एप्रिल 2020 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच

चालू घडामोडी एप्रिल 2020 सराव प्रश्नसंच Current Affairs April 2020 Practice Quiz

[bellows config_id=”main” menu=”47″]

1) वर्तमानात राष्ट्रीय कंपनी विधी न्यायपीठाचे कार्यवाह अध्यक्ष कोण आहेत?

(A) इना मल्होत्रा

(B) आर. वरदराजन

(C) बी.एस.व्ही. प्रकाश कुमार. 

(D) मनोरमा कुमारी

2) कोणत्या राज्य सरकारने ‘मो प्रतिवा’ कार्यक्रमाचा आरंभ केला?

(A) पश्चिम बंगाल

(B) बिहार

(C) झारखंड

(D) ओडिशा. 

3) कोणत्या मंत्रालयाने ‘लाइफलाईन उडान’ उपक्रमाचा आरंभ केला?

(A) नागरी उड्डयण मंत्रालय. 

(B) आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय

(C) संरक्षण मंत्रालय

(D) मनुष्यबळ व विकास मंत्रालय

4) कोणत्या व्यक्तीची जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश या पदावर नेमणूक झाली?

(A) न्यायमूर्ती धीरज सिंग ठाकूर

(B) न्यायमूर्ती रजनेश ओसवाल. 

(C) न्यायमूर्ती तशी रबस्तान

(D) न्यायमूर्ती अली मोहम्मद मॅग्रे

5) कोणत्या शहरात ‘आशियाई युवा खेळ 2021’ या स्पर्धांचे आयोजन होणार?

(A) टोकियो, जापान

(B) जकार्ता, इंडोनेशिया

(C) शान्ताउ, चीन. 

(D) बँकॉक, थायलंड

6)‘कोरोना केअर’ विमा सादर करण्यासाठी ‘फोन पे’ कंपनीने कोणत्या विमा कंपनीबरोबर भागीदारी केली?

(A) भारतीय जीवन विमा महामंडळ

(B) बजाज अलियान्झ. 

(C) कोटक महिंद्र लाइफ इन्शुरेंस

(D) मॅक्स लाइफ इन्शुरेंस

7)BCG लसीचा उपयोग कोणत्या रोगाविरूद्ध केला जातो?

(A) देवी

(B) क्षयरोग. 

(C) कांजिण्या

(D) यापैकी नाही

8) ‘ऑपरेशन संजीवनी’ अंतर्गत भारतीय हवाई दल कोणत्या देशाकडे आवश्यक औषधांची वाहतूक करीत आहे?

(A) श्रीलंका

(B) म्यानमार

(C) मालदीव. 

(D) मादागास्कर

9) ‘वर्ल्ड गेम्स 2022’ या स्पर्धा कुठे खेळवल्या जाणार आहेत?

(A) अल्बामा, अमेरिका. 

(B) द हेग, नेदरलँड

(C) लंडन, ग्रेट ब्रिटन

(D) व्रॉक्लाव, पोलंड

10) कोणत्या मंत्रालयाने ‘हॅक द क्रायसेस इन इंडिया’ नावाची ऑनलाइन हॅकेथॉन स्पर्धा

 आयोजित केली?

(A) कॉर्पोरेट कल्याण मंत्रालय

(B) गृह मंत्रालय

(C) इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. 

(D) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय

चालू घडामोडी मार्च 2020 सराव प्रश्नसंच PDF डाउनलोड

11)कोणत्या संघटनेनी ‘ग्लोबल सॉलिडरिटी टू फाइट द कोरोनावायरस डिसीज

2019 (कोविड-19)’ विषयक ठराव स्वीकारला?

(A) जागतिक आरोग्य संघटना

(B) दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना (SAARC)

(C) जी-20

(D) संयुक्त राष्ट्रसंघ महासभा. 

12)कोणत्या संस्थेनी ‘बायो सूट’ विकसित केला?

(A) संरक्षण संशोधन व विकास संस्था.

(B) भारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूर

(C) भारतीय विज्ञान संस्था बंगळुरू

(D) यापैकी नाही

13)कोणत्या कलमान्वये ‘PM-CARES निधी’ला प्राप्तिकरातून सूट देण्यात आली आहे?

(A) कलम 80 (C)

(B) कलम 80 (F)

(C) कलम 80 (G).

(D) कलम 80 (H)

14)कोणत्या संस्थेनी ‘चॅलेंज कोविड-19’ स्पर्धेची घोषणा केली?

(A) आगरकर रिसर्च इंस्टीट्यूट

(B) नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन. 

(C) रमण रिसर्च इंस्टीट्यूट

(D) बोस इंस्टीट्यूट

15)कोणत्या योजनेच्या अंतर्गत कोविड-19 वरील चाचणी व उपचार मोफत होणार?

(A) आरोग्य संजीवनी विमा

(B) प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना

(C) प्रधानमंत्री जन औषधी योजना

(D) आयुष्मान भारत योजना. 

16)कोणत्या दिवशी प्रथम ‘आंतरराष्ट्रीय विवेक दिन’ पाळला गेला?

(A) 1 एप्रिल 2020

(B) 3 एप्रिल 2020

(C) 5 एप्रिल 2020

(D) 6 एप्रिल 2020. 

17)नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार एखाद्या व्यक्तीला जम्मू व काश्मीरचा कायम रहिवासी होण्यासाठी कोणती मर्यादा आहे?

(A) 12 वर्ष

(B) 11 वर्ष

(C) 14 वर्ष

(D) 15 वर्ष. 

18) राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (NHA) आरोग्य कर्मचार्‍यांना निशुल्क वाहतूक सेवा देण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत करार केला?

(A) ओला

(B) उबर. 

(C) मेरु

(D) झूम

19) नौदलाचे कोणत्या डॉकयार्डमधील कर्मचार्‍यांनी ‘पोर्टेबल मल्टी-फीड ऑक्सीजन मॅनिफोल्ड’ यंत्रणा विकसित केली?

(A) विशाखापट्टणम. 

(B) मुंबई

(C) कोची

(D) कारवार

20) क्रिकेटमध्ये वापरली जाणारी DLS पद्धत कोणी तयार केली?

(A) टोनी लुईस. 

(B) डॉन ब्रॅडमन

(C) व्हिव्हियन रिचर्ड्स

(D) सिडनी बार्नेस

चालू घडामोडी एप्रिल 2020 प्रश्न

21.  17 वी संयुक्त राष्ट्रांची हवामान परिवर्तन परिषद कोणत्या देशात भरली होती ?

 A) भारत 

 B) दक्षिण आफ्रिका

 C) चीन 

 D) बांग्लादेश

22.  ___ या आंतरखंडीय बॅलेस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी घेतल्याने भारत पाच शक्तिशाली देशांच्या रांगेत आला आहे. 

 A) अग्नी-5 

 B) अंतरिक्ष-2  

 C) पृथ्वी-3  

 D) अग्नी-2

23)COVID-19 विषाणूच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या – 

1. या विषाणूच्या उद्रेकाचे मूळ चीन देशात होते.

2. इटली हा चीननंतर या विषाणूच्या संसर्गाने सर्वाधिक प्रभावित होणारा देश आहे.

दिलेल्यापैकी अचूक विधान असलेला पर्याय निवडा.

(A) केवळ (1)

(B) केवळ (2)

(C) (1) आणि (2) दोन्ही. 

(D) ना (1), ना (2)

24) मार्च 2020 मध्ये CBI आणि ED या संस्थांनी घोटाळा आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली बँकींग क्षेत्रातल्या कोणत्या व्यक्तीची चौकशी केली?

(A) चंदा कोचर

(B) राणा कपूर. 

(C) गिरीश चंद्र चतुर्वेदी

(D) राकेश माखीजा

25)‘BBC वर्ल्ड हिस्ट्री’ मासिकाच्या सर्वेक्षणानुसार जगाच्या इतिहासातला सर्वात महान नेता म्हणून कोणा व्यक्तीची निवड केली गेली?

(A) महाराजा सवाई मान सिंग

(B) महाराजा हरी सिंग

(C) महाराजा रणजित सिंग. 

(D) महाराजा गुलाब सिंग

26) वर्ष 2014 आणि वर्ष 2016 या काळात कोणत्या राज्यात सर्वाधिक पर्यावरण-विषयक गुन्हे घडले?

(A) छत्तीसगड

(B) राजस्थान. 

(C) उत्तराखंड

(D) महाराष्ट्र

27)कोणती व्यक्ती केंद्रीय माहिती आयोगाचे (CIC) नवे मुख्य माहिती आयुक्त आहे?

(A) रघुराम राजन

(B) सुब्रमण्यम स्वामी

(C) उर्जित पटेल

(D) बिमल जुल्का. 

Current Affairs April 2020 Practice Quiz

28) पाठविल्या जाणाऱ्या ‘मंगळ मोहीम 2020’ यासाठी NASA संस्थेनी बनविलेल्या ‘मार्स रोव्हर’चे नाव काय आहे?

(A) अपोलो

(B) ईगल

(C) डेस्टीनी

(D) पर्सेवेरन्स. 

29)नव्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेत किती निधीसह एक विधेयक मंजूर करण्यात आले?

(A) 8.3 अब्ज डॉलर. 

(B) 6.6 अब्ज डॉलर

(C) 4.5 अब्ज डॉलर

(D) 10.1 अब्ज डॉलर

30) वर्ष 1920 ते वर्ष 2020 या कालावधीत ‘TIME 100 कव्हर्स फॉर 100 विमेन’ या यादीत कोणत्या दोन भारतीय महिलांचा समावेश करण्यात आला?

(A) कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स

(B) राजमाता गायत्री देवी आणि सोनिया गांधी

(C) मिताली राज आणि सानिया मिर्झा

(D) इंदिरा गांधी आणि अमृत कौर. 

Current Affairs April 2020 In Marathi

31)कोणते शहर उत्तराखंडची उन्हाळी राजधानी आहे?

(A) देहरादून

(B) गैरसैन. 

(C) हरिद्वार

(D) नैनीताल

32) आयुर्वेदासाठी मानदंड संज्ञा आणि विकृती नियमांसाठी आयुष मंत्रालयाद्वारे विकसित केलेल्या डिजिटल व्यासपीठाचे नाव काय आहे?

(A) नमस्ते पोर्टल. 

(B) हेलो पोर्टल

(C) स्वागत पोर्टल

(D) आयुर्वेद पोर्टल

33)  या शहरात ‘इंडियन नेव्हल सिम्फॉनिक ऑर्केस्ट्रा 2020’ हा संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

(A) भुवनेश्वर

(B) नवी दिल्ली

(C) भोपाळ

(D) चेन्नई

34) ____ या संस्थेच्या वतीने ‘5जी हॅकाथॉन’ या कार्यक्रमाची घोषणा केली.

(A) गूगल इंडिया

(B) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय

(C) दूरसंचार विभाग

(D) भारत सरकारच्या सहकार्याने मायक्रोसॉफ्ट

35) कोणत्या व्यक्तीने दक्षिणी नौदल कमांडचे चीफ स्टाफ ऑफिसर (ट्रेनिंग) या पदाची जबाबदारी स्वीकारली?

(A) अँटनी जॉर्ज

(B) अजित कुमार पी.

(C) अतुल कुमार जैन

(D) अनिल कुमार चावला

36) _ या शहरात ‘राष्ट्रीय सेंद्रिय खाद्यपदार्थ महोत्सव’चे उद्घाटन झाले.

(A) भोपाळ

(B) हैदराबाद

(C) नवी दिल्ली

(D) लखनऊ

37) कोणत्या राज्य सरकारने ‘थाई मांगूर’ माशांचे प्रजनन केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतला?

(A) तामिळनाडू

(B) पश्चिम बंगाल

(C) आसाम

(D) महाराष्ट्र

38) _ हा क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात 100 सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरला.

(A) रोहित शर्मा

(B) विराट कोहली

(C) रॉस टेलर

(D) महेंद्र सिंग धोनी

39) विद्यार्थ्यांना पाणी पिण्यास प्रोत्साहित करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने शाळेच्या तासात कमीतकमी तीन वेळा घंटा वाजवण्याचा अनोखा उपक्रम राबवित आहे?

(A) उत्तरप्रदेश

(B) दिल्ली

(C) कर्नाटक

(D) महाराष्ट्र

40) फेब्रुवारी 2020 या महिन्यात _ ही कंपनी ‘निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स’ यामध्ये नोंदवली गेली.

(A) महिंद्रा इन्फोटेक

(B) लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक (L&T)

(C) ट्रायकन इन्फोटेक

(D) यापैकी नाही

MPSC चालू घडामोडी एप्रिल 2020 प्रश्न

41) _ या शहरात प्रथम ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’ ही स्पर्धा होत आहे.

(A) भुवनेश्वर

(B) नवी दिल्ली

(C) कोलकाता

(D) चेन्नई

42)कोणत्या मंत्रालयाच्या वतीने CoNTeC व्यासपीठ उघडण्यात आले आहे?

(A) मनुष्यबळ व विकास मंत्रालय

(B) आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय. 

(C) महिला व बाल विकास मंत्रालय

(D) अल्पसंख्याक कल्याण मंत्रालय

43)निधन झालेले जोसेफ लोरी हे एक प्रसिद्ध _ होते.

(A) सामाजिक नेता.

(B) क्रिकेटपटू

(C) संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस

(D) कलाकार

44)कोणत्या रुग्णालयात कोविड-19 रूग्णांना मदत देण्यासाठी ह्युमनॉइड रोबोटची चाचणी घेतली जात आहे?

(A) AIIMS, दिल्ली

(B) गोवा वैद्यकीय महाविद्यालय, गोवा

(C) सवाई मान सिंग रुग्णालय, जयपूर. 

(D) मॅक्स रुग्णालय, दिल्ली

45)कोणत्या कंपनीने कोरोना महामारीविषयी माहिती पुरविण्यासाठी मॅसेंजर चॅटबॉट सादर केला?

(A) आयबीएम

(B) फेसबुक. 

(C) गूगल

(D) अॅमेझॉन

46)संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या व्यक्तीने ‘फिट इंडिया’ कार्यक्रमासोबत भागीदारी केली?

(A) हृतिक रोशन

(B) शिल्पा शेट्टी. 

(C) साहिल खान

(D) विद्युत जामवाल

47)कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या देशाने संरक्षण उत्पादन कायदा लागू केला?

(A) ब्रिटन

(B) संयुक्त अरब अमिराती

(C) चीन

(D) अमेरिका. 

48)कोणत्या कंपनीने केवळ पाच मिनिटांमध्ये कोविड-19 तपासणी करण्यासाठी छोट्या स्वरूपाचे हातळण्याजोगे टेस्ट किट तयार केले?

(A) ल्युपिन

(B) सिपला

(C) अ‍ॅबॉट लॅबोरेटरीज.

(D) सन फार्मास्युटिकल

49)निधन पावलेल्या दादी जानकी या कोणत्या आध्यात्मिक संस्थेचा भाग होत्या?

(A) ओशो फाउंडेशन

(B) द आर्ट ऑफ लिव्हिंग

(C) ब्रह्माकुमारीस. 

(D) रामकृष्ण मिशन

50)निधन पावलेले फ्लॉयड कार्डोज हे एक प्रसिद्ध _ होते.

(A) आचारी. 

(B) फुटबॉलपटू

(C) जिमनॅस्टीकपटू

(D) लेखक

MPSC चालू घडामोडी एप्रिल 2020 प्रश्न

51)“RaIDer-X” नावाचे नवीन स्फोटक शोधन यंत्र _ यांनी तयार केले.

(A) रिलायन्स डिफेन्स

(B) संरक्षण संशोधन व विकास संस्था. 

(C) इंडियन एअरफोर्स रिसर्च लॅबोरेटरीज

(D) बॉर्डर रिसर्च लॅबोरेटरीज

52)भारतीय हवाई दलाने  सोबत संरक्षण व धोरणात्मक अभ्यास विभागामध्ये एक ‘चेअर ऑफ एक्सलन्स’चे पद निर्माण करण्यासाठी सामंजस्य करार केला.

(A) दिल्ली विद्यापीठ

(B) भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली

(C) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. 

(D) भारतीय विज्ञान संस्था, बेंगळुरू

53)_____ या शहरात भारताच्या गृहमंत्र्यांनी ‘NSG प्रादेशिक केंद्रस्थळ’ याच्या परिसराचे उद्घाटन केले.

(A) नवी दिल्ली

(B) जयपूर

(C) रायपूर

(D) कोलकाता. 

54)दिव्यांग कारागीर व उद्योजकांच्या शिल्पकलेला व उत्पादनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने  या ठिकाणी ‘एकम महोत्सव’ आयोजित करण्यात आला.

(A) कोलकाता

(B) चेन्नई

(C) हैदराबाद

(D) नवी दिल्ली. 

55) पर्यटन मंत्रीच्या हस्ते 2 मार्च 2020 रोजी नवी दिल्लीत बहुभाषिक ‘अतुल्य भारत’चे संकेतस्थळ उघडण्यात आले. संकेतस्थळामध्ये पुढीलपैकी कोणती भाषा समाविष्ट करण्यात आली? 

1. चीनी

2. अरबी

3. स्पॅनिश

दिलेल्यापैकी अचूक उत्तर असलेला पर्याय निवडा:

(A) (1) आणि (2)                    (B) (2) आणि (3)

(C) (1) आणि (3)                   (D) (1), (2) आणि (3). 

56)_____ या दिवशी ‘शून्य भेदभाव दिन’ साजरा केला जातो.

(A) 1 मार्च. 

(B) 2 मार्च

(C) 3 मार्च

(D) 4 मार्च

57)_______ या राज्यात सहावी ‘इंडिया आयडिया परिषद’ आयोजित करण्यात आली.

(A) गुजरात. 

(B) उत्तरप्रदेश

(C) दिल्ली

(D) गोवा

58)सरबानंद सोनोवाल यांना डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार _ क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी दिला गेला.

(A) राजकारण. 

(B) ग्रामीण भागात सामाजिक सेवा

(C) हिंदी भाषेत गुणवत्तापूर्ण संशोधन

(D) यापैकी नाही

59)29 फेब्रुवारी 2020 रोजी _मध्ये ‘चिंतन बैठक’ या नावाखाली बंदरांची आढावा बैठक पार पडली.

(A) कोलकाता

(B) तामिळनाडू. 

(C) चेन्नई

(D) मुंबई

60)____ या शहरात ‘पुसा कृषी विज्ञान मेळावा 2020’ आयोजित करण्यात आला.

(A) नवी दिल्ली. 

(B) भोपाळ

(C) चेन्नई

(D) हैदराबाद

32) हे नवनियुक्त मुख्य दक्षता आयुक्त आहेत.

(A) के. व्ही. चौधरी

(B) शरद कुमार

(C) संजय कोठारी

(D) प्रदीप कुमार

MPSC Chalu Ghadamodi April 2020 in Marathi Pdf Download

61)  कोणत्या राज्यात ‘शाश्वत विकास ध्येये (SDG) परिषद 2020’ आयोजित केली जाणार आहे?

(A) त्रिपुरा

(B) मिझोरम

(C) मणीपूर

(D) आसाम

62)  कोणते आसाम राज्याचे पहिले “कचरा विरहित गाव” ठरले?

(A) गुवाहाटी

(B) सिलचर

(C) तेजपूर

(D) तिताबोर

63 ) ‘जागतिक सामाजिक न्याय दिन 2020’ याची संकल्पना काय होती?

(A) क्लोजिंग द इनइक्वलिटीज गॅप टु अचिव्ह सोशल जस्टिस

(B) क्लोजिंग द जेंडर इनइक्वलिटीज टु अचिव्ह सोशल जस्टिस

(C) क्लोजिंग द इकनॉमिक इनइक्वलिटीज टु अचिव्ह सोशल जस्टिस

(D) क्लोजिंग द इनइक्वलिटीज टु अचिव्ह सोशल जस्टिस

64)  कोणत्या व्यक्तीने ‘2020 ESPN फिमेल स्पोर्टसपर्सन ऑफ द ईयर’ पुरस्कार पटकवले?

(A) सायना नेहवाल

(B) पी. व्ही. सिंधू

(C) अश्विनी पोनप्पा

(D) ज्वाला गुट्टा

65) ‘आस्कदिशा’ चॅटबॉट याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. भारतीय रेल्वेनी ऑक्टोबर 2019 या महिन्यात ‘आस्कदिशा’ चॅटबॉट सेवा सादर केली.

2. ‘आस्कदिशा’ चॅटबॉट हे प्रारंभी हिंदी भाषेत सुरू करण्यात आले.

दिलेल्यापैकी अचूक विधान ओळखा:

(A) केवळ (1)

(B) केवळ (2)

(C) (1) आणि (2) दोन्ही

(D) ना (1), ना (2)

66) कोणते विद्यापीठ विद्यार्थ्यांना कल्पनाक्षम प्रकल्पांमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी ‘प्रोजेक्ट आयझॅक’ नावाचा नवा उपक्रम राबवित आहे?

(A) भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रास

(B) भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई

(C) भारतीय तंत्रज्ञान संस्था, गांधीनगर. 

(D) भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली

एप्रिल चालू घडामोडी Pdf Download

  सर्व चालू घडामोडी Pdf Download

   सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

   Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

   नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

   MPSC Chalu Ghadamodi April 2020 in Marathi PDF Download, chalu ghadamodi 2020,chalu ghadamodi 2020 marathi,chalu ghadamodi 2019 marathi,chalu ghadamodi 2019,chalu ghadamodi 2019 in marathi pdf free download,chalu ghadamodi 2019 pdf marathi download,chalu ghadamodi 2020 pdf,chalu ghadamodi batmya,chalu ghadamodi prashna,chalu ghadamodi 2019 marathi question and answer

   स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी

   स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी

   स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी

    All Exam Syllabus Pdf Download

     सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

     Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

     नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

     23 April 2020 चालू घडामोडी PDF डाउनलोड करा

     23 April 2020 चालू घडामोडी PDF डाउनलोड करा

     23 April 2020 चालू घडामोडी पुढीलप्रमाणे

     न्या. दीपंकर दत्ता होणार राज्याचे मुख्य न्यायमूर्ती.

     मुंबई उच्च न्यायालयाचे पुढील मुख्य न्यायामूर्ती म्हणून न्या. दीपंकर दत्ता यांच्या नावाची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कॉलेजियम’ने शनिवारी केली.

     न्या. दत्ता सध्या कोलकाता उच्च न्यायालयात ज्येष्ठतम न्यायाधीश आहेत. ते बढतीवर मुंबईत मुख्य न्यायाधीश म्हणून येतील.

     तसेच ‘कॉलेजियम’ची ही शिफारस आता केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाकडे जाईल व त्यानंतर न्या. दत्ता यांच्या नव्या नेमणुकीचे आदेश निघतील.तर सध्याचे मुख्य न्यायाधीश न्या. भूषण धर्माधिकारी येत्या 27 एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत.

     उत्तरप्रदेश: ‘जियोटॅग’ प्राप्त समुदायिक स्वयंपाकगृहे असणारे देशातले पहिले राज्य

     उत्तरप्रदेशातल्या समुदायिक स्वयंपाकगृहांना ‘जियोटॅग’ प्रदान करण्यात आले आहे, ज्यामुळे तयार झालेले अन्न कोणत्या ठिकाणी तयार करण्यात आले आहे त्याविषयी माहिती उपलब्ध होते.

     इतर ठळक बाबी

     ‘जियोटॅग’ सेवा मिळविण्यासाठी राज्य सरकारने गुगलकंपनीसोबत करार केला आहे.

     राज्यातल्या 75 जिल्ह्यातल्या 7,368 स्वयंपाकगृहांमध्ये दिवसाला सुमारे 12 लक्ष्य डब्बे तयार केले जात आहेत. एकूण समुदायिक स्वयंपाकगृहांपैकी 668 धार्मिक संस्था आणि अशासकीय संस्था चालवित आहेत.

     भारताच्या ISROच्या रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर या संस्थेनी संचारबंदीच्या काळात जागोजागी अडकलेल्या गोरगरिबांना वेळेवर भोजन मिळावे त्याकरिता कार्यरत असलेल्या स्वयंपाकगृहांची भौगोलिक माहिती प्राप्त करण्यासाठी एक अनुप्रयोग विकसित केले आहे, जेणेकरून स्वयंसेवेचे व्यवस्थापन करता येणार आहे.

     Day 24 एप्रिल 50 वा राष्ट्रीय पंचायती राज दिवस साजरा [National Panchayati Raj Day]

     ◾️ 24 एप्रिल ◾️ 2010 पासून ◾️ 73 वी घटनादुरुस्ती कायदा 1992 अंमलबजावणी : 24 एप्रिल 1993 ला अंमलबजावणी

     ◾️ 73 व्या घटनादुरुस्तीने पंचायत राजला संविधानिक दर्जा दिला ◾️ कलम 243 ते 243 (O)

     कलम 40: राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्वे ◾️ परिशिष्ट 11: पंचायती राजच्या 29 विषयांचा समावेश आहे.

     इतर महत्वाच्या चालू घडामोडी डाउनलोड करा

      सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

      Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

      नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now


      24 April 2020 चालू घडामोडी PDF डाउनलोड करा

      24 April 2020 चालू घडामोडी

      24 April 2020 चालू घडामोडी पुढीलप्रमाणे

      इराणचा पहिला लष्करी उपग्रह अवकाशात.

      अमेरिकेने निर्बंध लादल्याने दोन्ही देशात तणाव असतानाच इराणने लष्करी उपग्रह यशस्वीरीत्या अवकाशात सोडला असून तो कक्षेत प्रस्थापित करण्यात आला आहे, अशी माहिती इराणच्या रेव्होल्युशनरी गार्डने दिली आहे.

      तर गुप्त अवकाश कार्यक्रम सुरू असल्याचे संकेत इराणने वेळोवेळी दिले आहेत. दरम्यान हा उपग्रह सोडण्यात आल्याची खातरजमा इतर मार्गाने होऊ शकलेली नाही.

      रेव्होल्युशनरी गार्डने म्हटले आहे की, आम्ही लष्करी उपग्रह सोडला असून त्याचे नाव ‘नूर’असे आहे.तसेच इराणने जो उपग्रह सोडला आहे तो 425 कि.मी उंचीवरील कक्षेत असून इराणने सोडलेला तो पहिलाच लष्करी उपग्रह आहे.

      इराणमधील शाररौद येथील तळावरून हा उपग्रह सोडण्यात आला असून हा तळ सिमनान प्रांतात आहे. द्रव व घन इंधनावर चालणाऱ्या मेसेंजर प्रक्षेपकाच्या मदतीने हा उपग्रह सोडण्यात आला.

      सिंधू ‘बीडब्ल्यूएफ’ची सदिच्छादूत.

      जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या (बीडब्ल्यूएफ) ‘मी बॅडमिंटन’ मोहिमेची जागतिक सदिच्छादूत म्हणून भारताची अव्वल खेळाडू पी. व्हीसिंधू हिची निवड करण्यात आली आहे.

      तर बॅडमिंटन या खेळाविषयी असणारे प्रेम आणि आदर खेळाडूने या मोहिमेद्वारे व्यक्त करावा, असा उद्देश आहे.

      अखंडता आणि प्रामाणिकपणा यांना अनुसरून ‘बीडब्ल्यूएफ’कडून पाच वर्षांपासून खेळाडूंना धडे दिले जात आहेत.

      HDFC ने व्याजदरात केली कपात.

      एचडीएफसीने खातेधारकांना लॉकडाउन दरम्यान गुड न्यूज दिली आहे. एचडीएफसीने गृहकर्जाच्या व्याजदरात 0.15% कपात केली आहे. नवे दर आजपासून म्हणजे 22 एप्रिल 2020 पासून लागू झाले आहेत.

      करोना संकटामुळे मंदीचा सामना करणाऱ्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये कपात केली होती. त्यानंतर अन्य बँकाही व्याज दरांमध्ये कपात करत आहेत.

      तर मंगळवारी एचडीएफसीने हाउसिंग लोनवरील रिटेल प्राइम लेंडिंग रेटमध्ये (RPLR) 0.15% कपात करण्याचे जाहीर केले.तसेच एचडीएफसीने, गृह कर्जाच्या व्याजदरात 0.15% कपात केल्याने नवे व्याजदर आता 8.05% ते 8.85% दरम्यान असतील.

      EPFO कडून १५ दिवसांत १० लाख दावे निकाली; ३ हजार ६०० कोटींची रक्कम केली वर्ग.

      करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं कर्मचाऱ्यांना आपल्या भविष्य निर्वाह निधीतून ७५ टक्क्यांपर्यंतची रक्कम काढण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर अनेकांना आतापर्यंत यासाठी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे.

      गेल्या १५ दिवसांमध्ये भविष्य निर्वाह निधीनं १० लाख दावे निकालात काढले आहेत. याअंतर्गत एकू ३,६००.८५ कोटी रूपयांची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. निकालात काढण्यात आलेल्या दाव्यांपैकी ६.०६ लाख दावे हे करोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले आहेत.

      करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं कर्मचाऱ्यांना आपल्या भविष्य निर्वाह निधीतून रक्कम काढण्याची परवानगी सरकानं दिली आहे. करोनाच्या संकटात मदत म्हणून आपलं तीन महिन्यांचं मूळ वेतन किंवा भविष्य निर्वाह निधीत जमा असलेली ७५ टक्के रक्कम यापैकी जे काही कमी असेल ते काढण्याची परवानगी सरकानं दिली आहे.

      24 April 2020 Chalu Ghadamodi in Marathi,24 April 2020 चालू घडामोडी

      इतर महत्वाच्या चालू घडामोडी डाउनलोड करा

       सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

       Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

       नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

       भारत कोविड-19 आकस्मिक प्रतिसाद आणि आरोग्य यंत्रणेच्या 15,000 कोटी

       “भारत कोविड-19 आकस्मिक प्रतिसाद आणि आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेसाठी” 15,000 कोटी रुपयांच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

       भारत कोविड-19 आकस्मिक प्रतिसाद आणि आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेसाठी” 15,000 कोटी रुपयांच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

       पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोविड-19 महामारीच्या संकटावर मात करण्यासाठी.

       भारताच्या आकस्मिक प्रतिसाद आणि आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेसाठी आवश्यक असलेल्या 15,000 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली.

       ठळक बाबी

       हा निधी तीन टप्प्यांत वापरला जाणार आहे. कोविड-19 रोगाचा सामना करण्यात तातडीच्या उपायांसाठी 7,774 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

       उर्वरित निधी येत्या चार वर्षांमध्ये आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी वापरला जाणार आहे.

       केली जाणारी सर्व कार्ये आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीत केली जाणार आहेत.

       कोविड-19 रोगाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी आकस्मिक प्रतिसादाची व्यवस्था असून त्याच्या अंतर्गत निदान आणि कोविड-19 समर्पित रुग्णालये व उपचार सुविधा, संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी आवश्यक ती औषधे आणि उपकरणे यांची व्यवस्था तसेच राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील आरोग्य व्यवस्था अधिक सुदृढ करीत भविष्यात या आजाराचा उद्रेक होण्याची शक्यता लक्षात घेत रुग्णालये आणि इतर व्यवस्था सज्ज ठेवणे, निरीक्षण कामांसाठी प्रयोगशाळा आणि इतर व्यवस्था तयार करणे

       जागतिक संसर्गजन्य आजारविषयक संशोधन आणि समुदायांचा सहभाग, संपर्कातून असणाऱ्या धोक्यांविषयी सातत्याने माहिती देणे अशी कामे केली जाणार आहेत.

       या निधीपैकी मोठा हिस्सा आकस्मिक आरोग्य संकटांच्या सज्जतेसाठी खर्च केला जाणार आहे.

       त्याशिवाय, अशा जागतिक संसर्गजन्य आजारांचा सामना करण्यासाठी संशोधन व बहु-विभागीय राष्ट्रीय संस्थांच्या मदतीने राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट केली जाणार. यात समुदायांचा सहभाग वाढवणे, आजाराच्या धोक्याविषयी माहिती देणे आणि त्यापासून बचावासाठी उपाययोजना, क्षमता बांधणी, देखरेख इत्यादी कामे केली जाणार.

       प्रथम टप्प्यात चाललेली काही कार्ये –

       कोविड-19 च्या आजारावर उपचार करण्यासाठी समर्पित रुग्णालये, कोविड हेल्थ सेंटर,

       कोविड केअर सेंटर यांची उभारणी करण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 3,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी दिला जात आहे.

       विलगीकरण, तपासण्या, उपचार, आजाराचे संक्रमण रोखणे, संक्रमित भाग बंद करणे,.

       सामाजिक नियमांचे पालन आणि निरीक्षण यासाठीची सविस्तर मार्गदर्शक तत्वे, शिष्टाचार आणि नियमावली प्रसिद्ध करणे,

       अधिक संक्रमित भाग ओळखून तिथे प्रतिबंधक उपाययोजना राबविल्या जात आहे.

       निदान करण्यासाठीच्या प्रयोगशाळांची क्षमता आणि संख्या वाढवण्यात आली

       असून दैनिक क्षमता वाढविण्यात येत आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या अंतर्गत सध्या असलेल्या बहु-रोग चाचणी व्यवस्थेचा लाभ घेत

       13 लक्ष कोविड-19 टेस्ट किटची मागणी देण्यात आली आहे.

       सामुदायिक आरोग्य स्वयंसेवकांसह सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण निधीच्या अंतर्गत विमासंरक्षण देण्यात आले आहे.

       त्याशिवाय, PPE सूट, N-95 मास्क, व्हेंटीलेटर, टेस्ट किट आणि औषधे यांचा पुरवठा केंद्राकडून सातत्याने होत आहे.

       इतर महत्वाच्या चालू घडामोडी डाउनलोड करा

        सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

        Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

        नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

        जागतिक वसुंधरा दिवस World Earth Day

        ● जागतिक वसुंधरा दिवस [World Earth Day]

        जागतिक वसुंधरा दिवस [World Earth Day]

        • 22 एप्रिल
        • आधुनिक पर्यावरणीय चळवळींची सुरूवात 1970 च्या दशकात झाली याचे स्मरण म्हणून हा दिवस UNESCO कडून साजरा केला जातो
        • 2018 Theme: End Plastic Pollution
        • 2019 Theme: Protect Our Species

        ● प्रवास

        • World Earth Day ची संकल्पना सर्वप्रथम 1969 मध्ये युनेस्को पर्यावरणीय परिषदेत John McConnel यांनी मांडली
        • 1970 मध्ये पहिल्यांदा हा दिवस अमेरिकेत साजरा करण्यात आला.
        • 1971 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचे सचिव U Thant यांच्या कारकिर्दीत या करारावर सह्या झाल्या आणि हा दिवस जगभर साजरा केला जाऊ लागला.
        • 2009 मध्ये Gaylord Nelson यांनी या दिवसाला International Mother Earth Day असे व्यापक स्वरूप दिले.
        • सध्या भारतासह जगभरातील 192 पेक्षा जास्त देशात हा दिवस साजरा केला जातो.
        • भूजल पातळी तळाशी गेली आहे. आमचे पदार्थ विषारी होत आहेत. पिण्याच्या पाण्याचे संकट हे सूर्याच्या प्रमुखांप्रमाणे वाढत आहे. औद्योगिक कचरा, रासायनिक स्राव आणि मानवी उत्सर्जन यांनी गंगासारख्या पवित्र नद्यांना घाणीने दूषित केले आहे.

        पर्यावरणीय संरक्षणासाठी पाठिंबा दर्शविण्यासाठी पृथ्वी दिवस हा 22 एप्रिल रोजी जगभर साजरा होणारा वार्षिक कार्यक्रम आहे. १ 1970 in० मध्ये प्रथम साजरा केला गेलेल्या यामध्ये आता अर्थ दिन नेटवर्क [१] यांनी १ 3 than पेक्षा जास्त देशांमध्ये जागतिक स्तरावर समन्वयित कार्यक्रमांचा समावेश केला आहे. [२]

        पृथ्वीदिन २०१ On रोजी, अमेरिका, चीन आणि इतर १२० देशांनी पॅरिस करार केला होता. []] []] []] २०१ signing च्या पॅरिसमधील संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेत उपस्थित असलेल्या १ 195 nations राष्ट्रांच्या सहमतीने स्वीकारलेल्या ऐतिहासिक मसुदा हवामान संरक्षण कराराच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या या स्वाक्ष .्यामुळे समाधान होते.

        2020 Theme: Climate Action

        सॅन फ्रान्सिस्को येथे युनेस्कोच्या परिषदेत १ 69. In मध्ये शांतता कार्यकर्ते जॉन मॅककॉन्ले यांनी पृथ्वी आणि शांततेच्या संकल्पनेचा सन्मान करण्यासाठी एक दिवस प्रस्तावित केला होता, 21 मार्च, 1970 रोजी उत्तर गोलार्धातील वसंत ofतूचा पहिला दिवस साजरा करण्यासाठी. या दिवसाच्या निसर्गाच्या सुसज्ज उपकरणाला नंतर मॅककोनेल यांनी लिहिलेल्या घोषणेत मंजूर करण्यात आले आणि संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस यू. थंट यांनी स्वाक्षरी केली. एका महिन्यानंतर अमेरिकेच्या सिनेटचा सदस्य गेलर्ड नेल्सन यांनी 22 एप्रिल 1970 रोजी देशव्यापी पर्यावरणविषयक शिकवणी आयोजित करण्याचा विचार मांडला. त्यांनी डेनिस हेस या युवा कार्यकर्त्याला राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्त केले. नेल्सन आणि हेस यांनी या कार्यक्रमाचे नाव “अर्थ दिन” ठेवले. नेल्सन यांना नंतर त्यांच्या कार्याच्या स्मरणार्थ प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. []] पहिला पृथ्वी दिन अमेरिकेवर केंद्रित होता. १ 1990 1990 ० मध्ये, १ 1970 ,० मधील मूळ राष्ट्रीय समन्वयक डेनिस हेस यांनी हे १ and१ राष्ट्रांमध्ये आंतरराष्ट्रीय आणि आयोजन केलेले कार्यक्रम घेतले

        इतर महत्वाच्या नोट्स

         सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

         Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

         नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

         ​​रघुराम राजन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सल्लागार

         ​​रघुराम राजन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सल्लागारपदी नियुक्ती

         ​​रघुराम राजन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सल्लागारपदी नियुक्ती

         आरबीआयचे माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

         आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टालीना जॉर्जिवा यांनी ही घोषणा केली आहे.

         कोरोनाच्या प्रभावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मंदीचं सावट आहे. येत्या काळात हे सावट आणखी गडद होऊ शकतं.

         अशा परिस्थितीत काय उपाययोजना करायला हव्यात. यासाठी रघुराम राजन यांच्यासह जगभरातील ११ अर्थतज्ज्ञांची सल्लागार समिती बनवण्यात आली आहे.

         कोरोनामुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. अनेक मोठमोठे उद्योग बंद आहेत. त्याचे परिणाम जागतिक पातळीवरही होत आहेत.

         भविष्यात जगात मोठ्या मंदीची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी आतापासूनच उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

          सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

          Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

          नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

          आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन

          आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन: 12 एप्रिल

          आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन: 12 एप्रिल दरवर्षी 12 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. शांततेच्या उद्देशाने बाह्य अंतराळाचा वापर करण्याचा संदेश जगाला देण्यासाठी हा दिन साजरा करतात.1961 साली या दिवशी सोव्हियत अंतराळवीर युरी गागारिन यांनी अंतराळात भरारी घेतली होती. या ऐतिहासिक घटनेच्या स्मृतीत आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन साजरा केला जातो.

          या विषयाशी निघडीत नोट्स व इतर महत्वाच्याच्या PDF डाउनलोड करा

           सर्व विषयाचे नोट्स डाउनलोड डाउनलोड करा Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

           महत्वाचे शब्द : Anatarashtriy Antaral Manav Uddan Din 12 एप्रिल

           भारताचे माजी अँँटर्नी जनरल अशोक देसाई यांचं निधन

           भारताचे माजी अँँटर्नी जनरल अशोक देसाई यांचं निधन

           भारताचे माजी अँँटर्नी जनरल अशोक देसाई यांचं निधन सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील आणि भारताचे माजी अ‍ॅटर्नी जनरल अशोक देसाई यांचं निधन झालं आहे. सोमवारी सकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७७ वर्षांचे होते.

           पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आल होतं. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेकांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. अशोक देसाई यांनी १९५६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयातून वकिलीला सुरुवात केली होती.

           ८ ऑगस्ट १९७७ रोजी वरिष्ठ वकील म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. ९ जुलै १९९६ ते ६ मे १९९८ पर्यंत ते भारताचे अ‍ॅटर्नी जनरल होते. २००१ मध्ये त्यांचा पद्मविभूषण तसंच लॉ ल्युमिनेरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

           अशोक देसाई १९६४ मध्ये लॉ कॉलेज बॉम्बे येथे प्रोफेसर होते. तसंच १९६७ ते १९७२ दरम्यान बॉम्बे कॉलेज ऑप जर्नलिझम येथे ते लेक्चरर म्हणून काम करत होते. त्यांनी अनेक पुस्तकंदेखील लिहिली आहेत. तसंच त्यांचे अनेक लेखही प्रसिद्ध झाले आहेत.

           या विषयाशी निघडीत नोट्स व इतर महत्वाच्याच्या PDF डाउनलोड करा

            सर्व विषयाचे नोट्स डाउनलोड डाउनलोड करा Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

            महत्वाचे शब्द :अशोक देसाई यांचं निधन, Ashok Desai Nidhan

            करोनावर नियंत्रण मिळवणारे केरळ पहिले राज्य.

            करोनावर नियंत्रण मिळवणारे केरळ पहिले राज्य.

            करोनावर नियंत्रण मिळवणारे केरळ पहिले राज्य.

            ३० जानेवारीला केरळमध्ये करोना व्हायरसचा एक रुग्ण होता. १३ एप्रिलला ही संख्या ३७८ आहे. दोन जणांचा मृत्यू झाला आहे. १९८ करोनाग्रस्त पूर्णपणे बरे झाले आहेत. २७ मार्चला केरळमध्ये करोनाचे सर्वाधिक ३९ रुग्ण आढळले. १२ एप्रिलला म्हणजे दोन दिवसांपूर्वी संपूर्ण राज्यात अवघे दोन करोनाग्रस्त आढळले. १८ जानेवारीला केरळच्या आरोग्य मंत्रालयाने Covid-19 चा अलर्ट जाहीर केला व परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरु केली.

            आंतरराष्ट्रीय प्रवाशांना एक हेल्थ कार्ड दिले गेले. ज्यामध्ये त्यांच्याकडून प्रवासाची हिस्ट्री आणि अन्य आजार याबद्दलची माहिती भरुन घेतली जायची. विमानतळावर रुग्णवाहिका आणि जिल्हा रुग्णालयात इमर्जन्सीची व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली. ताप, सर्दी आणि घशाचा त्रास अशी लक्षणे असलेल्या रुग्णांना तात्काळ करोनासाठी बनवण्यात आलेल्या वॉर्डमध्ये हलवण्यात यायचे.

            चार फेब्रुवारीला केरळने Covid-19 राज्यासाठी धोकादायक असल्याचे जाहीर केले. खबरदारी म्हणून मास्क, ग्लोव्हज, व्यक्तीगत सुरक्षा उपकरणे आणि औषधांची खरेदी केली. जिल्हा रुग्णालयांना आयसोलेशन वॉर्डची व्यवस्था करायला सांगितली. अशा प्रकारच्या उपायोजना आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करुन केरळने करोना व्हायरसवर नियंत्रण मिळवले.

            देशात करोना व्हायरसचा पहिला रुग्ण केरळमध्ये सापडला होता. पण त्याच केरळमध्ये आता करोना बाधित रुग्णांची संख्या मोठया प्रमाणावर कमी झाली आहे. देशातील अन्य राज्यांमध्ये करोनाग्रस्तांची संख्या रोज वाढतेय पण केरळमध्ये आता करोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण अवघे तीन ते चार आहे. केरळने करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येचा आलेख कसा कमी केला? त्यावर कसे नियंत्रण मिळवले? हे समजून घेणे महत्वाचे आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

            केरळने सर्वप्रथम करोना चाचण्यांचा वेग वाढवून करोनाची लागण झालेल्या रुग्णांची ओळख पटवली. त्यानंतर रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना शोधून काढले व सक्तीचा २८ दिवसांचा क्वारंटाइन पीरीयड, याची प्रभावी अंमलबजावणी केली. जागतिक आरोग्य संघटनेचा क्वारंटाइनसाठी जो कालावधी आहे. त्यापेक्षा दुप्प्ट दिवसांचा क्वारंटाइन पीरीयड ठेवला. महत्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व मजबूत सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमुळे शक्य झाले.

            या विषयाशी निघडीत नोट्स व इतर महत्वाच्याच्या PDF डाउनलोड करा

             सर्व विषयाचे नोट्स डाउनलोड डाउनलोड करा Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

             महत्वाचे शब्द : राष्ट्रीय सभा अधिवेशने, Rashtry Congress Adhiveshane