध्ये 1981 साली अमेरिकेत एड्सचा पहिला रुग्ण आढळला.

      भारतामध्ये 1883 साली मद्रासमध्ये पहिला H.I.V. पॉझिटिव्ह रुग्ण आढळला.

      भारतामध्ये मे 1986 साली मुंबई शहरात पहिला एड्सचा रुग्ण आढळला.

      जगात सर्वात जास्त H.I.V. ग्रस्त रुग्ण – भारत देशात

      भारतात सर्वात जास्त H.I.V. ग्रस्त रुग्ण – महाराष्ट्र राज्यात

      महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त H.I.V. ग्रस्त रुंग – सांगली जिल्ह्यात

      महाराष्ट्रात शहरांपैकी सर्वात जास्त H.I.V. ग्रस्त रुग्ण – मुंबई शहरात

      जागतिक एड्स दिन – 1 डिसेंबर

      NARI (नारी) National AIDS Research Institute (भोसरी) पुणे.

      NACO (नौको) National AIDS Control Organization दिल्ली.

      MSACS – Maharashtra state AIDS Control Society (वडाळा) मुंबई.  

     एड्सवरील रोगप्रसाराचे प्रमुख मार्ग

     H.I.V. बाधित व्यक्तीशी असुरक्षित लैंगिक संबंध.

      H.I.V. बाधित व्यक्तीचे रक्त किंवा रक्तघटक निरोगी व्यक्तीस दिल्यास. (रक्त संक्रमण) एड्स बाधित रुग्णास वापरलेल्या सुया/सिरिंजेस निर्जतुक न करता परत वापरल्यास. H.I.V. बाधित गरोदर मातेपासून तिच्या होणार्‍या बाळाला (नाळेमार्फत) (H.I.V. बाधित व्यक्तीशी हस्तांदोलन केल्याने, चुंबन घेतल्याने, एकत्र बसण्याने, एकत्र जेवल्याने, एकत्र राहण्याने एड्स या रोगाचा प्रसार होत नाही.)

     एड्सवरील सर्वसामान्य लक्षणे

     अकारण वजनात 10% पेक्षा जास्त घट होणे.

      सतत बारीक ताप, रात्रीचा घाम येणे. (1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी)

      सतत जुलाब होणे व कोणत्याही औषधाने ते बारे न होणे.

      तोंडात, अन्ननलिकेत चट्टे उठणे.

      3 महिन्यापेक्षा जास्त काळ राहणारी ‘लसिका ग्रंथाची’ (लिम्फ ग्लॅंड) सूज, गंभीर लक्षणे :- 1) नुमोनिया 2) मेंदूज्वर 3) हरपीस 4) विविध प्रकारचे कर्करोग 5) क्षयरोग

      आधिशयन काळ – 5 ते 8 वर्षे/सर्वसाधारण: (कधी-कधी 8 ते 10 वर्षे)

     एड्स निदानाच्या चाचण्या

     इलायझा चाचणी (ELISA Test) H.I.V. संसर्गाचे प्राथमिक निदान होते. सर्वत्र उपलब्ध. गवाक्ष काळात (3 ते 5 महीने) निगेटिव्ह (नकारात्मक) येऊ शकते. म्हणून ही चाचणी परत 3 महिन्यांनी करावी लागते.

      वेस्टर्न ब्लॉट (Westrn Blot) हमखास 100% खात्रीशीर चाचणी. इलायझा चाचणी होकारात्मक आल्यास H.I.V. संसर्गाची खात्री या चाचणीने करता येते.

      पी.सी.आर. (P.C.R. Test) – जगात सर्वांची सुधारित / प्रगत चाचणी. डी.एन.ए. ची तपासणी करतात. लागण झाल्यास तिसर्यावच दिवशी निदान होऊ शकते.

      मार्च 1985 – एलयाझा तपासणीची उपलब्धता.

      जुलै 1987 – ‘झिडोव्ह्युडीन’ हे औषध एड्स उपचारासाठी उपलब्ध

     एड्सवरील औषधे :

     झिडोव्ह्युडीन (Zidovudine), (नेव्हरॅपिन) ही सर्व औषधे फक्त विषाणूंची वाढ थोपवितात व रुग्णाचे आयुष्मान वाढवितात.

      H.I.V. बाधित गर्भवतीकडून होणार्याु बाळाला H.I.V. च संसर्ग टाळण्यासाठी सध्या ग्रामीन रुग्णालयांमध्ये मोफत औषधोपचार करण्यात येतो, त्यास ‘अॅंटी रिट्रोव्हायरला थेरपी’ असे म्हणतात. (Anti Retroviral Therapy Treatment)

     Mpsc Exam Syllabus Pdf Download

     All Exam Syllabus Pdf Download

     सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

     Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

     नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

     जळू माहिती

     जळू Leech Hirudinea

     जळू Leech Hirudinea

     Jalu जळू कसा दिसतो ? अळई सारखा पण रंग काळा. आकार 🍾 असा असतो.

     Size – 5-6 सेंटीमीटर

     *जळू काय करतो?*

     नकळत पायाला चिटकतो आणि कुठल्याही नसेला (vein) घट्ट पकडतो आणि “Y” section cha cut deto.

      त्यानंतर तो आपल्या तोंडातून २ प्रकारचे chemicals सोडतो

     1) Anesthetic = याने जळू चावलेल्या ठिकाणी बधिरता आणतो. 

     2) Anti-coagulant= याने जळू रक्त पातळ करण्याचे chemical सोडतो.

     नंतर तो रक्त पीत जातो. तो पोट भरेपर्यंत रक्त पितो. (20मिनिट ते 3 तास).

     जळू नंतर फुगतो आणि मगच तो सोडतो.

     ज्याला  जळू चावतो त्याला कळत पण नाही कारण चावलेल्या ठिकाणी बधिरता असते.

     *जळू चिकटला आहे हे दिसल्यावर काय करावे=*

     त्याला हाताने काढून तो निघत नाही. काढताना फार त्रास होतो कारण त्याचे छोटे छोटे दात आत असतात.

     जळूने स्वतः सोडावे म्हणून खालील कुठलीही १ गोष्ट टाकावी =

     1)मीठ = टाकल्यावर तो आपोआप 2 सेकंदात पडतो.

     2) Vinegar

     3) साबणीचे पाणी

     4) लिम्बू पाणी

     5) Few carbonated कोल्ड ड्रिंक

     6) Alcohol

     *जळू पडल्यानंतर काय करावे=*

     जळू पडल्यानंतर जखमेचे रक्त थांबत नाही (2तास ते 3 दिवस) कारण जळू ने anti-coaglulant ने रक्त पातळ केलेले असते. 

     हळद लाऊन फार फायदा होत नाही पण तरीही लावावी.

     जखमेला मलम आणि कापूस लावून जखम घट्ट बांधावी. 

     जखम पुनः-पुनः उघडून बघू नये. जखमेला खाज आली तरी खाजवू नये.

     पुढच्या दिवशी शरीरावर कुठेही लाल चटटे दिसले तर त्वरीत डॉक्टरांना संपर्क साधावा.

     जळू माहिती Jalu Mahiti in Marathi Leech Hirudinea Information

     सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

      इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

       सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

       Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

       नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

       सामान्य विज्ञान इयत्ता 6 वी नोट्स

       सामान्य विज्ञान इयत्ता 6 वी नोट्स General Science Std 6th Notes

       सामान्य विज्ञान इयत्ता 6 वी नोट्स

       अमिबा, पॅरामेशिअम, क्लोरेला, यीस्ट या सजीवांचे शरीर एक पेशीचे बनलेले असते.

        चेतना मिळाल्यावर प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतनाक्षमता असे म्हणतात. 

       प्राणी : जीवनकाळ

       घरमाशी – 1 ते 4 महिने

       कुत्रा – 16 ते 18 वर्ष

       शहामृग – 50 वर्ष

       हत्ती – 70 ते 90 वर्ष 

       वनस्पतीच्या वर्गीकरणाचे श्रेय कॅरोलेस लिनियस या शास्त्रज्ञाकडे जाते.

        बुरशी, भूछत्र, स्पायरोगायरा, नेचे व कवक यांना फुले येत नाहीत.

        वड, उंबर, बोगनवेल या सपुष्प वनस्पती आहेत.

        व्दिवार्षिक वनस्पती – मुळा, गाजर, बीट.

        वार्षिक वनस्पती – सूर्यफूल, झेंडू, ज्वारी, बाजरी, मका.

        जलचर प्राणी – मासा, जेलीफिश, ऑक्टोपस

        उभयचर प्राणी – बेडूक, कासव, सुसर

        वडाच्या खोडावरील पारंब्या या वडाची मुळे आहेत. कोलकाता येथील बोटॅनिकल गार्डन मध्ये सुमारे 250 वर्षाचे वडाचे झाड आहे.

        पेर आणि पान यांच्या दुबेळक्यात कोंबासारखा भाग दिसतो त्याला मुकूल म्हणतात. मूळाच्या टोकाशी मूलटोपी असते.

        जायांग स्त्रीकेशराचा बनलेला असतो.

        वस्तुमान, अंतर, तापमान, काळ अशा प्रकारात ज्यांचे मापन करायचे असते, त्यांना राशी असे म्हणतात.

        MKS आणि CGS या प्रचलित मापन पद्धती आहेत.

        गोलंदाजीच्या वेगाचे मापन रडार प्रणालीव्दारे केले जाते.

        स्थिर वस्तूला हलविण्यासाठी बलाची आवश्यकता असते.

        मॅगलेव्ह ट्रेन ही चुंबकाचा वापर करून चालणारी रेल्वे ताशी 500 ते 580 किमी वेगाने धावते.

        घर्षणबल गतीच्या विरोधात कार्य करते.

        घर्षनामुळे वीज निर्माण होणार्‍या बलाला स्थितीक विद्युत बल असे म्हणतात.

        एका दिशेने जाणार्‍या गतीला रेषीय गती असे म्हणतात.

        ज्या गतीची दिशा सतत बदलत असते, त्या गतीला यादृच्छिक गती म्हणतात.

        आधाराभोवती हालणार्‍या आणि न वाकणार्‍या दांड्याला तरफ म्हणतात. हे साधे यंत्र आहे.

        कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात.

        पदार्थाच्या ताणामुळे / स्थितीमुळे साठवल्या गेलेल्या उर्जेला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात.

        गतीज ऊर्जेचा वापर करून डायनॅमोमध्ये विद्युतनिर्मिती होते.

        पारंपारिक ऊर्जा स्त्रोत – कोळसा, डिझेल, पेट्रोल 

       सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

        इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

         सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

         Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

         नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now