Mpsc Economics Questions Practice Question Set – 1

31) जर आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा ढोबळमानाने कल पाहिला तर प्राथमिक उद्योगांचा (भागाचा) सहभाग 1950-51 च्या जी.डी.पी. च्या 55.4%  पासून 2008-09 मध्ये 16.9% पर्यंत उतरलेला आढळतो. प्राथमिक उद्योगाचे तीन सहभागी : कृषी, वने व मत्स्य व्यवसाय कसे राहिले ?

   1) वने व मत्स्य व्यवसाय जवळपास त्याच स्तरावर राहून कृषी क्षेत्रात झपाटयाने उतरण

   2) वने जवळपास त्याच स्तरावर राहून कृषी व मत्स्य व्यवसायात झपाटयाने उतरण

   3) मत्स्य व्यवसाय त्याच स्तरावर राहून कृषी व वने क्षेत्रात झपाटयाने उतरण

   4) कृषी, वने व मत्स्य व्यवसायात नियमित सावकाश उतरण

उत्तर :- 3

32) नैसर्गिक मत्तेच्या मौद्रिक मूल्यांमध्ये त्या वर्षात जो –हास झाला असेल त्याचे समायोजन एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडयाशी करण्याच्या पध्दतीला काय म्हणतात ?

1) हरित – गृह परिणाम    

2) हरित क्रांती    

3) हरित ऊर्जा    

4) वरील एकही नाही

उत्तर :- 4

33) पुढील कोणते विधान चुकीचे आहे ?

   1) देशभर आर्थिक सर्वेक्षण सर्वप्रथम 1977 मध्ये घेण्यात आले.

   2) असंघटित संघटनांबाबत माहिती संकलीत करण्याचा हा प्रयत्न होता.

   3) कृषी क्षेत्रातील संघटनांच्या विस्ताराबाबत प्राथमिक माहिती यात गोळा केली जाते.

   4) दुसरे, तिसरे व पाचवे आर्थिक सर्वेक्षण 1980, 1990 व 2005 मध्ये घेण्यात आले.

उत्तर :- 3

34) भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजणीसाठी/ मापनासाठी कोणती पद्धत वापरली जात नाही ?

1) उत्पन्न पध्दत    

2) उत्पादन पध्दत    

3) खर्च पध्दत    

4) वरीलपैकी नाही

उत्तर :- 3

35) 1950-51 ते 2010-11 या कालावधीत प्राथमिक क्षेत्राचा स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील वाटा पुढीलपैकी कोणत्या प्रमाणात घसरला ?

1) 55.4%  ते 14.3%    

2) 55.0%  ते 16.0%    

3) 56.0%  ते 15.0%    

4) 55.4%  ते 17.0%

उत्तर :- 1

36) खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?

   अ) उत्पादन पध्दती वस्तू आणि सेवांची निव्वळ मूल्य वृद्धी दर्शविते.

   ब) उत्पन्न पध्दती सेवा क्षेत्राचे स्थूल देशांतर्गत उत्पादन दर्शविते.

   क) राष्ट्रीय उत्पन्न मोजमापनासाठी उत्पादन पध्दती आणि उत्पन्न पध्दतीचा एकत्रित वापर केला जातो.

1) अ आणि क    

2) ब आणि क    

3) अ आणि ब    

4) वरील सर्व

उत्तर :- 4

37) हरित स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.

   अ) 1990 मध्ये हरित स्थूल देशांतर्गत उत्पादनाची संकल्पना विकसित करण्यात आली.

   ब) मानवी कल्याणावर परिणाम करणारे प्रदूषण आणि नैसर्गिक साधन सामुग्रीची कमी होणारी किंमत या घटकांचा विचार केला जातो.

   क) सन 2000 पासून चीनमध्ये हरित स्थूल देशांतर्गत उत्पादनाचे मोजमापन सुरू झाले.

         वरीलपैकी कोणते / ती विधान / ने योग्य आहे / आहेत ?

1) अ आणि क    

2) ब आणि क    

3) अ आणि ब    

4) फक्त क

उत्तर :- 2

38) खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?

   अ) सन 2011 – 12 मध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादनातील सेवा क्षेत्राचा हिस्सा 59 टक्के एवढा होता.

   ब) दळणवळण, व्यावसायिक सेवा आणि वित्त यात उच्च वृद्धीदर आढळून आला आहे.

1) अ फक्त बरोबर आहे      

2) ब फक्त बरोबर आहे

3) अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत    

4) अ आणि ब दोनही चुक आहेत

उत्तर :- 3

39) भारतातील उत्पन्न असमानतेची प्रमुख कारणे कोणती  ?

अ) मालमत्तेची खाजगी मालकी      

ब) वारसाहक्काचा कायदा

क) करचुकवेगिरी        

ड) समांतर अर्थव्यवस्था

1) अ आणि ब    

2) ब, क आणि ड    

3) अ, क आणि ड    

4) वरील सर्व

उत्तर :- 4

40) खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थूल देशी उत्पादनातील वार्षिक वृद्धी दर सर्वाधिक (9.7%) होता ?

1) 2005 – 06    

2) 2006 – 07    

3) 2007 – 08    

4) 2004 – 05

उत्तर :- 2