4G टेक्नोलॉजी संपूर्ण माहिती

4G टेक्नोलॉजी संपूर्ण माहिती

4G टेक्नोलॉजी संपूर्ण माहिती

सध्या तंत्रज्ञानाचे युग असून 1G पासूनची भरारी 4G पर्यंत घेतली आहे .आज सर्वत्र 4G ची चर्चा चालू आहे . मग नेमकं काय आहे 4G ची टेक्नोलॉजी याबाबत माहिती घेऊया 

          1G टेक्नोलॉजी

  1G टेक्नोलॉजी पासूनच वायरलेस टेलिफोन म्हणजेच मोबाइल चा परिचय जगाशी आला .

मात्र अनलॉग सिग्नलवर आधारित 1G टेक्नोलॉजी मध्ये खराब आवाज येणे , मोबाइल हँडसेट  चा मोठा आकार आणि वजन तसेच डाटा स्पीड अतिमंद अशा समस्या होत्या .

         2G टेक्नोलॉजी

  ही टेक्नोलॉजी डिजीटल सिग्नलवर आधारित असून याद्धारे आपण फ़ोन कॉल सोबतच इंटरनेटचाही आनंद घेऊ शकतो .

  2G चा डाटा ट्रान्सफर स्पीड 236 kbps आहे . यामध्ये पिक्चर मॅसेज , टेक्स्ट मॅसेज , आणि मल्टीमेडिया मॅसेज आरामाने पाठविता येतात .

मात्र विडियो कॉल , विडियो कॉन्फ्रेंसिंग आणि मोबाइल टिव्ही यात 2G अयशस्वी ठरते .

        3G टेक्नोलॉजी

डाटा ट्रान्सफर स्पीड 21 Mbps आहे . यामुळे विडियो कॉल , विडियो कॉन्फ्रेंसिंग आणि मोबाइल टिव्ही या सुविधा सहज उपलब्ध मिळू लागल्या  

  यामुळे मोबाइल व लॅपटॉप साठी स्पेशल ऑनलाइन टिव्ही अप्लिकेशन आले .

सोबतच फ़ोन मध्ये फ्रंट फेसिंग कॅमेरा देखील आला . याचा वापर विडियो कॉलिंग व सेल्फी साठी करू लागले .

        4G टेक्नोलॉजी

यांच्यात इंटरनेटचा स्पीड 100 mbp ते 1 Gbps पर्यंत आहे . 

यामुळे स्मार्टफोनवर विना बफरिंग टिव्ही पाहणे , विडियो कॉल करणे , चित्रपट , सॉफ्टवेयर , गेम्स डाउनलोड करणे आदि सुविधा अत्यंत जलद गतीने मिळू लागल्या . 

 तर चला 4G तंत्रज्ञान चा मनमुराद आनंद लुटूया ……….4G technology Information

सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

  इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

   इतर महत्वाच्या लिंक्स

   सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

   Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

   नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

   मायक्रो सोलर डोम आणि त्याची ठळक वैशिष्ट्ये

   मायक्रो सोलर डोम आणि त्याची ठळक वैशिष्ट्ये Micro Solar Dome and its Salient Features

   मायक्रो सोलर डोम आणि त्याची ठळक वैशिष्ट्ये

   मायक्रो सोलर डोम (MSD) हा केंद्रीय मंत्रालयाकडून सुरू करण्यात आलेला स्वच्छ व हरित ऊर्जा उपक्रम आहे. हा उपक्रम वीजेपासून वंचित असलेल्या भागात, विशेषतः शहरी झोपडपट्ट्या किंवा ग्रामीण भागात सूर्यप्रकाश वापरुन तेथील भागासाठी वीज निर्मिती करण्यासाठी चालविण्यात आलेला आहे.

   तसेच हे ग्रीन इंडिया अभियानासारख्या हरित ऊर्जा पुढाकाराला पूरक म्हणून असणार. 

   याची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

   यामध्ये पावसाच्या पाण्याची गळती होत नाही आणि हे 24 तास कार्यरत व सूर्योदयानंतर सतत चार तास कार्य करते.

   सूर्य ज्योती हे तीन पद्धतीने कार्य करते – (i) वीजेशिवाय दिवसा प्रकाशात, (ii) सोलर PV सह रात्री वेळी आणि (iii) कार्यान्वित झाल्यानंतर 17 तासांनी पारंपरिक ग्रिड सह रात्री वेळी.

   PV-MSD ची किंमत सुमारे रु.1200 आहे आणि नॉन PV आवृत्ती ची किंमत सुमारे रु. 500 आहे.

   उत्पादन प्रक्रिया वाढल्यास ही किंमत पुढे अनुक्रमे रु. 900 आणि रु. 400 पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे

   आणि भविष्यातील नगरविकास, ग्रामीण विकास आणि नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाकडून यासाठी विद्यमान अनुदान दिले जाईल.

   ABHAY ही समुद्री क्षेत्रात उथळ पाण्यात चालणार्‍या नौका व गस्तीचे जहाज अश्या लहान प्लॅटफॉर्म साठी विकसित केली गेलेली अॅक्टिव्ह-कम-पॅसिव्ह इंटीग्रटेड SONAR प्रणाली आहे. नुकतेच त्याचे निर्यात स्वरूप – HMS-X2 हे निर्यातीसाठी मंजूर करण्यात आले आहे.

   यामध्ये लक्ष्य च्या शोधासाठी, स्थितीसाठी आणि वर्गीकरणासाठी प्रगत अडाप्टिव्ह सिग्नल आणि माहिती प्रक्रिया तंत्राचा वापर केला गेला आहे.

   SONAR:

   हल माऊंट SONAR एडवांस्ड (HUMSA) ही लढाऊ गलबताच्या SONAR ची दुसरी पिढी आहे. याची NPOL ने रचना केली आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स ने याचे उत्पादन केले.

   HUMSA UG हे नवीन रीसीवर इलेक्ट्रॉनिक्स आणि अल्ट्रा-कूल पॉवर अॅमप्लीफायर प्रणाली असलेले HUMSA ची विकसित आवृत्ती आहे. HUMSA मध्ये घटकांच्या (component) वापरामुळे निर्माण होणार्‍या देखरेख समस्येला हाताळण्यासाठी हे विकसित केले गेले आहे.

   NACS

   नियर-फील्ड अकॉस्टिक कॅरक्टराइझेशन सिस्टम (NACS) ही एक आरोग्य निरीक्षण प्रणाली (health monitoring system) आहे, जे SONAR च्या नैसर्गिक अवस्थेमधील कामगिरी (in-situ performance) निर्धारित करण्यासाठी वापरले जाते.

   हे SONAR च्या वारंवारता वर अवलंबून असलेले 3-D ट्रान्समिशन आणि रिसेप्शन वैशिष्ट्यांना शोधण्यासाठी वापरले जाते. NACS ला HUMSA-NG सोबत एकाग्र करण्यात आले आहे आणि त्याचे लढाऊ जहाजावरचे कार्य सिद्ध झाले आहे. 

   AIDSS:

   एडवांस्ड इंडिजिनियस डिसट्रेस SONAR सिस्टम (AIDSS) हे संकटात वापरात येणारे म्हणून कार्य करणारे पाणबुडीवरील अतिरिक्त तात्काळ संकेत पाठविणारे एक साधन आहे.

   कोणत्याही कारणास्तव जर पाणबुडी बुडत असेल तर हे SOS संकेत पाठवणारे आणीबाणी परिस्थितीमधील (distress) पूर्व-नियुक्त SONAR आहे.

   सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

    इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

    इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

     इतर महत्वाच्या लिंक्स

     सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

     Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

     नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

     जगातील पहिला सोलार महामार्ग फ्रान्सने बनवला

     जगातील पहिला सोलार महामार्ग फ्रान्सने बनवला

     जगातील पहिला सोलार महामार्ग फ्रान्सने बनवला

     फ्रान्सने जगातील पहिला सोलार महामार्ग बनवला आहे. जगातील पहिला सोलार महामार्ग फ्रान्सने बनवला या सौरउर्जेचा वापर करून दररोज तीन हजांराहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावाला रोज वीज उपलब्ध होणार आहे. अशाप्रकारे अनोखा उपक्रम राबवणारा फ्रान्स हा जगातील पहिलाच देश आहे.

     आपल्या देशातील वीजेचा तुटवडा भरून काढण्यासाठी फ्रान्सने अनोखा उपक्रम राबवला आहे. या देशाने सोलार पॅनल बसवलेला मोठा महामार्ग तयार केला आहे. यातून तयार होणा-या उर्जेचा वापर करून जवळपास साडेतीन हजार लोकांना रोज विद्युत पुरवठा उपलब्ध होणार आहे. दोन वर्षांपूर्वीच हा रस्ता तयार करण्यात आला होता मात्र या रस्त्यात कोणत्याही त्रुटी भविष्यात निर्माण होऊ नये यासाठी वेगवेगळ्या चाचण्या घेण्यात आल्या. या मोठ्या महामार्गावर २ हजार ८८० सोलार पॅनल बसवण्यात आले आहे. अक्षय उर्जेचा वापर करून असा अनोखा उपक्रम राबवल्याबद्दल फ्रान्सचे कौतुक होत आहे.

     हा महामार्ग आजपासून खुला करण्यात आला आहे. हा महामार्ग अत्यंत मजबूत असल्याचे फ्रान्स सरकारने सांगितले आहे. पण तरीही या महामार्गावरून अवजड वाहाने गेलीच तर मात्र या सोलार पॅनलला मोठे नुकसान पोहचू शकते अशी भिती अनेकांनी व्यक्त केली आहे. या महामार्गामुळे एका गावाला रोज विजपुरठा होऊ शकतो असे फ्रान्सने सांगितले आहे. पण अनेकांनी या महामार्गाला विरोध केला आहे. फ्रान्स सरकारने हा सोलार महामार्ग बनवण्यासाठी अवाजवी खर्च केला असल्याचे अनेकांचे मत आहे. इतका खर्च करण्यापेक्षा सरकारने रस्ते दुरूस्त करायला हवे होते असेही मत व्यक्त करत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या रस्त्यामुळे वर्षभर २८० मेगाव्हॅट विद्युत निर्मिती होईल असा दावा सरकारने केला आहे. जर्मनी, नेदरलँड आणि अमेरिकेतही असा प्रयोग केला जाणार आहे.

     सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

      इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

       इतर महत्वाच्या लिंक्स

       सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

       Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

       नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

       France built the world’s first solar highway,

       अणुबाँब तयार करणे प्रक्रिया माहिती

       अणुबाँब तयार करणे प्रक्रिया माहिती 

       अणुबाँब तयार करणे प्रक्रिया माहिती Atomic Bomb Making Process Information

       अणुकेंद्रीय स्फोटामध्ये मुख्यत: अणुकेंद्र भंजन (फुटणे) किंवा संघटन (दोन अणुकेंद्रांचा संयोग होणे) या अणुकेंद्रीय विक्रियांच्या द्वारे किंवा

       या दोन्ही विक्रियांच्या साहाय्याने स्फोटक शक्ती निर्माण होते [→अणुऊर्जा].

       २ ऑगस्ट १९३९ या दिवशी आइन्स्टाइन यांनी अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे त्यावेळचे अध्यक्ष रूझवेल्ट यांस लिहिलेल्या प्रसिद्ध पत्रात,

       युरेनियम या मूलद्रव्याच्या भजन-विक्रियेचा उपयोग एक नवीन अत्यंत विध्वंसक बाँब तयार करण्यासाठी होण्याची शक्यता वर्णन केली होती.

       २ डिसेंबर १९४२ रोजी शिकागो विद्यापीठात फेर्मी यांनी भंजन-विक्रियेची साखळी निर्माण करण्यात प्रथमच यश मिळविले.

       पुढे कोलंबिया नदीवरील हॅनफर्ड येथे प्लुटोनियमाच्या (अणुबाँब तयार करण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या एका मूलद्रव्याच्या) उत्पादनासाठी मोठी यंत्रसामग्री उभारण्यात आली.

       अणुबाँब निर्माण करण्याचा प्रकल्प जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांच्या नेतृत्वाखाली लॉस ॲलॅमॉस (न्यू मेक्सिको) येथील प्रयोगशाळेकडे सोपविण्यात आला.

       १९४५ मध्ये तीन अणुबाँब तयार झाले. पहिल्या प्लुटोनियम (२३९) बाँबचा चाचणी प्रयोग ॲलॅमॉगोर्डो सँड्‌स

       (न्यू मेक्सिको) या ठिकाणी १६ जुलै १९४५ या दिवशी झाला.

       अणुबाँब तयार करणे

       पण सर्व जगाचे लक्ष वेधले गेले, ते मात्र ६ ऑगस्ट १९४५ रोजी झालेल्या जपानमधील हीरोशीमा शहरावरील युरेनियम (२३५)च्या अणुबाँब हल्ल्यामुळे.

       या स्फोटामुळे, जवळजवळ २०,००० टन ट्रायनायट्रोटोल्यूइन (टीएनटी)च्या (एक स्फोटक द्रव्य) स्फोटामुळे जेवढी ऊर्जा निर्माण झाली असती, तेवढी ऊर्जा निमिषार्धात [सु. एक मायक्रोसेकंद (१०-६ सेकंद)] निर्माण झाली व हीरोशीमा शहर जवळजवळ नष्ट झाले.

       तिसरा प्लुटोनियम (२३९) बाँब नागासाकी शहरावर ९ ऑगस्ट १९४५ रोजी टाकण्यात आला. दोन्ही बाँबचा स्फोट ६५० मी. उंचीवर झाला

       आणि हवेच्या अत्युच्च दाबामुळे व स्फोटात उत्पन्न झालेल्या प्रचंड उष्णतेमुळे त्या शहरांचा जवळजवळ नाश झाला.

       यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर १९५२ मध्ये पॅसिफिक महासागरातील मार्शल बेटामध्ये ‘माइक’ या नावाच्या हायड्रोजन बाँबचा चाचणी स्फोट करण्यात अमेरिकेने यश मिळविले.

       १ मार्च १९५४ या दिवशी बिकनी ॲटॉल (मार्शल बेटे) वर जो स्फोट झाला,

       त्याची शक्ती १५ × १०६ टन टीएनटीच्या शक्तीएवढी होती.

       मार्च १९५४ मध्ये आणखी एक ऊष्मीय अणुकेंद्रीय (संघटन विक्रियेद्वारे होणारा) स्फोट करण्यात आला.

       या दोन्हींमध्ये लिथियम हायड्राइड (Li6H2) या द्रव्याचा उपयोग झाला असावा.

       यापूर्वी ऑगस्ट १९५३ मध्ये रशियाने केलेल्या ऊष्मीय अणुकेंद्रीय स्फोटामध्ये Li6H2चा उपयोग केल्याचे आढळले होते.

       इंग्लंड, फ्रान्स, रशिया व चीन या चारही राष्ट्रांनी दोन्ही प्रकारचे बाँब तयार यश मिळविले आहे.

       अमेरिका, रशिया, इंग्लंड व चीन या देशांनी केलेल्या सुरुवातीच्या स्फोटांची माहिती कोष्टक क्र. १ मध्ये दिली आहे.

       अणुबाँब तयार करणे प्रक्रिया माहिती Atomic Bomb Making Process Information

       अणुकेंद्रीय स्फोट : भंजन आणि संघटन-स्फोटांच्या शास्त्रीय भूमिकेचा प्रथमत: थोडक्यात विचार करू. युरेनियम (२३५), युरेनियम

       कोष्टक क्र. १ : विविध देशांनी केलेले सुरूवातीचे अणुबाँबचे स्फोट

       प्रकार

       अमेरिका अणुबाँब ऑगस्ट १९४५

       रशिया ऑगस्ट १९४९

       इंग्लंड ऑक्टोबर १९५२

       चीन ऑक्टोबर १९६४

       हायड्रोजन बाँब ऑक्टोबर नोव्हेंबर १९५२ (१० मेगॅटन)

       ऑगस्ट १९५३ (१मेगॅटन) –

       जून १९६७ (५ मेगॅटन)

       हवेतील हायड्रोजन बाँब मे १९५६ (१५ मेगॅटन)

       नोव्हेंबर १९५५ (१० मेगॅटन)

       मे १९५७ (५ मेगॅटन) 

       (२३३), प्लुटोनियम (२३९) यांमधील भंजन-विक्रियांची साखळी स्वयंचलित असते; उलट युरेनियम (२३८), थोरियम (२३२) यांचे भंजन बाह्य साधनांनी, म्हणजे शक्तिमान न्यूट्रॉनांच्या सतत पुरवठ्याने, सांभाळावे लागते. पहिल्या प्रकारात नुसते ‘भंजन’ म्हणतात व दुसऱ्यास ‘बहिःपोषित भंजन’ म्हणतात.

       या दोन्ही प्रकारच्या स्फोटांमध्ये वस्तुमानाचे ऊर्जेत रूपांतर होते. आइन्स्टाइन यांनी मांडलेल्या E=mc2[E= ऊर्जा, m= वस्तुमान व c= प्रकाशवेग] या समीकरणाचेच हे अणुस्फोट प्रत्यक्ष पुरावे होत.

       पण या दोन प्रकारच्या स्फोटांमध्ये, वस्तुमानाचे ऊर्जेत रूपांतर होण्याच्या वेळी घडून येणाऱ्या विक्रिया मात्र भिन्न आहेत.

       हलक्या अणुकेंद्रांच्या संघटनेची काही उदाहरणे

       अणुबाँब हा युरेनियम (२३५) अथवा प्लुटोनियम (२३९) यांसारख्या अणूंच्या न्यूट्रॉनाद्वारा घडून येणाऱ्या भंजन-विक्रियेवर आधारित आहे.

       अशा भंजन-विक्रियेत निर्माण होणाऱ्या खंडांचे वस्तुमान मूळ द्रव्यापेक्षा कमी असते व काही वस्तुमानाचे ऊर्जेत रूपांतर होते.

       याउलट हायड्रोजन बाँबचा स्फोट हा हलक्या अणुकेंद्रांच्या भारी अणुकेंद्रात रूपांतरण होणाऱ्या संघटनेवर आधारित आहे.

       उदा., हायड्रोजन व ट्रिटियम (हायड्रोजनाच्या तिप्पट अणुभार असलेला समस्थानिक, →समस्थानिक) यांच्या संयोगामुळे हीलियमाचा अणू तयार होतो.

       त्याचे वस्तुमान हायड्रोजन व ट्रिटियम यांच्या वस्तुमानापेक्षा कमी असते व या कमी झालेल्या वस्तुमानाचेच ऊर्जेत रूपांतर होते. अशा प्रकारच्या विक्रियांद्वारा फार मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची उत

       ्पत्ती होते. १ ग्रॅम युरेनियम (२३५) मधील सर्व अणूंचे भंजन झाले, असे समजल्यास जवळजवळ २० अब्ज कॅलरी एवढी ऊर्जा निर्माण होते.

       हलक्या अणूंच्या संघटनेवर आधारित असलेल्या विक्रियांमध्ये तर याहीपेक्षा अधिक पटीने ऊर्जा प्राप्त होते. एक ग्रॅम चांगल्या दर्जाच्या दगडी कोळशापासून अंदाजे ६,००० कॅलरी एवढीज ऊर्जा प्राप्त होते. भंजन-विक्रिया असो अथवा संघटन-विक्रिया असो, अशा विक्रियांमध्ये रासायनिक विक्रियांच्या मानाने फार प्रचंड प्रमाणावर ऊर्जा निर्माण होत असल्यामुळेच अणु-अथवा हायड्रोजन-बाँब एवढा संहारक असतो.

       अणुबाँब तयार करणे काही उदाहरणे

       अणुबाँब-स्फोट हा भंजन-स्फोट असतो आणि त्यात उत्पन्न होणारी ऊर्जा २० किलोटन टीएनटी एवढी असते. युरेनियम (२३८) वापरलेल्या बहि:पोषित भंजन-स्फोटाची ऊर्जा एक मेगॅटन (किंवा त्याहून अधिक) टीएनटी इतकी असते आणि म्हणून  ‘अल्प शक्ती’ अणुबाँबच्या मानाने वेगळा दाखविण्याकरिता याला ‘उच्च शक्ती’ स्फोट म्हणतात.

       हायड्रोजन बाँब, संघटन बाँब किंवा ऊष्मीय अणुकेंद्रीय बाँब या नावांनी ओळखले जाणारे बाँबही उच्च शक्तीचेच आहेत. ‘

       उच्च शक्ती’ स्फोट मुख्यत: संघटन बाँबचे स्फोट असावेत असे सामान्यपणे मानले जाई; परंतु मार्च १९५४ च्या बिकिनी चाचणी प्रयोगात वापरलेला ‘उच्च शक्ती’ बाँब बहि:पोषित भंजन-स्वरूपाचा पण भंजन-संघटन-भंजन अशा प्रकारचा स्फोट होता असे स्पष्ट झाले आहे.

       या दोन बाँबमधील मूलभूत विक्रिया वेगळ्या असल्यामुळे त्यांच्या बांधणीत आणि स्फोटापासून घडून येणाऱ्या परिणामांतही फार मोठा फरक असतो.

       अणुबाँब : अणुबाँब म्हणजे जणू काय एक सामर्थ्यवान अनियंत्रित विक्रियकच (अणुकेंद्रीय विक्रिया ज्या साधनात घडवून आणतात ते साधन) होय.

       अणुकेंद्रीय विक्रियकामध्ये निर्माण झालेली ऊर्जा विधायक कार्यासाठी वापरली जावयाची असल्यामुळे विक्रियेचा वेग नियंत्रित केला जातो व निर्माण झालेली ऊर्जा वाहून नेण्यासाठी शीतकाची योजना

       केली जाते [→ अणुकेंद्रीय अभियांत्रिकी]. याउलट अणुबाँब हा प्रखर स्फोटक म्हणूनच वापरावयाचा असल्यामुळे, स्फोटाची तीव्रता वाढविण्यासाठी जास्तीत जास्त ऊर्जा कमीत कमी वेळात निर्माण करणे हेच येथे ध्येय असते व त्याला अनुसरूनच अणुबाँबची रचना केलेली असते.

       ही गोष्ट साध्य करण्यासाठी भंजन-साखळी-विक्रियेचा वेग शक्य तितका अधिक करण्याची काळजी घ्यावी लागते.

       भंजन-साखळी-विक्रियेचा वेग हा मुख्यत्वे विक्रियेचे गुणनपद [→ अणुकेंद्रीय अभियांत्रिकी] व विक्रियेत भाग घेणाऱ्या न्यूट्रॉनांचे विशेष संभाव्य आयुर्मान या दोन गोष्टींवर अवलंबून असतो. यांपैकी विक्रियेचे गुणनपद एकाहून शक्य तेवढे जास्त असावे व न्यूट्रॉनांचे आयुर्मान शक्य तेवढे कमी असावे. यांपैकी दुसरी अट साध्य करणे फारसे कठीण नाही.

       यासाठी शुद्ध प्लुटोनियम (२३९) अथवा युरेनियम (२३५)ने संपन्न असलेल्या युरेनियमाचा वापर करावा लागतो. अर्थात युरेनियम (२३५)ने अथवा प्लुटोनियम (२३९)ने संपन्न अशा साध्या युरेनियमाची निर्मिती करणे फार कठीण गोष्ट आहे

       अणुबाँब तयार करणे संघटनेची काही उदाहरणे

       . त्यासाठी युरेनियमाचे दोन समस्थानिके वेगळे करू शकणारी वायवीय विसरण (एकमेकांत मिसळण्याची क्रिया करणारी) यंत्रणा उभारावी लागते किंवा युरेनियम (२३९) चे प्लुटोनियम (२३९)मध्ये रूपांतर करण्यासाठी अणुकेंद्रीय विक्रियकाची व या प्लुटोनियम (२३९) चे रासायनिक पृथक्करण करून तो वेगळा करण्यासाठी यंत्रणा उभारावी लागते.

       आता दुसरा प्रश्न म्हणजे इष्ट क्षणी भंजन-विक्रिया चालू करून त्या विक्रियेचे गुणनपद कमाल मर्यादेपर्यंत वाढविणे हा होय. येथे  ‘इष्ट क्षणी’ या शब्दांना फार महत्त्व आहे. नाही तर अणुबाँबपासून शत्रूचा संहार होण्याऐवजी आत्मनाशच ओढवेल. म्हणून

       अणुबाँबमधील घटकद्रव्यांची मांडणी अशा कुशलतेने करतात की, इच्छित क्षणापर्यंत या घटकांमध्ये भंजन-विक्रिया चालू होत नाही.

       पण इच्छित क्षणी मात्र या घटक-द्रव्यामध्ये फार तीव्र वेगाची भंजन-विक्रिया चालू होते. कोणत्याही भंजनक्षम पदार्थात ही विक्रिया चालू राहण्यासाठी त्या पदार्थाचे आकारमान व वस्तुमान एका किमान मर्यादेपेक्षा जास्त असावे लागते. किमान वस्तुमान हे खुद्द पदार्थावर—त्याच्या संरचनेवर व आकारावर—अवलंबून असते. म्हणून अणुबाँबच्या इंधनाचे स्वरूप असे ठेवतात की,

       अंतिम क्षणी किमान वजनापेक्षा कमी असलेले तुकडे फार थोड्या अवधीत एकत्र येऊन एकाहून अधिक गुणनपद असणारे आकारमान प्राप्त होईल. हे कसे साधले जाते हे एक लष्करी गुपित आहे. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की, किमान वजनापेक्षा कमी आकारमानाचे तुकडे जेवढ्या झपाट्याने एकत्र आणता येतील, तेवढ्या प्रमाणात स्फोटाची तीव्रता वाढेल.

       त्याचप्रमाणे पदार्थात ज्या प्रमाणात स्वयंस्फूर्त भंजन-विक्रिया घडून येत असतील त्या प्रमाणात हा वेग अधिक असणे जरूर असते. एकाहून कमी गुणनपद असलेल्या स्थितीपासून एकाहून जास्त गुणनपद असलेल्या स्थितीप्रत जाण्याचा काल काही दशलक्षांश सेकंदच असावा लागतो. हा काल लांबल्यास बाँब निरुपयोगी ठरतो. रासायनिक द्रव्यांच्या स्फोटांच्या

       साहाय्याने ही विक्रिया घडवून आणली जाते. आकृतीवरून या विक्रियेच्या स्वरूपाची कल्पना येईल. अणुबाँबच्या मध्यभागी भंजनक्षम पदार्थाचा कमी घनता असलेला एक पोकळ गोल असून त्याभोवती चांगल्या रासायनिक स्फोटक द्रव्यांचे आवरण आहे. पोकळ गोलाचे किमान आकारमान व वजन भरीव गोलाच्या मानाने पुष्कळ अधिक असते.

       त्यामुळे भंजन-विक्रिया चालू न होताही भरीव गोलाच्या किमान वजनापेक्षा पुष्कळच अधिक भंजनक्षम पदार्थ एकत्र ठेवता येतात.

       अणुबाँब तयार करणे संघटनेची काही उदाहरणे

       अणुबाँबचा आराखडा (एक कल्पना). (१) युरेनियम (२३८) आवरण, (२) ठिणगी पाडणारा  भाग, (३) रासायनिक स्फोटक द्रव्ये, (४) प्लुटोनियमाचा पोकळ गोल.अणुबाँबचा आराखडा (एक कल्पना). (१) युरेनियम (२३८) आवरण, (२) ठिणगी पाडणारा भाग, (३) रासायनिक स्फोटक द्रव्ये, (४) प्लुटोनियमाचा पोकळ गोल.या रासायनिक स्फोटक द्रव्याच्या आवरणावर अनेक ठिकाणी एकाच वेळी ठिणगी पडण्याची व्यवस्था केली जाते व इच्छित क्षणी रासायनिक द्रव्याचा स्फोट होतो. त्यामुळे निर्माण झालेल्या दाबतरंगामुळे मोठ्या व्यासाच्या पोकळ गोलाचे लहान व्यासाच्या अधिक घन व भरीव गोलामध्ये रूपांतर होते.

       म्हणजेच भंजनक्षम पदार्थ एकाहून कमी गुणनपद असलेल्या स्थितीतून एकाहून अधिक गुणनपद असलेल्या स्थितीत जातो. याच वेळी भंजन विक्रिया चालू झाल्यास तिचा वेग झपाट्याने वाढतो. उदा., गुणनपद २·० असल्यास व  न्यूट्रॉनाचे विशेष संभाव्य आयुर्मान १० सेकंद असल्यास एका दशलक्षांश सेकंदाच्या कालावधीतच भंजन विक्रियेचा वेग २१०० एवढ्या पटीने वाढून मोठा स्फोट होईल. इंधन म्हणून वापरलेल्या पदार्थात स्वयंस्फूर्त भंजन-विक्रिया पुरेशा प्रमाणात होत नसल्यास याच इच्छित क्षणी अन्य मार्गाने न्यूट्रॉनाचा पुरवठा भंजन-साखळी-विक्रिया चालू करण्यासाठी करावा लागतो.

       स्फोटाची तीव्रता आणि दाहकता वाढविण्यासाठी अणुबाँबला प्लुटोनियम अथवा कोबाल्ट यांसारख्या पदार्थांचे जाड आवरण घातलेले असते.

       भंजन-साखळी-विक्रियेत न्यूट्रॉन फार मोठ्या प्रमाणावर निर्माण होतात. त्या न्यूट्रॉनांचा ग्रास या कोबाल्टमध्ये होऊन त्यापासून फार तीव्र किरणोत्सर्गी (अणूचे भंजन झाल्यामुळे त्यातून किरण किंवा कण बाहेर पडण्याची क्रिया) व दीर्घ अर्धायुष्य (किरणोत्सर्गी पदार्थाची मूळची क्रियाशीलता निम्मी होण्यास लागणारा काळ) असलेला कोबाल्ट (६०) समस्थानिक फार मोठ्या प्रमाणावर तयार होतो

       हलक्या अणुकेंद्रांच्या संघटनेची काही उदाहरणे

       व स्फोटाच्या परिसरात पसरतो. नैसर्गिक अथवा निकृष्ट युरेनियमाचे आवरण म्हणून उपयोग केल्यास, या युरेनियमाच्या अणूंचेही भंजन होते व स्फोटापासून अधिक संहारक शक्ती प्राप्त होते.

       पण कोणत्याही प्रकारचे आवरण घेतले, तरी जशी फटाक्याच्या बांधणीत दारूभोवती गुंडाळलेल्या कागदाची स्फोट घडण्याच्या क्रियेस मदत होते, तशीच मदत या आवरणाची होते.

       हायड्रोजन-बाँब : हलक्या अणुकेंद्रांच्या संघटनेपासूनही फार मोठ्या प्रमाणावर ऊर्जा निर्माण होते. याची काही उदाहरणे कोष्टक क्र. २ मध्ये दिली आहेत. या कोष्टकामध्ये 1H1 , 1H2, 1H3 हे हायड्रोजनाचे, 2He3 ,2He4 हे हीलियमाचे आणि 3Li6 हा लिथियमाचा असे समस्थानिक दर्शविले आहेत. यात अणूच्या संज्ञेच्या डाव्या बाजूस खाली अमुक्रमांक व उजव्या बाजूस वर त्याचा अणुभार लिहिला आहे

       [→ अणुक्रमांक; अणुभार]. तसेच β+, ν, γ आणि 0n1 हे अनुक्रमे पॉझिट्रॉन, न्यूट्रिनो, गॅमा किरण आणि न्यूट्रॉन यांचे उत्सर्जन दर्शवितात. प्रत्येक विक्रियेतील शेवटचा आकडा (Mev-दशलक्ष इलेक्ट्रॉन व्होल्ट, १ इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे १ व्होल्ट विद्युत् दाबाखाली प्रवेगित केलेल्या इलेक्ट्रॉनाची ऊर्जा = १·६०२०३ × १०-१२अर्ग) विक्रियेत निर्माण होणारी ऊर्जा दर्शवितो.

       हलक्या अणुकेंद्रांच्या संघटनेची काही उदाहरणे

       विक्रिया विक्रियेमध्ये भाग घेणाऱ्या दर ग्रॅम वस्तुमानागणिक निर्माण होणारी ऊर्जा (अब्ज कॅलरी)

       (१) 1H1+1H1Ž1H2+β++ν +0·42Mev१७

       (२) 1H1+1H2Ž2He3+γ +5·2Mev४०

       (३) 1H1+1H3Ž2He4+γ +19·7Mev१२०

       (४) 1H2+1H2Ž2He3+0n1+3·3Mev २० 

       (५) 1H2+1H2Ž1H1+1H3+4·03 Mev २४ 

       (६) 1H2+1H3Ž2He4+0n1+17·6Mev ८४ 

       (७) 1H3+1H3Ž2He4+20n1 +11·32Mev४५ 

       (८) 3Li6+1H2Ž2He4+2He4 +22·36Mev६७

       हायड्रोजन बॉम्ब

        युरेनियम (२३५) चा अणू न्यूट्रॉनांच्या माऱ्यामुळे जसा सहज फुटतो त्याप्रमाणे एका हलक्या अणूचा दुसऱ्या अणूवर मारा करून या विक्रिया घडवून आणता येत नाहीत.

       कारण अशा प्रकारे दोन अणुकेंद्रांचे संघटन घडण्यापूर्वी त्या दोन अणुकेंद्रांमधील अतिप्रचंड प्रतिसारक प्रेरणेवर मात करणे शक्य नसते. त्यासाठी अशा अणूंना प्रचंड वेग देणे जरूर असते

       व ही गोष्ट साध्य करण्यासाठी अशा अणूंचे तापमान कित्येक दशलक्ष अंश सेल्सिअसपर्यंत वाढवावे लागते.

       एवढे उच्च तापमान फक्त अणुबाँबच्या स्फोटाच्या वेळीच साध्य होते.

       म्हणून हायड्रोजन-बाँबच्या स्फोटासाठी प्रथम अणुबाँबचा स्फोट घडवावा लागतो. अशा स्फोटानंतर प्राप्त होणाऱ्या तापमानाला कोष्टक क्र. २ मधील (६) क्रमांकाची विक्रिया सुरू होते.

       या विक्रियेमुळे

       निर्माण होणाऱ्या ऊर्जेमुळे तापमान अधिक वाढते व त्यामुळे अनुक्रमे (३), (४) व (५) क्रमांकांच्या विक्रिया घडून येतात व तापमान आणखी वाढते;

       शिवाय (६) व्या क्रमांकाच्या विक्रियेमुळे होणारी ट्रिटियम (1H3)ची झीजही भरून निघते. त्यामुळे क्रमांक (८) सारख्या

       त्यातल्या त्यात जड अणुभार असलेल्या विक्रियाही घडतात.

       वरील विक्रियांमध्ये न्यूट्रॉनांची फार मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती होते व या न्यूट्रानांच्या साहाय्याने हायड्रोजन-बाँबच्या

       आवरणासाठी वापरलेल्या युरेनियम (२३८)च्या अणूंमध्ये भंजन-विक्रिया घडतात आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या एकंदर ऊर्जेत भर पडते.

       हायड्रोजन बॉम्ब

       हायड्रोजन-बाँबची संरचना व त्याचा स्फोट घडवून आणण्याचे तंत्र हेही एक लष्करी गुपित आहे; पण त्याच्या स्फोटाचे परिणाम मात्र जगजाहीर आहेत.

       अशा एका बाँबच्या स्फोटापासून हीरोशीमावर टाकलेल्या अणुबाँबच्या शेकडो पट ऊर्जा निर्माण करणे शक्य आहे.

       सर्वसाधारपणे अणुबाँबच्या किंवा हायड्रोजन-बाँबच्या स्फोटापासून निर्माण होणारी ऊर्जा किलोटन या परिमाणाने दर्शविली जाते.

       उदा., हीरोशीमावर टाकलेल्या बाँबपासून २०,००० टन टीएनटीच्या स्फोटाइतकी ऊर्जा निर्माण झाली,

       म्हणून ‘त्या बाँबपासून २० किलोटन ऊर्जा प्राप्त झाली’ असे म्हणण्याचा प्रघात आहे.

       यावरून एक शतसहस्त्र किलोटन अथवा १०० मेगॅटनी हायड्रोजन-बाँबच्या स्फोटापासून निर्माण होणाऱ्या ऊर्जेची कल्पना येईल.

       अणुकेंद्रीय स्फोटाचे दुष्परिणाम : अणुकेंद्रीय स्फोटामुळे आसमंतात निर्माण झालेल्या प्रखर उष्णतेमुळे सर्वत्र आगी लागतात

       हायड्रोजन बॉम्ब

       व निर्माण होणाऱ्या दाब-आघात-तरंगामुळे इमारतींची पडझड होते. यांशिवाय या अणुकेंद्रीय विक्रियांच्या वेळी बाहेर पडणाऱ्या किरणोत्सर्गामुळेही जीवसृष्टीस अपाय होतो. जी किरणोत्सर्गी द्रव्ये तयार होतात त्यांपैकी काहींचा जगभर फैलाव होतो,

       तर काही स्फोटाच्या आसमंतात पसरतात. या वेगवेगळ्या परिणामांची तीव्रता अनेक गोष्टींवर अवलंबून असते.

       त्यांतील महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे स्फोटाचा प्रकार, स्फोट होण्याच्या वेळी त्याची जमिनीपासून उंची, त्याची शक्ती आणि

       त्या वेळेचे हवामान या होत. हायड्रोजन-बाँबच्या स्फोटापासून तौलनिक दृष्ट्या कमी प्रमाणात किरणोत्सर्गी पदार्थ निर्माण होतात.

       स्फोट जमिनीपासून फार उंचीवर झाल्यासही किरणोत्सर्गाची कार्यप्रवणता कमी होते. पृथ्वीवरील हवेच्या आवरणाच्या बाहेर स्फोट झाल्यास रेडिओतरंगांच्या दळणवळणात अडथळे निर्माण होतात.

       या सर्व दुष्परिणामांत दाब-आघात-तरंग व उष्णता-तरंग हे अधिक हानिकारक होत. ५ मेगॅटन बाँबच्या जमिनीजवळील स्फोटामुळे १० किमी. परिसरातील इमारतींची पडझड होईल, ४० किमी.

       अंतरापर्यंत सर्व लोकांना भाजल्यासारख्या जखमा होतील, अत्युच्च दाबामुळे हानी होईल, व ३२ किमी.

       अंतराच्या परिसरात कागद, सुके लाकूड यांसारख्या पदार्थांना आगी लागतील.

       या परिणामांमुळे होणाऱ्या स्थानिक हानीच्या प्रमाणाशी तुलना केल्यास स्फोटाच्या वेळी बाहेर पडणाऱ्या किरणोत्सर्गामुळे होणाऱ्या हानीत विशेष वाढ होत नाही.

       पण स्फोटापासून कित्येक किमी. अंतरात होणाऱ्या किरणोत्सर्गी वर्षावामुळे मात्र फार धोका संभवतो. जवळजवळ १५० किमी. पर्यंत हा धोका पोचू शकतो. अर्थात, हा स्फोट फार उंचीवर घडून आल्यास अशा प्रकारचा किरणोत्सर्गी वर्षाव फार कमी प्रमाणात घडेल [→ किरणोत्सर्गी अवपात].

       अणुबाँब व हायड्रोजन-बाँब यांमधील विक्रियांमुळे निर्माण होणारी ऊर्जा मानवाच्या कल्याणासाठी उपयोगात आणण्याच्या दृष्टीने

       शास्त्रज्ञांची खटपट चालू आहे व त्यात काही अंशी यशही प्राप्त झाले आहे.

       भौतिक विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

        इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

         इतर महत्वाच्या लिंक्स

         सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

         Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

         नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

         रडार तंत्रज्ञान व उपयोग

         रडार तंत्रज्ञान व उपयोग

         रडार तंत्रज्ञान व उपयोग

         रेडिओ डिटेकशन अँड रेजिंग

         रडार तंत्रज्ञान व उपयोग“`हे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे याच्या दृष्टीक्षेपात येणाऱ्या,हलणाऱ्या व स्तब्ध वस्तूंची नोंद घेऊ शकते डोळ्याला न दिसणाऱ्या वस्तूंची दिशा ,अंतर,उंची आणि वेग यांची माहिती करून घेण्याची क्षमता या उपकरणात आहे.“`

         “`रडार चा मूळ उद्देश वस्तूंचे अस्तिस्त्व नोंदणे

         आपल्या डोळ्यांना वस्तू दिसण्याचे कारण प्रकाशाच्या लहरी वस्तूवर पडतात आणि तेथून त्या आपल्या डोळ्यांच्या दिशेने  परावर्तित होतात .आपल्या डोळ्यामध्ये प्रतिबिंबित होतात.“`

         “`रडार शक्तिशाली रेडिओ ट्रांसमीटर (प्रक्षेपक यंत्र)वापरून रेडिओ लहरींचे प्रक्षेपण करून वस्तू प्रकाशमान करतो“`

         या लहरी दूरध्वनी यंत्राच्या श्रावकामार्फत इलेक्टरोनिकसच्या साहाय्याने पडद्यावर प्रदर्शित केल्या जातात“`

         “`या प्रकाशाचे ठिपके किंवा प्रत्यक्ष वस्तूंचे प्रतिबिंब्या स्वरूपात दिसते“`

         “`दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हे यंत्र सैन्याच्या वापरासाठी ,विमान,व युद्धनौका यांचा शोध घेण्यासाठी होते

         आता हे यंत्र विमान व नौकांच्या मार्गदर्शनासाठी,वादळे किंवा आकाशातील इतर गोंधळ तसेच ग्रह उपग्रह यांच्या अभ्यासासाठी वापरले जाते“`

         Radar is a detection system that uses radio waves to determine the range, angle, or velocity of objects. It can be used to detect aircraft, ships, spacecraft, guided missiles, motor vehicles, weather formations, and terrain.

         सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

          इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

           इतर महत्वाच्या लिंक्स

           सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

           Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

           नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

           आगकाड्या तयार करण्याची प्रक्रिया माहिती

           आगकाड्या तयार करण्याची प्रक्रिया माहिती

           आगकाड्या तयार करण्याची प्रक्रिया माहिती

           कोणत्याही खरखरीत पृष्ठावर किंवा विशिष्ट प्रकारच्या पृष्ठावर घासल्यास पेट घेईल असे रासायनिक पदार्थांचे मिश्रण ज्या काडीच्या किंवा कागदी पट्ट्याच्या अथवा सुरळीच्या टोकास लाविलेले असते, तिला ‘आगकाडी’ असे म्हणतात.

           लाकडावर लाकूड घासले गेल्याने वणवा लागतो असे आढळल्यावरून प्राचीन काळी यज्ञाकरिता अग्नी उत्पन्न करण्याचे अरणी-घुसळदांडू हे उपकरण प्रचारात आले असावे.

           गारगोटी आणि लोखंड यांच्या घर्षणाने ठिणगी पाडण्याची युक्ती म्हणजेच चकमक त्यानंतर माहीत झाली.

           या ठिणग्यांनी प्रथम कापूस पेटवीत. त्यानंतर कापसाऐवजी गंधकात बुडविलेल्या काड्या वापरात आल्या.

           रासायनिक विक्रियेने विस्तव उत्पन्न करण्याच्या प्रयत्नांना एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी चालना मिळाली. पोटॅशियम क्लोरेट, साखर व डिंक यांचे मिश्रण लावलेल्या काड्या सल्फ्यूरिक अम्लात बुडविल्याने पेट घेतात, असे दिसून आल्यावर ‘तत्काळ अग्नी’ (इन्स्टंटेनियस-लाइट) या नावाची आगकाडी प्रचारात आली. तथापि ती वापरणे धोक्याचे आणि गैरसोयीचे असल्यामुळे लवकरच मागे पडली.

           रासायनिक द्रव्यांच्या घर्षणाने पेटेल अशी आगकाडी १८२७ मध्ये जॉन वॉकर (इंग्लंड) यांनी बनविली. अँटिमनी सल्फाइड, पोटॅशियम क्लोरेट, डिंक किंवा स्टार्च यांच्या मिश्रणाचे गुल या काडीच्या टोकाला लाविलेले असे.

           काचेची पूड लावलेल्या किंवा दुसऱ्या कोणत्याही खरखरीत पृष्ठावर ते घासले की पेट घेई. परंतु अशी काडी ओढल्यावर इतस्तत: ठिणग्या उडत आणि अपायकारक व दुर्गंधी धूर होत असे त्यामुळे ती लोकप्रिय झाली नाही.

           वरील मिश्रणातील अँटिमनी सल्फाइडाऐवजी पांढरा फॉस्फरस वापरून बनविलेल्या ‘ल्युसिफर’ आगकाड्या १८३१ मध्ये निघाल्या.

           आगकाड्या तयार करण्याची प्रक्रिया माहिती

           परंतु पांढऱ्या फॉस्फरसाच्या संपर्कामुळे आगकाड्यांच्या कारखान्यातील कामगारांना ‘फॉसीजॉ’ नावाचा जबड्यांच्या हाडाचा रोग होतो, असे जेव्हा दिसून आले तेव्हा त्यांचे उत्पादन कायद्याने बंद करण्यात आले.

           अँटोन फोन श्रोट्टे यांनी १८४५ मध्ये तांबड्या फॉस्फरसाचा शोध लावला. हा बिनविषारी असून सहजासहजी पेटत नाही त्यामुळे त्याचा उपयोग आगकाड्यांकरिता करणे शक्य झाले.

           स्वीडनमध्ये लुंडस्ट्रॉम यांनी १८५५ मध्ये प्रथम सुरक्षित आगकाडी बनविली. ही काडी कोणत्याही खरखरीत पृष्ठावर घासून पेटविता येत नाही; ती पेटविण्याकरिता विशिष्ट रासायनिक मिश्रण लावलेला पृष्ठभाग लागतो. हिचे दुसरे वैशिष्ट्य हे की, तिच्यामध्ये घर्षणजन्य उष्णतेने पेट घेणारे द्रव्य (तांबडा फॉस्फरस) आणि अँटिमनी सल्फाइड व खरखरीतपणा आणणारा एखादा पदार्थ यांचे मिश्रण आगपेटीच्या अरुंद बाजूच्या पृष्ठाला लावलेले असते आणि त्या योगाने प्रज्वलित होणारी द्रव्ये काडीच्या गुलात असतात. या विभागणीमुळे या आगकाड्या पूर्वीच्या काड्यांपेक्षा जास्त सुरक्षित ठरतात.

           गुलामध्ये पोटॅशियम क्लोरेट, पोटॅशिम डायक्रोमेट, मँगॅनीज डाय-ऑक्साइड, गंधक, काचेची बारीक पूड, सरस इ. द्रव्ये असतात. यांतील पहिली तीन द्रव्ये ज्वलनास आवश्यक असलेला ऑक्सिजन पुरवितात व त्यामुळे प्रथम गंधक जळू लागतो. कारण काडीच्या लाकडापेक्षा तो अधिक सुलभतेने पेटतो. त्यानंतर काडी पेट घेते. आगकाडीकरिता वापरावयाच्या काड्या अमोनियम फॉस्फेट किंवा बोरिक अम्ल यांच्या विद्रावात बुडवून नंतर सुकवितात त्यामुळे काडीची ज्योत विझविल्यावर लाकूड जळत राहत नाही.

           काडीच्या एका टोकाला सु. १० मिमी. लांबीपर्यंत पॅराफीन मेणाचा पातळ थर देतात व नंतर ते टोक गुल बनविण्याच्या मिश्रणात बुडवून काढतात. पॅराफिनामुळे काडीचे ज्वलन सुलभ होते. सेव्हने व काहेन यांनी १८९८ मध्येफॉस्फरस सेस्क्विसल्फाइड वापरून घर्षक काड्या तयार केल्या.

           बहुतेक सर्व देशांत आगकाड्यांचा पुरवठा पातळ लाकडी पेट्यांतून केला जातो. पेटीचे दोन भाग असतात : (१) आतील खण व (२) खणाच्या चार बाजू झाकील असे पातळ लाकडी झाकण – त्यात हा खण सरकवून बसविता येतो. झाकणाच्या दोन बाजूंना घर्षक मिश्रण लावलेले असते. काही देशांत आगकाड्या कागदाच्या केलेल्या असून त्या पुठ्ठ्याच्या पुस्तकासारख्या वेष्टनात ठेवलेल्या असतात. आगकाड्यांचे व आगपेट्यांचे इतरही अनेक प्रकार आढळतात. आगकाड्या बनविण्याच्या बहुतेक सर्व कृती यंत्राने केल्या जातात.

           कच्चा माल

           कच्चा माल : आगकाड्या तयार करण्यासाठी विशेष प्रकारचे लाकूड व कागद, खळ अथवा डिंक आणि आवश्यक ती रसायने यांची गरज असते.

           लाकूड : हलके, मऊ व सच्छिद्र, गाठी किंवा तडे नसलेले, रचनेत सरळ व ज्याचे पातळ तक्ते निघतील असे लाकूड काड्यांकरिता लागते. काडी ओढताना ती मोडू नये इतपत कठीणपणा त्यास असावा लागतो. खण व झाकण यांकरिता लागणारे लाकूड नितळ पृष्ठाचे लागते. अशा लाकडामुळे घर्षकाचा लेप सर्वत्र सारखा देता येतो व कागद चांगला चिकटतो.

           काड्या व पेट्या यांसाठी अ‍ॅस्पेन,टिलिया जॅपोनिका, सिमनॉक, कॉटनवुड, बालसम, पॉपलर, पोप्रावुड व सावर या झाडांचे लाकूड सामान्यत: वापरतात. भारतात उपलब्ध असणारे मलबार अ‍ॅस्पेन, अशोक इ. लाकडांच

           सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

           इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

            इतर महत्वाच्या लिंक्स

            सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

            Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

            नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

            लायगो गुरुत्वीय लहरी शोधक यंत्रे माहिती

            लायगो गुरुत्वीय लहरी शोधक यंत्रे यंत्रे माहिती Ligo-Gravitational-Waves-Research

            गुरुत्वीय लहरींच्या शोधासाठी वापरण्यात आलेली दोन लायगो गुरुत्वीय लहरी शोधक यंत्रे पुन्हा सुरू करण्यात आली असून आगामी काळातील विश्वातील आणखी काही कृष्णविवरांच्या टकरी व त्यातून निर्माण होणाऱ्या गुरुत्वीय लहरींचा शोध घेण्यात यश येईल अशी आशा आहे.

             लायगो शोध उपकरणांमध्ये लेसर, इलेक्ट्रॉनिक व ऑप्टिक्स (प्रकाशशास्त्र) पातळीवर काही बदल करण्यात आले असून त्यांची संवेदनशीलता १० ते २५ टक्के वाढवली आहे. ही शोधक यंत्रे आता विश्वात अतिशय दूरवरच्या खगोलीय घटनातून निर्माण होणाऱ्या गुरुत्वीय लहरींचा वेध घेऊ शकतील.

            गेल्या वर्षी १४ सप्टेंबरला लेसर इनफेरोमीटर ग्रॅव्हीटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी डिटेक्टर्स म्हणजे लायगो उपकरणांनी प्रथमच गुरुत्वीय लहरी शोधल्या होत्या. ही दोन लायगो डिटेक्टर उपकरणे एकमेकांपासून ३००० कि.मी अंतरावर असून त्यात अनेक सुधारणा आता केल्या असून त्यांची संवेदनशीलता वाढवण्यात आली आहे.

            त्यावेळी पकडण्यात आलेला संदेश हा गुरुत्वीय लहरींचा होता व त्या लहरी १.३ अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेल्या दोन प्रचंड वस्तुमानाच्या कृष्णविवरांच्या विलयातून तयार झाल्या होत्या. त्यानंतर तीन महिन्यांनी म्हणजे २६ डिसेंबरला गुरुत्वीय लहरींचा आणखी एक संदेश टिपण्यात यश आले होते व दुसऱ्या कृष्णविवरांच्या मिलनातून तयार झालेल्या त्या गुरुत्वीय लहरी होत्या, ती घटना १.४ अब्ज प्रकाशवर्षे दूरवर घडली होती.

            लायगो उपकरणातील सुधारणांमुळे आता गुरुत्वीय लहरी जास्त प्रमाणात शोधता येतील असे वैज्ञानिकांना वाटते. लायगो उपकरणे ही वॉशिंग्टन व लुईझियाना येथे असून त्यांचे एकमेकांपासूनचे अंतर ३००० कि.मी आहे. ही उपकरणे ६६० दशलक्ष प्रकाशवर्षे दूर असलेल्या कृष्णविवरांच्या मिलनातून तयार झालेल्या गुरुत्वीय लहरी शोधू शकतात. ही क्षमता आता २५ टक्के वाढली आहे असे लायगोचे प्रमुख वैज्ञानिक पीटर फ्रिटशेल यांनी सांगितले.

            सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

             महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

              इतर महत्वाच्या लिंक्स

              सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

              Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

              नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

              भारतीय कंपनी करणार चंद्रावर स्वारी

              भारतीय कंपनी करणार चंद्रावर स्वारी Indian Company to Invade the Moon

              भारतीय कंपनी करणार चंद्रावर स्वारी

              अवकाश तंत्रज्ञानाच्या स्पर्धेमध्ये आता खासगी क्षेत्रानेही उडी घेतली असून, या चढाओढीमध्ये ‘टीमइंडस’ या भारतीय कंपनीनेही आपले आव्हान निर्माण केले आहे.

              चंद्रावर रोव्हर सोडण्यासाठी होत असलेल्या स्पर्धेमध्ये ही कंपनी सहभागी होत असून, भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) सहकार्याने या प्रकल्पावर काम करण्यात येत आहे.

              चंद्रावर यान सोडण्याबरोबरच अवकाश तंत्रज्ञानामध्ये खासगी क्षेत्राचा सहभाग वाढावा आणि या तंत्रज्ञानामागील खर्च कमी व्हावा, यासाठी ‘गुगल’ने ‘लुनार एक्स’ ही स्पर्धा जाहीर केली आहे. तीन कोटी डॉलरच्या या स्पर्धेमध्ये ३० कंपन्यांची नावे निश्चित करण्यात आली असून, त्यातील १६ कंपन्या स्पर्धेत आहेत.

              या १६पैकी चारच कंपन्यांनी प्रक्षेपणाचे करार अंतिम केले आहेत. यामध्ये दोन अमेरिकी आणि एक इस्रायली कंपनीचा समावेश आहे.

              या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर किमान ५०० मीटर अंतरापर्यंत प्रवास करावे आणि तेथील माहिती संकलित करावी, अशी अपेक्षा आहे.

              तसेच, या मोहिमेच्या खर्चापैकी ९० टक्के वाटा खासगी क्षेत्रातून यायला हवा. हे प्रक्षेपण पुढील वर्षी करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी ‘टीमइंडस’ ‘इस्रो’च्या ‘अँट्रिक्स’ या व्यावसायिक शाखेबरोबर काम करणार आहे.

              ‘टीमइंडस’ २०१२ पासून ‘इस्रो’बरोबर चांद्रमोहिमेच्या संशोधनामध्ये आहे

              या मोहिमेसाठी कार्यक्षम असणारे मॉडेल सादर केल्याबद्दल ‘गुगल’ने २०१४मध्ये या कंपनीला १० लाख डॉलरचे बक्षीस दिले होते. या मोहिमेविषयी ‘टीमइंडस’चे प्रमुख राहुल नारायण म्हणाले,

              ‘अवकाश संशोधनाच्या क्षेत्रामध्ये ‘इस्रो’ने अनेक दशकांच्या कामातून ठसा उमटविला आहे आणि या वारशाची मदत आम्हाला मिळणार आहे.

              आमच्यातील करारामुळे, पुन्हा एकदा ही खरेखुरी भारतीय मोहीम असून, भारतातील खासगी आणि सरकारी क्षेत्राचे एक समान स्वप्न आहे, हेच दाखवून द्यायचे आहे.’

              पुढील वर्षी मोहीम ‘टीमइंडस’च्या नियोजनानुसार, २८ डिसेंबर २०१७ रोजी या रोव्हरचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्या आधी तीन वेळा प्रायोगिक प्रक्षेपण होईल. हे रोव्हर २८ जानेवारी २०१८ रोजी चंद्राच्या वायव्य भागातील पृष्ठभागावर पोहोचेल, असा अंदाज आहे. हे रोव्हर तिरंगा ध्वज घेऊन जाणार आहे.

              या मोहिमेसाठी ‘इस्रो’बरोबर सखोल काम करण्यात येत आहे. मात्र, या मोहिमेवर अंतिम नियंत्रण ‘टीमइंडस’चेच असेल.

              उद्योजकांचाही हात चंद्रावर रोव्हर पाठविण्याच्या या मोहिमेसाठी सहा कोटी डॉलरपर्यंत खर्च येणार आहे. यासाठी १०० जणांचा चमू कार्यरत आहे. यामध्ये ‘इस्रो’तील २० निवृत्त शास्त्रज्ञही आहेत. अनेक उद्योजकांनी या मोहिमेसाठी हात दिला असून, यामध्ये रतन टाटा यांचाही समावेश आहे.

              चंद्राच्या पृष्ठभागावर रोव्हर उतरविणे खूपच आव्हानात्मक आहे, याची आम्हाला जाणीव आहे. मात्र, रोव्हरची रचना, विश्लेषण आणि अन्य बाबतींमध्ये आमचा ९० टक्के विश्वास आहे. तर, रोव्हर चंद्रावर उतरविण्याविषयी ७५ टक्के विश्वास आहे.

              युरोपीय अवकाश संस्थेचे मंगळावर उतरणारे रोव्हर काही महिन्यांपूर्वी कोसळले. त्यामुळे, त्यांची मोठे नुकसान झाले आहे. अन्य प्रतिस्पर्ध्यांची तुलना करता,

              ‘इस्रो’बरोबर असण्याचा आम्हाला फायदा आहे.

              सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

               इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

                इतर महत्वाच्या लिंक्स

                सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

                Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

                नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

                संगणकाविषयी माहिती भाग

                संगणकाविषयी माहिती भाग Parts Of Computer Information

                संगणकाविषयी माहिती भाग

                DOT म्हणजे – डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन

                SSA म्हणजे – सर्व शिक्षा अभियान

                SARI म्हणजे – सस्टेनेबल अॅक्सेस इन रूरल इंडिया

                CIC म्हणजे – कॉम्युनिटी इन्फ्रोर्मेशन सेंटर

                CIC ची सुरुवात झाली – 17 ऑगस्ट 2002

                ई-वेस्ट म्हणजे – इलेक्ट्रॉनिक कचरा

                सॉफ्टवेअर चोरी रोखण्यासाठीचा कायदा – इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी अॅक्ट

                नॅशनल अॅरोलॅटिक लॅब – बंगळुरू

                सी-डॅक चे मुख्यालय – पुणे

                इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी – मुंबई

                ‘अनुराग’ ही संगणकविषयक संस्था – हैदराबाद

                संगणकाच्या चौथ्या पिढीचा कालावधी – 1970-80

                मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये लिहिताना अक्षरांखाली हिरवी रेषा संकेत आहे – व्याकरणातील चुका

                मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये लिहिताना अक्षरांखाली लाल रेषा संकेत आहे – स्पेलिंग मिस्टेक

                रिसायकल बिन या चित्राने दर्शवितात – डस्ट बिन

                नेटस्केप नेव्हीगेटर प्रकार आहे – ब्राऊझरचा

                डॉसची आज्ञावली या भाषेत असते – अमेरिकन

                बारकोड रिडर्सना म्हणतात – हॅन्डहेल्ड स्कॅनर

                ई-मेल म्हणजे – इलेक्ट्रॉनिक मेलिंग  

                Mpsc Exam Syllabus Pdf Download

                Mpsc Exam Syllabus Pdf Download

                All Exam Syllabus Pdf Download

                सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

                Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

                नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

                आधुनिक विज्ञानाचे टप्पे

                आधुनिक विज्ञानाचे टप्पे Stages of Modern science

                आधुनिक विज्ञानाचे टप्पे

                इ.स.४७६ मध्ये रोमन साम्राज्याच्या अस्तानंतर मध्ययुगाला सुरुवात झाली.कालखंड सुमारे एक हजार वर्षाचा मानला जातो.

                मध्ययुगाला अंधःकारयुग किंवा तमोयुग या नावानेही संबोधले जाते. कारण प्राचीन काळातील वैज्ञानिक प्रगतीची मध्ययुगात पिछेहाट झाली.

                संरजामशाहीचे वर्णन संघटीत अराजकता असे करतात.

                प्रबोधनकाळात साहित्याचा समृध्द अविष्कार –इटली.

                विज्ञान उषाःकालाची कारणे –

                १)वैज्ञानिक दृष्टीकोनाचा उदय

                २)धर्म सुधारणा चळ्वळ

                ३)मानवता वादाचा उदय

                ४)कॉन्स्टीटीनोपलचा पाडाव-१४५३

                मध्ययुगात विज्ञानाची पिछेहाट होण्याची कारणेः-

                समाज जीवनावरील धर्म संस्थेचा पगडा- धर्म संस्थांनी समाजावरील प्रभाव टिकवण्यासाठी समाज अंधश्रध्दाळू बनविला.धर्मग्रंथात जे काही लिहून ठेवले तेच अंतिम सत्य होय असा प्रचार केला. म्हणजेच शब्द प्रामाण्य व ग्रंथ प्रामाण्य यांना महत्व प्राप्त झाले.

                युरोपातील  प्रबोधन  किंवा पुनरुज्जीवनवादी चळवळीस सुरुवात -१४ व १५ वे शतक

                विज्ञानाचा उषाःकालः-

                रॉजर बेकन (१२१४ ते १२९४) –  रॉजर बेकनला आधुनिक उषःकालाचा दूत म्हणतात.आधुनिक वैज्ञानिक विचारसरणी प्रथम पुरस्कार केला. रॉजर बेकन स्वतः वैज्ञानिक नसून एक तत्वज्ञ  होता त्याने केलेली अनेक वैज्ञानिक भाकिते सत्य ठरली. उदा- उडत्या मशिनची कल्पना,घोड्याशिवाय धावणारी गाडी, पाण्यावर चालणारे यंत्र इ. त्याच्या आपॅस मेजस ह्या शास्त्र विचारांचा ग्रंथात गणित विद्येचे महत्व स्पष्ट केले आहे.

                ग्रंथ – ऑन बर्निंग ग्लासेस, ऑन द मार्व्हलस पॉवर ऑफ अन्व्हेन्शन अँड नेचर,कॉप्युटेशन ऑफ नॅचरल इव्हेंट्स इ.

                डांटे (इ.स.१२६५ -१३२१) – इटलीच्या प्रसिध्द कवी  व तत्वज्ञ.ग्रंथ – दि दिव्हाइन कॉमेडी.

                लियोनार्दो – द – व्हिन्सी (१४५२ -१५९९) – एक  थोर शास्त्रज्ञ,कल्पक इंजिनियर, शिल्पकार,वास्तूशास्त्र चित्रकार इ. नात्यांनी त्याची किर्ती फार मोठी आहे. त्याला संगीत व तत्वज्ञान यांची ही आवड होती. त्याची मोनालिसा, द लास्ट सपर ही चित्रे जगभर गाजली आहेत.या अलौकिक प्रतिभावंत कलावंताने विज्ञानाच्या  क्षेत्रातही आपली छाप पाड्ली होती.

                प्रबोधनाच्या काळातील संपुर्ण मानव असा उल्लेख केला जातो.

                त्याची कल्पना चित्रे – पाण चक्कीची कल्पना, पाणबुडी,पॅराशुट त्याचप्रमाणे हेलिकॉप्टर .

                प्रयोगापेक्षा  त्याने केली आहे.झाडाच्या कापलेल्या खोडाच्या पोटी जितकी वर्तुळे दिसतील तित्की वर्षे त्या झाडाचे वय असे त्याने लिहून ठेवले आहे. अलेक्झांडर हंबोल्ट्ने १५ व्या शतकातील सर्वात मोठा शास्त्रज्ञ म्हणून लियोनार्दो द व्हिन्सी चा गौरव केला आहे.

                मॅडिनो – डी – लुझी याने ऍनाटोमिया हे शरीरशास्त्रावरील  पुस्तक सन १३१६ मध्ये तयार केले.

                मायकेल अँजेलो (१४७५ – १५६४) – ह्याची चित्रकार व शिल्पकार म्हणून जगभर  ख्याती आहे.मोझेस,ख्रिस्तमाता,डेव्हीड  इ. पुतळे प्रसिध्द आहेत. रोमच्या व्हॅटिकन सिटीतील सिस्टिम चॅपेल च्या छ्तावरील भव्य चित्र,त्याचप्रमाणे दि. क्रिएशन व लास्ट जजमेंट ही दोन चित्रे आजही अजरामर होवून गेली.

                आधुनिक विज्ञानाचे टप्पे

                फ्रान्सिस बेकन (१५६१ – १६२६) – महान तत्वज्ञ,मुत्सद्दी, राजकारणी म्हणून प्रसिध्द होता. वैज्ञानिक पध्द्तीचा पाया घातला. दुसरा कोणीतरी सांगतो म्हणून  त्याच्यावर विश्वास न ठेवता ती घटना स्वतः निरिक्षणाने खात्री करुन घ्यावी. ग्रंथ – ऑन द ऍड्व्हान्समेंट ऑफ  लर्निंग. नव्या शास्त्र पध्द्तीच्या वैज्ञानिक दॄष्टीकोनाचा पुरस्कार नोहम ऑरगनम या ग्रंथात केला आहे. त्याच्या न्यू अट्लांटिस या ग्रंथात मानवाने हस्तगत केलेल्या कलांचे व शास्त्रांचे अभ्यास  पूर्ण विवेचन आहे. संशोधनाचे पहीले शास्त्र शुध्द परिगमन व वर्गीकरण  केले.

                फ्रान्सिस बेकन हा विगमन (इंडक्टिव्ह) या तत्वज्ञान पध्द्तीचा जनक मानला जातो.

                पेट्रार्क (१३०४ – १३३४) – दि फर्स्ट मॉडर्न मॅन म्हणून प्रसिध्द होता.

                देकार्त(१५९६ – १६५०) – विज्ञान हे घटनांच्या निरिक्षणावर अवलंबून असते. विश्वाची रचना गणिती स्वरुपाची आहे. विश्लेषणात्मक भूमिती या नव्या गणित शास्त्राचा शोध लावला. जग हे वस्तूमय निव्वळ यंत्र आहे. विचारांचे सार शंका निर्माण होण्यात आहे.

                ग्रंथ – पध्द्तीची मिमांसा. भुमिती व गणित संबंध प्रस्थापित केले.

                विल्यम हार्वे (१५७८ – १६५७) – रुधिराभिसरणाचे (रक्ताभिसरण) स्पष्टीकरण व प्रयोग राजा चार्ल्स समोर दाखवून दिले.

                ग्रंथ – De Motu Cordis (On the motion of Heart)

                मालपिघी (१६२८ – १६९४)  – विल्यम हार्वेच्या रुधिराभिसरणाचे समर्थन केले. पेशी विज्ञानाचा वा शरीरबांधणीच्या शास्त्राचा जनक म्हणून ओळखले जाते. त्याचा सर्वात महत्वाचा शोध हा सुक्ष्म रक्त वाहिन्यांचा शोध होय.

                लिवेन हॉक – कार्नेलियस,डिब्रन,गॅलिलियो,डॉ हुक, स्टीफ न ग्रे इ. नी भिंगे  तयार केली तरी ख-या अर्थाने मायक्रोस्कोप तयार  करुन वापरला तो ऍटोनी लिवेन हॉक यांनी. जंतू विज्ञानाचा जनक म्हणून त्याची ख्याती आहे.

                निकोलस कोपर्निकस (१४७३ – १५४३) – खगोल शास्

                सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

                 इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

                  सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

                  Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

                  नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now