6 Sep 2020 Chalu Ghadamodi in Marathi

6 Sep 2020 Chalu Ghadamodi in Marathi

6 Sep 2020 Chalu Ghadamodi in Marathi

📚📚वनलायनर दिनविशेष, दि.6सप्टेंबर 2020 📚📚

🌹🌳🌲 पर्यावरण 🌲🌳🌹

👉5 सप्टेंबर रोजी जापानी ओकिनावा बेटांना धडक दिलेले चक्रीवादळ – हेशन.

🌹🌳🌲आंतरराष्ट्रीय🌲🌳🌹

👉भारतात आज जगातले _ सर्वात मोठे रस्त्यांचे जाळे आहे – दुसरे.

👉फ्रान्स नंतरचे दुसरा युरोपीय देश, ज्याने ‘हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी धोरण’ स्वीकारले आहे – जर्मनी.

👉’हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी धोरण’ तयार करणारे राष्ट्रे – अमेरिका, जापान, ऑस्ट्रेलिया आणि भारत.

🌹🌳🌲राष्ट्रीय🌲🌳🌹

👉‘बिझनेस रिफॉर्म अॅक्शन प्लान (BRAP) 2019’ क्रमवारीनुसार, सर्व भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा – आंध्रप्रदेश.

👉‘BRAP 2019’ क्रमावारीनुसार, सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी अव्वल दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश – (अनुक्रमे) आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश, झारखंड, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि गुजरात.

👉’BRAP 2019’ क्रमावारीनुसार, उत्तर भागातले सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य – उत्तरप्रदेश.

👉’BRAP 2019’ क्रमावारीनुसार, पूर्व भागातले सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य – झारखंड.

👉’BRAP 2019’ क्रमावारीनुसार, पश्चिम भागातले सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य – मध्यप्रदेश.

👉‘BRAP 2019’ क्रमावारीनुसार, दक्षिण भागातले सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य – आंध्रप्रदेश.

👉‘BRAP 2019’ क्रमावारीनुसार, ईशान्य भागातले सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य – आसाम.

👉’BRAP 2019’ क्रमावारीनुसार, सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा केंद्रशासित प्रदेश – दिल्ली.

🌹🌳🌲राज्य विशेष🌲🌳🌹

👉‘एक भारत श्रेष्ठ भारत’ अंतर्गत, गोवाने या राज्यासोबत जोडी तयार केली आहे – झारखंड.

👉’एक भारत श्रेष्ठ भारत’ अंतर्गत, सिक्किमने या राज्यासोबत जोडी तयार केली आहे – दिल्ली.

👉’एक भारत श्रेष्ठ भारत’ अंतर्गत, मध्यप्रदेशने या राज्यासोबत जोडी तयार केली आहे – मणीपूर आणि नागालँड.

🌹🌳🌲सामान्य ज्ञान🌲🌳🌹

👉निशस्त्रीकरण परिषद (Conference on Disarmament) – स्थापना: वर्ष 1984; मुख्यालय: जिनिव्हा, स्वित्झर्लंड; सदस्य: 65.

👉रासायनिक शस्त्रास्त्रे प्रतिबंधक संघटना (Organisation for the Prohibition of Chemical Weapons -OPCW) – स्थापना: 29 एप्रिल 1997; मुख्यालय: हेग, नेदरलँड; सदस्य: 193.

👉पारंपारिक शस्त्रे व दुहेरी-वापरायोग्य वस्तू व तंत्रज्ञानाच्या निर्यातीवर  नियंत्रणासाठी वासेनर व्यवस्था – स्थापना: 12 जुलै 1996; सचिवालय: व्हिएन्ना, ऑस्ट्रिया.

👉भारतीय अणुचाचणीनंतर, आण्विक पुरवठादार गट (NSG) याची स्थापना – मे 1974.

👉अण्वस्त्र प्रसारबंदी करार (Non-Proliferation Treaty -NPT) – स्वाक्षरी: 1 जुलै 1968; प्रभावी: 5 मार्च 1970; पक्ष: 190.

👉ऑस्ट्रेलिया गट (रासायनिक आणि जैविक शस्त्रास्त्राच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी) – स्थापना: वर्ष 1985; पक्ष: 43.

👉क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण प्रशासन (MTCR) – स्थापना: वर्ष 1987; पक्ष: 35.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Marathi Vyakaran sarav Prashnsanch

📗 तिथी, वार, नक्षत्र, योग, करणा-या पाच घटकांनी युक्त अशा दिनी – वैशिष्टयांची माहिती असणारी पुस्तिका कोणती ?

1) पंचीकरण 2) पंचांग

3) पंचशील 4) पंचीकृती

उत्तर :- 2

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📕 पुढील शब्दांपैकी व्याकरणदृष्टया योग्य शब्द कोणता ?

1) मनस्थीती 2) मनस्थिति:

3) मन्हस्थिती 4) मन:स्थिती

उत्तर :-

4

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📗 ट, ठ, ड, ढ, ण हे वर्ण ……………… आहेत.

1) तालव्य 2) अनुनासिक

3) दन्त्य 4) मूर्धन्य

उत्तर :- 4

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📕 ‘मनस्ताप’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

1) पूर्वरूप संधी 2) पररुप संधी

3) व्यंजन संधी 4) विसर्ग संधी

उत्तर :- 4

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📗 कुत्र्याने चावा घेतला ? अधोरेखित शब्दाचे नाम कोणते ?

1) कुत्र्या 2) कुत्रा

3) कुत्र्याने 4) कुत्र्याचा

उत्तर :- 2

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📕 वचनभेदाप्रमाणे बदलणारी सर्वनामे किती आहेत ? पर्यायी उत्तरांतील योग्य पर्यायी उत्तर कोणते ?

1) चार 2) पाच

3) सहा 4) सात

उत्तर :- 2

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📗 पुढीलपैकी अव्ययसाधीत विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते ?

1) बोलकी बाहुली 2) पुढची गल्ली

3) कापड – दुकान 4) माझे – पुस्तक

उत्तर :- 2

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📕 वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द ………………. 1) क्रियापद 2) धातू 3) कर्म 4) कर्ता

उत्तर :- 1

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📗 खालील विधानातील क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखा. तो इतका मोठयाने बोलला, की त्याचा आवाज बसला. 1) उद्देशदर्शक 2) कारणदर्शक 3) रीतिदर्शक 4) कालदर्शक उत्तर :- 2

Chalu Ghadamodi Sep 2020 PDF Download

Chalu Ghadamodi Sep 2020 PDF Download

Chalu Ghadamodi Sep 2020 PDF Download

नागरी सेवा क्षमता वृद्धीसाठी भारत सरकारचे “मिशन कर्मयोगी

🔸2 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत “राष्ट्रीय नागरी सेवा क्षमता विकास कार्यक्रम” (NPCSCB) राबविण्यासाठी मंजुरी दिली गेली. जगभरातल्या उत्तम संस्था आणि पद्धतींबाबत शैक्षणिक स्त्रोतांचा स्वीकार करून कार्यक्रमाची काळजीपूर्वक रचना केली गेली आहे.

🔸हा निर्णय भारत सरकारच्या नव्या “मिशन कर्मयोगी” या अभियानाच्या अंतर्गत घेण्यात आला आहे. भविष्यासाठी भारतीय नागरी सेवकाला अधिक सर्जनशील, रचनात्मक अधिक क्रियाशील, व्यावसायिक, प्रगतीशील, ऊर्जावान, सक्षम,पारदर्शक आणि तंत्रज्ञान सक्षम बनवणे हे ‘मिशन कर्मयोगी’चे उद्दिष्ट आहे. विशिष्ट भूमिका-क्षमतानी सुसज्ज नागरी सेवक उच्च गुणवत्ता मानकांच्या प्रभावी सेवा सुनिश्चित करू शकणार.

NPCSCB कार्यक्रमात पुढील चार संस्थात्मक चौकटीचा समावेश आहे –

🔸पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक मनुष्यबळ परिषद

🔸क्षमता विकास आयोग

🔸डिजिटल मालमत्ता मालकी आणि परिचालन तसेच ऑनलाइन प्रशिक्षणासाठी तंत्रज्ञान मंचासाठी विशेष प्रयोजन कंपनी (SPV)

🔸कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली समन्वय मंडळ  

कार्यक्रमाची मुख्य मार्गदर्शक तत्वे

🔸‘नियम आधारित’ कडून ‘भूमिका आधारित’ मनुष्यबळ व्यवस्थापन परिवर्तनाला सहकार्य करणे. नागरी सेवकांना कामाचे वाटप त्यांच्या पदाच्या गरजेनुसार त्यांच्या क्षमतेशी जोडणे.

🔸‘ऑफ साइट’ शिक्षण पद्धतीला पूरक ‘ऑन साइट’ शिक्षण पद्धतीवर भर देणे.

🔸शिक्षण सामग्री, संस्था आणि कार्मिक सहित सामायिक प्रशिक्षण पायाभूत संरचना असलेली परिसंस्था निर्माण करणे.

🔸नागरी सेवेशी संबंधित सर्व पदांना भूमिका, कार्ये, आणि क्षमता (FRAC) यासंबंधी दृष्टिकोनानुसार अद्ययावत करणे आणि प्रत्येक सरकारी संस्थेत निवडक FRACसाठी प्रासंगिक शिक्षण सामुग्रीची निर्मिती करणे आणि पुरवणे.

🔸सर्व नागरी सेवकांना आत्मप्रेरित आणि आदेशित शिक्षण पद्धतीमध्ये त्यांचे वर्तन, कार्य आणि कार्यक्षेत्र संबंधित क्षमता निरंतर विकसित आणि मजबूत करण्याची संधी उपलब्ध करून देणे.

🔸प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी वार्षिक वित्तीय योगदानाच्या माध्यमातून शिकण्याच्या सामायिक आणि समान परिसंस्था निर्माण करण्यासाठी आपापल्या स्त्रोतांमध्ये थेट गुंतवणूक करण्यासाठी सर्व केंद्रीय मंत्रालये आणि विभाग आणि त्यांच्या संघटनांना सक्षम बनवणे.

🔸सार्वजनिक प्रशिक्षण संस्था, विद्यापीठे,  स्टार्टअप आणि व्यक्तिगत तज्ञांसह शिक्षण संबंधी सर्वोत्तम सामुग्रीच्या विकासाला प्रोत्साहन देणे आणि भागीदारी करणे.

🔸क्षमता विकास, आशय निर्मिती, वापरकर्त्यांचा प्रतिसाद आणि क्षमतेनुसार तसेच धोरणात्मक सुधारणांसाठी क्षेत्रांची निवड करण्याबाबत iGOT-कर्मयोगी द्वारे पुरवण्यात आलेल्या माहितीचे विश्लेषण करणे. कार्यक्रमाची वैशिष्ट्ये

🔸आय गॉट कर्मयोगी (iGOT Karmayogi) नावाचा एकात्मिक सरकारी ऑनलाईन प्रशिक्षण मंच स्थापित केला जाणार आहे.

🔸एक ‘क्षमता विकास आयोग’ स्थापन करण्याचा देखील प्रस्ताव आहे,  जेणेकरून सहकार्यात्मक आणि सामायिक आधारावर क्षमता विकास परिसंस्था व्यवस्थापन आणि नियमन याबाबतीत एकसमान दृष्टिकोन सुनिश्चित करता येणार. ही आयोग वार्षिक क्षमता विकास योजनांना मंजुरी देण्यात ‘पीएम सार्वजनिक मनुष्यबळ परिषद’ला सहाय्य करणार. नागरी सेवा क्षमता विकास यासंबंधी सर्व केंद्रीय प्रशिक्षण संस्थावर देखरेख ठेवणार. सामायिक शिक्षण संसाधनांची निर्मिती करणार तसेच योजनाच्या अंमलबजावणीवर समन्वय आणि देखरेख ठेवणार.

🔸iGOT- कर्मयोगी मंच भारतात दोन कोटींहून अधिक अधिकाऱ्यांची क्षमता वाढवण्यासाठी व्यापक आणि अत्याधुनिक संरचना उपलब्ध करणार. हा प्लॅटफॉर्म शैक्षणिक सामुग्रीसाठी एक आकर्षक आणि जागतिक दर्जाची बाजारपेठ म्हणून उदयाला येण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये काळजीपूर्वक संकलित केलेली माहिती आणि डिजिटल ई-शिक्षण सामग्री उपलब्ध केली जाणार.

🔸सुमारे 46 लक्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यासाठी 2020-2021 या वर्षापासून 2024-25 या वर्षापर्यंत 5 वर्षांच्या कालावधीत 510.86 कोटी रुपये खर्च केले जाणार. 

“इंद्रा नेव्ही-20”: भारत आणि रशिया यांचा संयुक्त युद्धसराव

🔸भारतीय नौदल आणि रशियाचे नौदल यांचा 11 वा द्वैवार्षिक संयुक्त सागरी सराव 4 आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी बंगालच्या उपसागरात आयोजित करण्यात आला आहे. ठळक बाबी

🔸“इंद्रा नेव्ही-20”चा मुख्य उद्देश दोन्ही नौदलामधले आंतर-संचालन अधिक दृढ करणे आणि बहु आयामी सागरी अभियानासाठी आकलन आणि पद्धती विस्तृत करणे हा आहे.

🔸सरावादरम्यान भारतीय नौदलाच्या ताफ्यात क्षेपणास्त्र विनाशिका ‘रणविजय’, स्वदेशी लढाऊ जहाज ‘सह्याद्री’ आणि ‘शक्ती’ या तेलवाहू जहाजाचा आणि हेलिकॉप्टरचाही समावेश आहे. तर रशियाच्या ताफ्यात विनाशिका ‘एडमिरल विनोग्राडोव्ह’, विनाशिका ‘एडमिरल ट्रिब्युट’ आणि फ्लीट टॅंकर ‘बोरिस ब्यूटोमा’ या जहाजांचा समावेश आहे.

🔸2003 साली सुरु झालेला “इंद्रा नेव्ही” म्हणजे दोन्ही देशांच्या नौदलामधल्या दीर्घकालीन धोरणात्मक संबंधांचे प्रतिक आहे. सरावामुळे दोन्ही नौदलात परस्पर विश्वास आणि सहकार्य अधिक दृढ होणार असून, उभय देशातले दीर्घ काळापासूनचे मैत्रीचे बंध अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.

रशिया देश

रशिया हा आशिया खंडाच्या उत्तर भागातला एक देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया जगातला सर्वात मोठा देश आहे. जगाच्या एकूण भूभागाच्या क्षेत्रफळापैकी सुमारे एक-सप्तमांश क्षेत्र रशियाने व्यापलेले आहे. रशियाचा विस्तार यूरोप व आशिया अशा दोन्ही खंडांत असून यूरोप खंडाचा पूर्वेकडील जवळजवळ निम्मा भाग तर आशिया खंडाचा उत्तरेकडील सुमारे दोन-पंचमांश भाग या देशाने व्यापलेला आहे. मॉस्को हे देशाच्या राजधानीचे शहर आहे. रूबल हे रशियाचे राष्ट्रीय चलन आहे

Vidnyan Sarav Prashnsanch

1) LASER म्हणजे काय ?

1) Light Amplification by stimulated Emission of Radiation.

2) Less Amplification by stimulated Emission of Radiation.

3) Light Amplification by Sub-Emission of Radion.

4) None of the above.

उत्तर :- 1

2) डोबेरायनर या शास्त्रज्ञांनी त्रिकांच्या स्वरूपात मूलद्रव्याचे वर्गीकरण केले कारण, की

1) सुरवात त्रिकांपासून होते. 2) पहिले व तिसरे मूलद्रव्यासारखे होते.

3) पहिले व तिसरे मूलद्रव्याचे सरासरी वस्तुमान दुस-या मूलद्रव्याएवढे होते.

4) त्यांना या पध्दतीत रस होता. उत्तर :- 3

3) अयोग्य जोडी ओळखा.

अ) एरिमोफाइटस – वाळवंटात उगवणा-या वनस्पती ब) तिथोफाइटस – पर्वतावर उगवणा-या वनस्पती

क) ऑक्जीलोफाइट्स – आम्लीय मृदात उगवणा-या वनस्पती ड) हिलोफाइट्स – दलदलमध्ये उगवणा-या वनस्पती

1) अ, ब 2) ब, क

3) यापैकी नाही 4) क, ड

उत्तर :- 3

4) Radar म्हणजे काय ?

1) Radio Defence and Ranging

2) Radio Detection and Ranging

3) Radio and Defence Amplification Range

4) None of the above

उत्तर :- 1

5) ब्रिटीश रसायनशास्त्रज्ञ न्यूलँडस यांनी मूलद्रव्याच्या वर्गीकरणाचा सिध्दांत …………….. यावर्षी मांडला.

1) 1829 2) 1869

3) 1865 4) 1870

उत्तर :- 3

6) खालीलपैकी योग्य विधान / विधाने कोणती ?

अ) प्रकाश तरंग स्वरूपात अस्तित्व दर्शवितो.

ब) प्रकाश कण स्वरूपात अस्तित्व दर्शवितो.

क) प्रकाश ऊर्जा फोटोन्सच्या स्वरूपात असते.

1) फक्त ब, क 2) फक्त अ, ब

3) फक्त अ, क 4) अ, ब, क तिन्ही उत्तर :- 4

7) न्यूलँडसने अष्टकाच्या आधारावर वर्गीकरण केले कारण, की

1) पहिले व आठवे मूलद्रव्यासारखे होते. 2) पहिले व आठव्या मूलद्रव्यात न्यूट्रॉन सारखे होते.

3) पहिल्या व आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म सारखे होते. 4) पहिल्या व आठव्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमानांक सारखे होते.

उत्तर :- 3

8) खालीलपैकी कोणती खनिजे स्नायूच्या आकुंचनासाठी आवश्यक असतात.

अ) सोडियम ब) कॅल्शिअम क) लेड ड) सर्व

1) अ, ब 2) ड

3) ब, क 4) अ, क

उत्तर :- 1 9) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचविण्यासाठी किती कालावधी लागतो ?

1) 8 मिनिटे 19 सेकंद 2) 8 मिनिटे 11 सेकंद

3) 6 मिनिटे 13 सेकंद 4) 6 मिनिटे 19 सेंकद

उत्तर :- 1

10) मूलद्रव्याचे वर्गीकरण करण्याचे श्रेय डोबेरायनर, मेंडेलिव्ह व न्यूलँडस यांना जाते, या तिन्ही शास्त्रज्ञांचा वर्गीकरणाचा आधार ………………….. हा होता ?

1) अणुक्रमांक 2) अणुवस्तुमानांक

3) समस्थानिके 4) समभार उत्तर :- 2