महत्वाचे शोध व संशोधक जीवन परिचय

महत्वाचे शोध व संशोधक जीवन परिचय Introduction to Important Research and Researcher Life

महत्वाचे शोध व संशोधक जीवन परिचय

सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

  इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

   इतर महत्वाच्या लिंक्स

   सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

   Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

   नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

   स्टीफन हॉकिंग भौतिकशास्त्रज्ञ

   स्टीफन हॉकिंग भौतिकशास्त्रज्ञ

   स्टीफन हॉकिंग भौतिकशास्त्रज्ञ Stephen Hawking Physicist

   विश्वउत्पत्ती शास्त्र, सामान्य सापेक्षता आणि भाग गुरुत्व इत्यादी विषयांतील योगदानासाठी ओळखले जाणारे ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ सैद्धांतिक Stephen Hawking यांनी ८ जानेवारी २०१७ ला पंच्याहत्तरी गाठली.

   १९८८ साली अत्यंत लोकप्रिय ठरत त्या वर्षीचे बेस्टसेलरही ठरलेले त्यांच्या ‘अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम‘ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळीच त्यांच्या जन्मतारखेविषयी जगाला कळाले. लहान मुलांच्या कल्पनारम्य पुस्तकांच्या मालिकेप्रमाणेच त्यांची लिखाणशैली आहे. भौतिकशास्त्रातील त्यांच्या कार्याविषयी जगाला ज्ञात असले तरी त्यांच्याविषयी अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या अज्ञात आहेत… 

   त्यातीलच काही गोष्टी उलगडणारा हा इन्फोग्राफमधून

   महत्वाचे संशोधक / शास्त्रज्ञ यांची माहिती जरूर वाचा

    विषयाचे नोट्स डाउनलोड करा

     इतर महत्वाच्या लिंक्स

     सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

     Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

     नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

     नील्स बोर भौतिकशास्त्रज्ञ

     नील्स बोर भौतिकशास्त्रज्ञ Niels Bohr physicist

     नील्स बोर भौतिकशास्त्रज्ञ

     जन्म – ऑक्टोबर ७, १८८५

     नील बोरनी अणूच्या रचनेवर सिध्दांत मांडला.त्यानी अर्नेस्ट रुदरफोर्ड यांच्या अणूच्या प्रतिकृतिमध्ये अामूलाग्र सुधारणा घडवून आणल्या व बोअरची अणूची प्रतिकृती जगासमोर ठेवली.

     हर्ट्झ व फ्रांक यांच्या संशोधनावरून असे दिसून आले की, अणूवर इलेक्ट्रॉनाचा आघात होण्याकरिता आघाती इलेक्ट्रॉनामध्ये किमान ऊर्जा असावयास पाहिजे; जेणेकरून अणूमधील विशिष्ट इलेक्ट्रॉन स्थानांतरित होतील. इलेक्ट्रॉनामधील किमान ऊर्जेला आयनीभवन वर्चस् असे म्हणतात. हे वर्चस् निरनिराळ्या मूलद्रव्यांसाठी निरनिराळे असते. प्रत्येक मूलद्रव्य प्रकाशाच्या विशिष्ट वर्णरेषा उत्सर्जित करीत असून त्या मूलद्रव्यातील अणूंच्या शक्य असणाऱ्या ऊर्जा-अवस्थेच्या श्रेणींशी तुल्य असतात. 

     ⇨ नील्स बोर यांना या संशोधनाची पूर्वकल्पना आलेली होती आणि त्यांनी 

     ⇨ पुंज सिद्धांता चा उपयोग करून अणूतील इलेक्ट्रॉनांची मांडणी व त्यांची गती म्हणजे अणूचे स्वरूप स्पष्ट करणारा पहिला सुसंगत सिद्धांत विकसित केला.

     सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

      इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

       इतर महत्वाच्या लिंक्स

       सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

       Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

       नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

       सुब्रह्मण्यन चंद्रशेखर भारतीय खगोलशास्त्रज्ञ

       सुब्रह्मण्यन चंद्रशेखर भारतीय खगोलशास्त्रज्ञ Subrahmaṇyana Candraśēkhara Bhāratīya Khagōlaśāstradnya

       सुब्रह्मण्यन चंद्रशेखर भारतीय खगोलशास्त्रज्ञ

       *स्मृतिदिन – ऑगस्ट २१ १९९५*

       सुब्रह्मण्यन चंद्रशेखर हे शास्त्रज्ञ आहेत.

        पद्मविभूषण सुब्रह्मण्यम् चन्द्रशेखर (१९१०-१९९५) भारतीय शास्त्रज्ञ.

        खगोलशास्त्राचे ब्रूस मेडल, नोबेल पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे मिळाली.

       चन्द्रशेखर यांचा जीवनप्रवास Life History Of Subrahmaṇyana Candraśēkhara

       डॉ. चन्द्रशेखर यांचा जन्म ऑक्टोबर १९ १९१० रोजी लाहोर येथे झाला. त्यांचे वडील सुब्रह्मण्यन् हे तेव्हा लाहोर येथे भारतीय रेल्वेच्या ऑडीट खात्यात होते. लाहोरला त्यांचा जन्म झाला त्याआधी काही महिने त्यांच्या आजोबांचे,रामनाथ चंद्रशेखरांचे निधन झाले होते.दाक्षिणात्य ब्राम्हण कुटुंबात आजोबांच्या मृत्युनंतर जन्माला आलेल्या अर्भकाला ,तीच व्यक्ती जन्माला आली,असे समजून तिचे नाव दिले जाते. तसे चंद्रशेखरांना त्यांच्या आजोबांचे नाव ठेवण्यात आले.लाहोरच्या लॉरेन्स गार्डन या भागात होते. वडील सुब्रह्मण्यन् हे कर्नाटक संगीताचे उत्तम जाणकार आणि स्वतः वायोलीन वादकही होते आणि संगीतशास्त्र वरील काही पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले तर चन्द्रशेखर यांच्या आई सीता बालकृष्णन याही अतिशय हुशार होत्या, त्यांनी इंग्रजीतील पुस्तकांचे तमिळ भाषेत अनुवाद केले. तर त्यांचे काका, विश्व प्रसिद्ध वैज्ञानिक सर सी. व्ही. रामन होते. अशा हुशार घराण्यातील असलेले डॉ. चन्द्रशेखर स्वतःही लहानपणापासून प्रतिभावान होते.

       डॉ. चन्द्रशेखर यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घरीच झाले, तर उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण मद्रास येथे झाले. १९३० साली डॉ. चन्द्रशेखर बी. एस. सी. झाल्यानंतर केंब्रीज विद्यापीठातील ट्रिनीटी कॉलेज मध्ये उच्च शिक्षणासाठी दाखल झाले. तेथून पी. एच. डी. झाल्यानंतर डॉ. चन्द्रशेखर शिकागो विद्यापीठ येथे १९३९ साली सहाय्यक प्राध्यापक म्हणून रूजू झाले.

       शोध व संशोधन कार्य an Amendment Of Subrahmaṇyana Candraśēkhara

       डॉ. चन्द्रशेखर यांची खरी ओळख म्हणजे “चन्द्रशेखर मर्यादा”. ११ जानेवारी १९३५ या दिवशी डॉ. चन्द्रशेखर यांनी एक सिद्धांत मांडला. पुंजवाद आणि सापेक्षतावाद यांची सांगड घालून चन्द्रशेखर यांनी श्वेत बटूंची कमाल वस्तुमानमर्यादा सूर्यापेक्षा ४४ टक्के इतकी असू शकते असे आपल्या सिद्धांताद्वारे मांडले. यात सूर्यापेक्षा लहान असलेले तारे म्हणजे बटू तारे यांचे अस्तीत्त्व कशामुळे टिकून आहे हे गणीताद्वारे डॉ. चन्द्रशेखर यांनी मांडले. या सिद्धांतासाठी डॉ. चन्द्रशेखर यांचा विरोध करणारे डॉ. आर्थर एडिंगटन हेही याच समस्येवर विचार करीत होते, पण त्यांना यावर उत्तर सापडले नाही. एडिंटन यांनी चन्द्रशेखर यांच्या सिद्धांताला विरोध केल्याने तो सिद्धांत मागे पडला.

       डॉ. चन्द्रशेखर यांनी १९३९ साली आपला सिद्धांत An Introduction to the Study of Stellar Structure नावाच्या पुस्तकात विस्तृत रुपात मांडला. १९५० च्या दशकात शास्त्रज्ञांना या सिद्धांतील मते पटू लागली. त्या दिशेने संशोधन सतत सुरूच होते. अखेर जगभरातील शास्त्रज्ञांना डॉ. चन्द्रशेखर यांचे म्हणणे पटले. १९८३ साली त्यांच्या संशोधनाची मान्यता म्हणून डॉ. चन्द्रशेखर यांना जगातील सर्वोच्च समजले जाणारे नोबेल पारितोषिक देण्यात आले.

       अखेरपर्यंत अमेरिकेतच स्थाईक राहणारे आणि संशोधन कार्यात कार्यरत राहणार्या डॉ. चन्द्रशेखर यांचा मृत्यु ऑगस्ट २१ १९९५ रोजी झाला.

       पुरस्कार Awards Of Subrahmaṇyana Candraśēkhara

       हेन्री नॉरिस रसेल व्याख्याता (इ.स. १९४९)

       ब्रुस पदक (इ.स. १९५२)

       रॉयल ऍस्ट्रोनॉमिकल सोसायटीचे सुवर्णपदक (इ.स. १९५३)

       पद्मविभूषण (१९६८) – भारत सरकार

       हेन्री ड्रेपर पदक (इ.स. १९७१)

       नोबेल पारितोषिक भौतिकशास्त्र (इ.स. १९८३)

       रॉयल सोसायटीचे कोप्ली पदक (इ.स. १९८४)

       Subrahmanyan Chandrasekhar Indian Astronomer,

       Mpsc Exam Syllabus Pdf Download

        All Exam Syllabus Pdf Download

        सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

        Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

        नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

        जयंत विष्णू नारळीकर भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक

        जयंत विष्णू नारळीकर भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक

        जयंत विष्णू नारळीकर भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक

        Jayant Vishnu Narlikar Indian Astronomer and Author

        जन्म – जुलै १९, १९३८

        नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे जुलै १९, १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानाची पदवी (B.Sc.) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडी च्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल व इतर अनेक बक्षिसे मिळाली.

        १९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत – गीता, गिरिजा व लीलावती. १९७२ साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. डॉ. नारळीकर यांच्या पत्नी मंगला नारळीकर ह्या ’नभात हसते तारे’ या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत. ’पाहिलेले देश भेटलेली माणसं’ हे त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेले पुस्तक आहे.

        संशोधन

        स्थिर स्थिती सिद्धान्त

        चार दशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या ‘यक्षांची देणगी’ या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.

        जयंत विष्णू नारळीकर यांच्या साहित्यातील भर

        विविध मराठी नियतकालिकांतून जयंत नारळीकर सातत्याने विज्ञानचिषयक माहितीने भरलेले ललित लेखन प्रसिद्ध होत असते. नारळीकरांच्या पुस्तकांची जगांतील अनेक भाषांत रूपांतरे झाली आहेत.

        *विज्ञानकथा पुस्तके*

        अंतराळातील भस्मासुर

        अभयारण्य

        टाइम मशीनची किमया

        प्रेषित

        यक्षांची देणगी

        याला जीवन ऐसे नाव

        वामन परत न आला

        व्हायरस

        जयंत विष्णू नारळीकर यांचे इतर विज्ञानविषयक पुस्तके

        आकाशाशी जडले नाते

        गणितातील गमतीजमती

        युगायुगाची जुगलबंदी गणित अन् विज्ञानाची (आगामी)

        नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर)

        विज्ञान आणि वैज्ञानिक

        विज्ञानगंगेची अवखळ वळणे विज्ञानाची गरुडझेप

        विश्वाची रचना

        विज्ञानाचे रचयिते

        सूर्याचा प्रकोप

        Facts And Speculations In Cosmology (सहलेखक : Geoffrey Burbidge)

        Seven Wonders Of The Cosmos

        *आत्मचरित्र*

        चार नगरांतले माझे विश्व

        जयंत विष्णू नारळीकर यांना मिळालेले पुरस्कार

        १९६५ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला.

        २००४ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला.

        २०१० मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला.

        त्यांना भटनागर पुरस्कार आणि एम. पी. बिरला हे पुरस्कारही मिळाले आहेत.

        २०१४ साली मिळालेला तेनाली (हैदराबाद) येथील नायुदअम्मा ट्रस्टचा डॉ. वाय. नायुदअम्मा स्मृती पुरस्कार-२०१३ जयंत नारळीकर यांच्या आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा २०१४ सालचा पुरस्कार मिळाला आहे. ’यक्षाची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार अमेरिकेतील फाउंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कार (२०१२)

        चरित्र

        डॉ. विजया वाड यांनी डॉ. नारळीकर यांचे ’विज्ञान यात्री डॉ.जयंत नारळीकर’ या नावाचे चरित्र लिहिले आहे.

        सर्व संशोधक माहिती वाचा व डाउनलोड करा

         इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

          चंद्रशेखर वेंकट रामन भारतीय संशोधक

          चंद्रशेखर वेंकट रामन भारतीय संशोधक

          चंद्रशेखर वेंकट रामन भारतीय संशोधक

                 💡सी.व्ही.रमन💡

          🖲🖲🖲🖲🖲🖲🖲

          🔹पूर्ण नाव–चंद्रशेखर वेंकट रामन

          🔹जन्म-नोव्हेंबर ७, १८८८ तिरुचिरापल्ली, तामिळनाडू, भार🔹 मृत्यू-नोव्हेंबर २१, १९७०

          बंगळूर, कर्नाटक, भारत

          🔹निवासस्थान-भारत

          🔹 नागरिकत्व-भारतीय

          🔹राष्ट्रीयत्व-भारतीय

          🔹धर्म-हिंदू

          🔹कार्यक्षेत्र-भौतिकशास्त्र

          🔹कार्यसंस्था-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स

          प्रशिक्षण-प्रेसिडेन्सी कॉलेज, चेन्नई

          🔹डॉक्टरेटकरता विद्यार्थी-जी.एन्‌. रामचंद्रन्‌

          🔹ख्याती-रामन् परिणाम

          🔹पुरस्कार-भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक

          भारतरत्न

          लेनिन शांतता पारितोषिक

          🔹वडील-चंद्रशेखर अय्य

          🔹 आई-पार्वती

          🔹पत्नी-लोकासुंदरी

          🔹अपत्ये-चंद्रशेखर, राधाकृष्णन

          चंद्रशेखर वेंकट रामन् (नोव्हेंबर ७, १८८८-नोव्हेंबर २१,१९७०) हे प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते.

           🍀जीवन

          रामन् यांचा जन्म तिरुचिरापल्ली आणि शिक्षण चेन्नई येथे झाले. त्यांनी कोलकाता विद्यापीठात १९१७-१९३३भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. रामन्‌ हे काही काळ बंगलोरातही होते, १९४७ साली ते रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले.

          🌔संशोधन🌔

          त्यांच्या रामन परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरिंग) याशोधासाठी ते ओळखले जातात. १९३० चेभौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक रामन् यांना मिळाले होते.

          🌷सन्मान

          चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. याच तारखेला रामन यांनी त्यांचा शोधनिबंध नेचर या मासिकात प्रसिद्धीसाठी पाठवला होता.

          सर सी.व्ही रामन यांच्या नावाने रँचो (रिसर्चर्स ॲन्ड नॅचरली क्लेव्हर ह्युमन ऑर्गनायझेशन) नावाची पुण्याची संस्था इ.स. २०११ सालापासून दरवर्षी डिसेंबरमध्ये ’सर सी.व्ही. रामन पुरस्कार’ देत असते. २०१५ सालच्या पुरस्काराचे मानकरी :

          १. डॉ. आदित्य अभ्यंकर (वैद्यकीय तंत्रज्ञान)

          २. कुरियन अरिंबूर (ऑटोमोबाईल)

          ३. राजेंद्र चोडणकर (नॅनो तंत्रज्ञान)

          ४. प्राची दुबळे (आदिवासी संगीत)

          ५. सुधीर पालीवाला (कचरा व्यवस्थापन)

          ६. रमेश बोतालजी (सांडपाणी व्यवस्थापन) ॑॑

          सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

           इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

            सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

            Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

            नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

            संशोधक व त्यांनी लावलेले शोध

            संशोधक व त्यांनी लावलेले शोध Researchers and Their Discoveries

            संशोधक व त्यांनी लावलेले शोध 

            क्र. शोध संशोधक

            1. सापेक्षता सिद्धांत = आईन्स्टाईन

            2. गुरुत्वाकर्षण= न्यूटन

            3. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट= आईन्स्टाईन

            4. किरणोत्सारिता हेन्री =बेक्वेरेल

            5. क्ष-किरण विल्यम= रॉटजेन

            6. डायनामाईट =अल्फ्रेड नोबेल

            7. अणुबॉम्ब= ऑटो हान

            8. प्ंजा सिद्धांत= मॅक्स प्लॅक

            9. विशिष्टगुरुत्व= आर्किमिडीज

            10. लेसऱ =टी.एच.मॅमन

            11. रेडिअम =मेरी क्युरी व पेरी क्यूरी

            12. न्युट्रॉन =जेम्स चॅड्विक

            13. इलेक्ट्रॉन= थॉम्पसन

            14. प्रोटॉन =रुदरफोर्ड

            15. ऑक्सीजन =लॅव्हासिए

            16. नायट्रोजन =डॅनियल रुदरफोर्ड

            17. कार्बनडाय ऑक्साइड =रॉन हेलमॉड

            18. हायड्रोजन =हेन्री कॅव्हेंडिश

            19. विमान =राईट बंधू

            20. रेडिओ =जी.मार्कोनी

            21. टेलिव्हिजन =जॉन बेअर्ड

            22. विजेचा दिवा =थाॅमस एडीसन

            23. सेफ्टी लॅम्प =हंप्रे डेव्ही

            24. डायनामो =मायकेल फॅराडे

            25. रिव्होल्व्हर =सॅम्युअल कोल्ट

            26. मशीनगन =रिचर्ड गॅटलिंग

            27. वाफेचे इंजिन =जेम्स वॅट

            28. टेलिफोन =अलेक्झांडर ग्राहम बेल

            29. थर्मामीटर = गॅलिलिओ

            30. सायकल= मॅक मिलन

            31. अणू भट्टी =एन्रीको फर्मी

            32. निसर्ग निवडीचा सिद्धांत= चार्ल्स डार्विन

            33. अनुवंशिकता सिद्धांत =ग्रेगल मेंडेल

            34. पेनिसिलीन = अलेक्झांडर फ्लेमिंग

            35. इन्शुलीन = फ्रेडरिक बेंटिंग

            36. पोलिओची लस = साल्क

            37. देवीची लस = एडवर्ड जेन्नर

            38. अॅंटीरॅबिज लस = लुई पाश्चर

            39. जीवाणू = लिवेनहाँक

            40. रक्तगट = कार्ल लँन्डस्टँनर

            41. मलेरियाचे जंतू = रोनाल्ड रॉस

            42. क्षयाचे जंतू = रॉबर्ट कॉक

            43. रक्ताभिसरण = विल्यम हार्वे

            44. हृदयरोपण = डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड

            45. डी.एन.ए.जीवनसत्वे = वॅटसन व क्रीक

            46 जंतूविरहित शस्त्रक्रिया= जोसेफ लिस्टर

            47. होमिओपॅथी = हायेमान

            सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

             इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

              इतर महत्वाच्या लिंक्स

              सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

              Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

              नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

              निकोलस कोपर्निकस गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ

              निकोलस कोपर्निकस गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ Nicholas Copernicus Mathematician and Astronomer

              निकोलस कोपर्निकस गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ

              पोलंडमधील प्रसिद्ध गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ

              स्मृतिदिन – मे २४,१५४३ *निकोलस कोपर्निकस ( जन्म – फेब्रुवारी १९,१४७३ – मृत्यु – मे २४,१५४३)* हे पोलंडमधील प्रसिद्ध गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते.

              त्यांनी ग्रहमालेचा अभ्यास व निरीक्षणातून महत्वाचे सिद्धान्त मांडले. यानुसार सूर्य हा ग्रहमालेचा केंद्रबिंदू असून पृथ्वी व इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात असा सिद्धांत मांडला.

              परंपरागत धार्मिक विचारांनुसार पृथ्वी हा विश्वाचा केंद्रबिंदू असून सूर्य प्रुथ्वीभोवती फिरतो या रूढ समजूतीस कोपर्निकसने धक्का दिला.

              त्यामुळे धर्मसंस्थेने त्यांना पाखंडी ठरवून त्यांचे विचार दडपण्याचा प्रयत्न केला.

              जन्म व बालजीवन

              कोपर्निकस यांचा जन्म १९ फेब्रुवारी १४७३ रोजी पोलंडच्या टॅारन या शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कोपरनाइड व आईचे नाव बार्बारा होते.

              दोन मुले व दोन मुलींत कोपर्निकस सर्वांत लहान होते. कोपर्निकस दहा वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले. त्यानंतर त्यांचे पालनपोषण त्यांचे मामा लुकास यांच्या देखरेखीखाली झाले.

              सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

               इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

                सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

                Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

                नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now